Friday, September 9, 2016

मृद संधारण बाबत आवाहन


सोलापूर दि. 09: - जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ( विशेष घटक योजना ) शेतक-यांसाठी मृद व जलसंधारण उपचाराची विविध कामे त्यांच्या शेतावर व शेताजवळील नाल्यावर पाणलोट विकास तत्वावर घेण्यात येणार आहेत. यामध्ये वैयक्तिक लाभाचे शेतक-यांच्या शेतावर सलग समतल चर , कंपार्टमेंट बंडिंग , शेततळे व सार्वजनिक लाभाचे माती नाला बांध , सिमेंट नाला बांध इत्यादी ओघळ नियंत्रणाचे उपचार संबंधित शेतक-याला  घेता येतील .
            जे अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी त्यांच्या क्षेत्रावर योजना राबवू इच्छितात त्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी कार्यालय अथवा संबंधित गावाचे कृषी सहाय्यक यांच्याशी 7/12 उतारा व जातीच्या प्रमाणपत्रासह  30 सप्टेंबर  पर्यंत संपर्क साधावा.
            तसेच मृद संधारणाच्या उपाय योजना राबविण्याबाबतचे संमती पत्रक संबंधित कृषी सहायक यांच्याकडे सादर करावे. तालुक्यास दिलेल्या लक्षांकाचे अधिन राहून व तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी  सर्वेक्षणाअंती कामे निश्चित व अंतिम करण्यात येतील. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
0          0          0          0

No comments:

Post a Comment