Thursday, October 6, 2016

जिल्हा पर्यावरण समितीची बैठक संपन्न



पुणेदि.6 : जिल्हा पर्यावरण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सु.सं.डोके आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, गौण खनिज वाळु उपसा,ट्रक वाहतुक यातूनही प्रदूषण होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी महसुल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या बैठकीसाठी बोलवण्यात यावे. त्याच प्रमाणे विविध उद्योजक संघटनांचा एक प्रतिनिधी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी व मुख्य अभियंता यांनाही बोलविण्याच्या सूचना केल्या.
सदरील बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण नियंत्रण करण्यांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
जिल्हा पर्यावरण समितीची पुर्नरचना व पुर्नगठण शासनाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. सदरील समिती अशासकीय सदस्य डॉ. शरद गोस्वामी,गिरीश खैर, अजित सुखात्मे व सुरेश भोर हेही सदर बैठकीस उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment