पुणे.
दि. 14 (विमाका): सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम
करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी सहकार पुरस्कार देण्यात येणार असून इच्छुक
संस्थांनी दिनांक 7 ऑक्टोबर 2016 पर्यंत प्रस्ताव द्यावेत, असे आवाहन सहकारी
संस्थांचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश
कोतमिरे यांनी केले आहे.
2015-16
मध्ये या वर्षात सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या सहकारी संस्थांना पुरस्कार
देण्यात येणार आहे. इच्छुक संस्थांनी आपला सविस्तर प्रस्ताव आपल्या संस्थेचे
मुख्यालय असलेल्या संबंधित तालुक्यांच्या सहायक निबंधक / उपनिबंधक यांच्या
कार्यालयात विहित मुदतीत पाठवावा. अधिक माहितीसाठी सहायक निबंधक, जिल्हा उप निबंधक
अथवा विभागीय सह निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागामार्फत
पत्रकान्वये करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment