Friday, September 9, 2016

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार


सातारा, दि. 9 (जिमाका) :  सातारा जिल्हयातील माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी व 12 वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या एक-एक पाल्यांची निवड एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. तरी 90 टक्के च्या वर गुण प्राप्त केलेल्या पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 20 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले आहे.
0000


No comments:

Post a Comment