Thursday, October 6, 2016

सातारा सैनिक स्कूलच्या समस्या सोडविणार - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे


सातारा, दि.6 (जिमाका) : सैनिक स्कूलाच्या प्रशासनाने विविध समस्या मांडल्या आहेत त्या निश्चीतपणे सोडविण्यात येतील, असे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सैनिक स्कूलच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्य व महाराष्ट्र अहेडचा अंक देवून मंत्री महोदयांचे स्वागत केले.  यावेळी कर्नल सुधांशु आर्या, कॅ. जी रामबाबू, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डॉ. विजय सूर्यवंशी, रजिस्ट्रार कर्नल रणजित नलवडे आदी यावेळी उपस्थित होते.

संरक्षण मंत्रालयाची परंपरा मोठी असल्याचे सांगून संरक्षण राज्यमंत्री श्री. भामरे पुढे म्हणाले,  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा आपल्या संरक्षण मंत्री देशाला  लाभले याचा मला अभिमान आहे.  सैनिक स्कूलच्या प्रशासनाने अनेक अडचणी माझ्या समोर मांडल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी निश्चीत प्रयत्न करण्यात येतील. या सैनिक स्कूल मधील विद्यार्थी सैन्य दलात मोठ्या हुद्यावर आहेत. सैन्य दलात मुलींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहेत. एनडीएमध्ये 25 टक्के सैनिक स्कूलच्या मुलांना प्रवेश मिळण्यासाठी शिक्षणात बदल करण्याच्या सूचनाही सैनिक स्कूलच्या प्रशासनाला दिलेल्या आहेत.

आपले सैन्य दल जगात सगळ्यात चांगले सैन्य दल आहे. सर्जिकल  ऑपरेशन हा जनतेत चर्चा करण्याचा विषय नाही सैन्यदलाचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी शेवटी म्हणाले.

00000


 

No comments:

Post a Comment