Monday, October 3, 2016

नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी रणजीतकुमार


सोलापूर दि. 03:- उजनी  धरणातून भीमा नदीच्या पात्रात विसर्ग सुरु झाला असल्यामुळे तसेच बार्शी तालुक्यात रविवारी  झालेल्या विक्रमी  पावसामुळे  सीना नदीच्या पात्रात पाण्याची प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सीना व भीमा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  रणजीतकुमार  यांनी केले आहे.
                  ते पुढे म्हणाले की,  सध्या नवरात्र महोत्सव सुरु असल्याकारणाने ग्रामीण भागात विशेषता नदी  व ओढ्या किनारी स्वच्छता विषयक घरातील इतर कामे मोठ्या संख्येने करण्यात येतात. या दोन्ही नदीच्या पात्रातील पाण्याच्या  वेगवान प्रवाहामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तेव्हा भिमा व सीना नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत त्याचबरोबर वृध्द व लहान मुलांची  काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास सहकार्य करावे.
00000

No comments:

Post a Comment