Thursday, October 6, 2016

महिला सल्लागार समितीची बैठक संपन्न



पुणेदि.6 : सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी या समितीच्या कामकाजाबाबत चांगले प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत सूचना केली.
सदरील बैठकीत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 बाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध योजनेबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृती कार्यकमाची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या आवारातील महिला समुपदेशन केंद्राच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्याचे प्रमाणे खाजगी आस्थापनेत महिला संरक्षण समिती गठीत करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
सदरील बैठकीला जिल्हा परिषद महिला बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती वंदना धुमाळ, विविध समिती सदस्य, संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment