पुणे, दि. 8 : जिल्ह्यातील सैन्य सेवेत असताना जे सैनिक युध्दजन्य परिस्थितीव्यतीरीक्त मृत्यु पावले आहेत अशा सैनिकांच्या विधवा पत्नींना कळविण्यात येते की ज्यांचे पाल्य सन
2015-16 मध्ये इयत्ता पहिली ते पदव्युत्तरपर्यतचे अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व पाल्यांना Director (Corpus), Rehabilitation and Welfare Section, नवी दिल्ली यांचेकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती अदा करण्यात येणार आहे. सदरहु शिष्यवृत्तीचे फॉर्म www.indianarmyveterans.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबंधितांनी त्यांचे पाल्यांचे फॉर्म 30 नोव्हेंबर,2016 पूर्वी जिल्हासैनिक कल्याण कल्याण कार्यालयात जमा करावेत असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल बिपिन द. शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment