Wednesday, October 5, 2016

नवरात्रोत्सवात तुळजापूर मार्गावर आरोग्य सुविधा उपलब्ध करा



नवरात्रोत्सवाच्या काळात सोलापुरातून तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. याशिवाय राज्याच्या विविध भागातूनही अनेक लोक रेल्वे अथवा वाहनाने सोलापुरात येतात व तिथून पायी चालत तुळजापूरकडे रवाना होतात. सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सव काळात भाविकांना पंढरपूर यात्रेच्या धर्तीवर विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देशही राज्यमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिले. सोलापूर-तुळजापूर मार्गावर आरोग्य पथके तैनात करणे, तात्पुरत्या वैद्यकीय सुविधा उभ्या करणे, औषध पुरवठा करणे, रुग्णांची तपासणी करणे, रुग्णवाहीकेची सोय यासह पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल यादृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. या मार्गावर दरवर्षी लोक पायी जात असल्याने पंढरपूर यात्रेच्या धर्तीवर दरवर्षी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००००००

No comments:

Post a Comment