Tuesday, October 4, 2016

राज्य ग्राहक वाद निवारण आयोगातील गैर-न्यायिक सदस्यांची भरती


सोलापूर दि. 4 :-  राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई, महाराष्ट्र राज्य या कार्यालयातील गैर-न्यायिक सदस्यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, प्रशासकीय इमारतीच्या मागे, सोलापूर येथे उपलब्ध असून अर्जाची फी 100 रुपये  आहे. तसेच या पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हतेबाबतची नोटीस कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली  आहे असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या प्रबंधिकांनी कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment