Tuesday, October 4, 2016

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार 76 किलोमीटरचे रस्ते सोलापूर जिल्हयासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद


सोलापूर दि. 04 : -  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 2016-17 या आर्थिक वर्षात जिल्हयातील सुमारे 76 किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. यासाठी सुमारे 50 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव रघुनाथ नागरगोजे यांनी याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
                      जिल्हयातील एकूण दहा कामांना या शासननिर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदरची कामे ग्राम विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर आणि ग्राम विकास विभागाच्या अटी आणि शर्तीवर कार्यान्वित करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या दहा रस्त्यांच्या कामासाठी 46 कोटी 72 लाख 39 हजार रुपये आणि पुढील पाच वर्षाच्या देखभाल दुरस्तीसाठी 3 कोटी 11 लाख 84 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
              
कामांचा तपशील पुढीलप्रमाणे-

.क्र.
तालुका
रस्ता
लांबी
कि.मी.
रक्कम रुपये लक्ष
देखभाल दुरुस्ती साठी रक्कम रुपये लक्ष
01
अक्कलकोट
संगोगी () तोरणी,भोसगी
09.00
472.91
28.64
02
करमाळा
हिंगणी ते जिल्हा हद्द
18.00
1219.45
84.32
03
माढा
माढा ते दारफळ
9.40
543.88
37.71
04
माळशिरस
माळशिरस ते दहिगाव
8.50
465.11
32.42
05
मंगळवेढा
टीआर 1 ते सिध्दापूर
12.00
941.34
58.19
06
उत्तर सोलापूर
टीआर 8 ते गुळवंडी
4.95
213.60
14.77
07
पंढरपूर
करकंब ते नरसाळे वस्ती
2.40
143.83
9.88
08
तावशी ते शिंगण वस्ती
1.80
107.91
7.31
09
सांगोला
डोंगरगाव ते गळवेवाडी
3.25
191.34
13.06
10
दक्षिण सोलापूर
माद्रे ते चंद्रहाळ
7.38
373.02
25.54


एकूण
76.68
4672.39
311.84


0 0 0 0

No comments:

Post a Comment