Thursday, September 8, 2016

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार


पुणे,दि.8 : राष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक/ पत्नी / पाल्य यांना एकरकमी रु. 10000/- आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी बहुमोल कामगिरी माजी सैनिक /पत्नी / पाल्य यांना एकरकमी रु. 25000/- विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. ज्या माजी सैनिक /विधवांचे पाल्य सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात .10 वी 12 वी मध्ये 90%पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झालेले आहेत अशा पाल्यांना एकरकमी रुपये 10,000/- विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. माजी सैनिक/ माजी सैनिक विधवांनी त्यांचे/पत्नी/पाल्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,पुणे येथे 20 सप्टेंबर,2016 पूर्वी सादर करावेत असे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल बिपिन . शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment