Thursday, September 8, 2016

विशेष गौरव पुरस्कारासाठी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावा



  सातारा, दि. 8 (जिमाका) :  जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, पाल्यांनी देशाच्या राज्याच्या नावलौकिकासाठी विशेष कामगिरी केली आहे असे उमेदवार तसेच शैक्षणिक वर्ष 2015-2016 मध्ये इ. 10 वी व 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. अशा माजी सैनिक, विधवा तथा त्यांचे पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशा पात्र माजी सैनिक, विधवा यांनी त्यांच्या आवश्यक त्या तपशीलासह स्वत:चा वैयक्तिक अर्ज, ओळखपत्राची छायांकीत प्रत, विशेष कामगिरीबाबतचा पुरावा  तसेच बोर्डाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रतीसह दिनांक 20 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे किंवा 02162-239293 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले आहे. 
                                                                         000

No comments:

Post a Comment