Tuesday, October 4, 2016

उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचे पुण्यात स्वागत


पुणे, दि.  (विमाका) : खडकवासला येथील केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्राच्या शतकोत्तर सोहळ्यास उपस्थित राहण्याकरिता भारताचे उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचे सकाळी १० वाजता लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आगमन झाले. त्यावेळी राज्य शासनाच्या वतीने उपराष्ट्रपतींचे  स्वागत करण्यात आले.
राज्य शासनाच्या वतीने  पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी केंद्रीय जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री उमा भारती, तसेच केंद्रीय जलस्त्रोत नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन जलसंपदा राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलियान, महापौर  प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच लष्कर व हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी विमानतळावर उपस्थित होते. 

00000





No comments:

Post a Comment