Thursday, September 8, 2016

पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर


सातारा, दि. 8 (जिमाका) :  निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 च्या आर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादयाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी दिली.
 जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपले नांवे मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करुन घ्यावी व नविन मतदारांनी आपली नांवे मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी नमुना नं.6 भरुन संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे द्यावा. विशष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
प्रारुप मतदार यांदींची प्रसिध्दी 16 सप्टेंबर 2016, दावे हरकती स्वीकारण्याचा कालावधी 16 सप्टेंबर206 ते 14 ऑक्टोंबर 2016 , मतदार यादीमधील संबंधित भागाचे/ सेक्शनचे ग्रामसभा/ स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक इत्यादींची आणि नावांची खातरजमा करणे 16 सप्टेंबर 2016 ते 30 सप्टेंबर 2016, विशेष मोहिमेचा दिनांक 18 सप्टेंबर 2016 व 9 ऑक्टोंबर 2016, दावे हरकती निकालात काढणे दि.16 नोव्हेंबर 2016 पर्यंत डेटाबेस अद्यावतीकरण करणे 15 डिसेंबर 2016 पर्यंत, अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे दि.5 जानेवारी 2017 या प्रमाणे कार्यक्रम राहील.
ज्या मतदारांची नांवे मतदार यादीतुन वगळण्यात आलेली आहे त्यांनी  यादी मध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत पात्र असल्यास नमुना नं 6 अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे. ज्याच्याकडे निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आहे, परंतु मतदार यादीत नांव नाही अशा मतदारांनी सुध्दा यादीमध्ये नांव समाविष्ट करण्याबाबत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (BLAs) यांची नियुक्ती करावी दिनांक 18 सप्टेंबर 2016  व 9 ऑक्टोंबर 2016 या विशेष मोहिमेच्या दिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLOs) समवेत सर्व मतदार केंद्रावर दावे व हरकती स्वीकारण्यासंबंधी हजर राहावे, असेही  श्री.मुद्‌गल यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment