सोलापूर दि.09 : - रविवार दि. 4 सप्टेंबर रोजी लिपीक-टंकलेखक सरळ सेवा भरती -2016 च्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये एकूण 07 उपकेंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे. या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरसूची मे.महाऑनलाईन,लि.मुंबई अधिकृत संकेतस्थळावरम्हणजेhttp://mahararecruitment. mahaonline.gov.in वर आज शुक्रवार दि .9 सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
या संदर्भात संबंधित उमेदवारांनी या उत्तरसूचीचे अवलोकन करुन त्यातील उत्तरांबाबत काही हरकती ,आक्षेप असतील, तर वरील संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या विहीत नमुन्यात प्रत्येक प्रश्नासाठी लेखी स्वरूपातील स्वतंत्र नमुना अर्जा सोबत सक्षम पुरावे, संदर्भ जोडून दि.12 सप्टेंबर पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आस्थापना शाखेत सादर कराव्यात. तसेच त्यांच्या हरकती estsolapur@gmail.com या ई – मेल आयडी वर 12 सप्टेंबर पूर्वी नोंदविता येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment