Friday, September 9, 2016

उत्कृष्ट लघु उद्योगांच्या जिल्हा पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत


सातारा, दि. 9 (जिमाका) : जिल्हयातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येणार असून  याचा लाभ घेवू इच्छिणा-या उद्योग घटकांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2016 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीमती.वृषाली सोने यांनी केले आहे.
                जिल्हयातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा लघु उद्योग पुरस्कार प्राप्त उद्योजकास प्रथम क्रमांकास रु.15 हजार  व व्दितीय पुरस्कार प्राप्त उद्योजकास रु.10 हजार व मानचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देण्यात येते. या पुरस्कारासाठी लघु उद्योगांची निवड त्यांनी केलेली भांडवली, गुंतवणूक, तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता, कौटुंबिक पार्श्वभूमी, उत्पादीत वस्तूची गुणवत्ता, निर्यातक्षमता. इ. बाबींचा विचार करण्यात येऊन जिल्हास्तरीय समिती मार्फत लघु उद्योजकांची निवड केली जाते. जिल्हयातील पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समिती मार्फत गुण देवून निवड करण्यात येते, असेही श्रीमती. सोने यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment