Monday, September 12, 2016

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा दौरा


सातारा, दि. 12 (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
 सोमवार दिनांक 12 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 4 वाजता  मोटारीने पुणे येथून भोळी, ता.खंडाळा, जि.साताराकडे प्रयाण. 5 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत भुमीपूजन  समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार मोटारीने भोळी येथून फलटण, जि.साताराकडे प्रयाण. फलटण येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता मोटारीने फलटण येथून मार्डी, ता.माणकडे प्रयाण. 11 वाजता कै.सदाशिवराव पोळ यांचे प्रथम पुण्य स्मरण सप्ताह शुभारंभ व औलंपिक धावपटु कु.ललिता बाबर हिचा सत्कार समारंभ स्थळ-मार्डी, ता.माण, जि.सातारा. सोयीनुसार मोटारीने मार्डी येथून साताराकडे प्रयाण. सातारा येथे आगमन व मुक्काम.
 बुधवार दिनांक 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता मोटारीने सातारा येथून कडेगांव जि.सांगलीकडे प्रयाण.

0000

No comments:

Post a Comment