सोलापूर दि. 3 : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला तसेच या दिनाचे औचित्य साधून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदे सन 2007 व 2010 याबाबत ॲड संतोष न्हावकर व ॲड. राजरत्न बनसोडे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. तर प्रा. डी. एम. बनसोडे यांनी समाजकल्याण विभागामार्फत येणाऱ्या योजनांची माहिती यावेळी दिली तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अउचणी व शंकाचे निरसन केले. याप्रसंगी श्री. रेळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सहायक आयुक्त एन. आर. चौगुले यांनी प्रास्ताविक केले तर आभार उमेश पुजारी यांनी मानले. यावेळी व्ही. पी. घुगे, दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य महादेव पाटील, श्रीरंग काटे, श्री. काझी सर, राहूल काटकर, लक्ष्मी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment