Thursday, September 8, 2016

परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 जारी


  सातारा, दि. 8 (जिमाका) :  जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील पदे भरती परीक्षा दि. 11 सप्टेंबर  रोजी  जिल्हयातील सातारा, कोरेगांव,कराड, वाई, फलटण येथील महाविद्यालये, माध्यमिक शाळामध्ये  घेण्यात येणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परीक्षाकेंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात फौजदारी व्यवहार संहिता, 1973 च्या कलम 144 मधील तरतुदी अप्पर जिल्हादंडाधिकारी संजीव देशमुख यांनी जारी केल्या आहेत.

फौजदारी व्यवहार संहिता, 1973 च्या कलम 144 अन्वये  दिनांक 11 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी  11 ते  दुपारी 1  वाजेपर्यंत  या परीक्षाकेंद्राच्या परिसरात  परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना  प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.  तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.  तसेच संबंधित शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, आयएसडी बुथ फॅक्स केंद्र अथवा तत्सम संपर्काची साधने बंद ठेवावीत. तसेच परीक्षा केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रान्झीस्टर, रेडीओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परीक्षा केंद्रांच्या 100 मिटर पर्यंत परीसरात वापरण्यास जवळ बाळगण्यास अथवा परीक्षा केंद्रात नेण्यास कलम 144 नुसार प्रतिबंध करण्यात आला आहे, असेही  या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment