Tuesday, October 4, 2016

रास्तभाव दुकानांसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत


सातारा, दि.4 (जिमाका):  रास्त भाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाना व दोन्ही दुकानांच्या परवान्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दि.25 ऑक्टोबर पर्यंत संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांकडे विहित नमुन्यातील अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.
तालुकानिहाय देय दुकानांची संख्या पुढीलप्रमाणे. फक्त रास्त भाव दुकान सातारा तालुक्यासाठी- 15, जावली- 2, फलटण-12, खंडाळा-3 व महाबळेश्वर-15 असे एकूण 47, फक्त किरकोळ केरोसीन सातारा तालुक्यासाठी -4, जावली-8, फलटण-18 असे एकूण 30, रास्त भाव व दुकान व किरकोळ केरोसीन दोन्हीसाठी सातारा तालुक्यासाठी-55, जावली-59, फलटण-11, खंडाळा-13 व महाबळेश्वर तालुक्यासाठी 31 असे एकूण 169.
जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्रीमती बारवे यांनी कळविले आहे.
00000



No comments:

Post a Comment