पुणे, दि. 3 (विमाका) : केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्युपीआरएस)चा शतक महोत्सव कार्यक्रम उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या प्रमुख
उपस्थितीत केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, खडकवासला पुणे येथे उद्या
मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय जलस्त्रोत, नदी
विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री उमा भारती, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण तथा जलस्त्रोत,
नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री (स्वतंत्र
कार्यभार) विजय गोयल, केंद्रीय रेल्वे आणि दूरसंचार
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनोज
सिन्हा, केंद्रीय जलस्त्रोत, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री
डॉ. संजीव कुमार बलियान उपस्थित राहणार आहेत.
00000
No comments:
Post a Comment