Thursday, September 8, 2016

न्या. एस.आर.बन्नुरमठ यांचा सोलापूर दौरा


  सोलापूर दि. 8 :- महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. एस.आर.बन्नुरमठ,  सदस्य सर्वश्री एम.अे.सईद, भगवंतराव मोरे हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे –
            मंगळवार दि.20 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 06.50 वा. मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे राखीव व मुक्काम. बुधवार दि.21 सप्टेंबर  रोजी सकाळी 10 वाजलेपासून  सोलापूर, लातूर,उस्मानाबाद जिल्हयातील केसेसबाबत  कामकाज करतील. गुरुवार दि.22 सप्टेंबर रोजी मानवी हक्क आणि मानवीय समाज याबाबत  राष्ट्रीय कार्यशाळा (स्थळ – सोलापूर विद्यापीठ, केगाव,सोलापूर), शुक्रवार दि.23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 01.00  वाजेपर्यत नागरिकांसाठी आयोजित जनजागृती कार्यक्रमास उपस्थिती,  दुपारी 3 ते  5  वाजेपर्यत मानवी हक्काबद्दल संवेदनशिलता, संवेदीकरण या विषयाबाबत सर्व शासकीय अधिकऱ्यांसमवेत बैठक. रात्री. 10.45 वा सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                                     0 0 0 0 0

No comments:

Post a Comment