Tuesday, July 31, 2018

अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना निरोप

अपर पोलिस महासंचालक डॉभूषणकुमार उपाध्याय यांना निरोप

पुणेदि. 31 – येथे कारागृह विभागाच्या अपर पोलिस महासंचालक पदावर कार्यरत असणारे डॉभूषणकुमार उपाध्याय यांची बदली नागपूर पोलीस आयुक्तपदी झाली आहे.त्यानिमित्ताने विभागाच्या वतीने आयोजित समारंभात सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉविठ्ठल जाधवपश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठेपुणे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोडयेरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यूटीपवार आदी उपस्थित होते.
डॉभूषणकुमार उपाध्याय म्हणालेनिरपेक्ष वृत्तीने केलेल्या कामातून आनंद मिळतोकारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे कारागृह विभागाचा चेहरा बदलण्यास मदत झालीयामुळे विभागाची प्रतिमा उंचावली आहेपोलीस आणि बंदीजनातील सुसंवादातून त्यांच्यात सुधारणा होत असल्याचे चित्र नक्कीच सुखावह आहे.
अपर पोलीस महासंचालक या पदावर काम करत असताना डॉउपाध्याय यांच्या कारकिर्दीमध्ये अत्याधुनिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कारागृहाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली.बंदीजन व त्यांच्या नातेवाईकांसाठी गळाभेट या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आलीबंदीजनांसाठी टेलिमेडिसिन ही आरोग्य सुविधा सुरू झालीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रामुळे कारागृह विभागाची करोडो रुपयांची बचत झाली असून बंदीजनाला रुग्णालयात ने-आण करण्यातील जोखीम दूर झाली व वेळेचा अपव्ययही  टळला आहे.
कार्यक्रमास प्राचार्य एसव्हीखटावकरउप अधीक्षक राजेंद्र जोशीतुरूंगाधिकारी एसबीदराडेकेएनशेटे यांच्यासह कारागृह विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

Thursday, July 26, 2018

प्रशासकीय कामकाज पारदर्शक व अचूक होण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयांमध्ये समन्वय ठेवावा - प्रधान महालेखाकार संगीता चौरे


प्रशासकीय कामकाज पारदर्शक व अचूक होण्यासाठी  लेखापरीक्षक कार्यालयांमध्ये समन्वय ठेवावा  -         प्रधान महालेखाकार संगीता चौरे

पुणे,दि. 24-  शासनाच्या विविध कार्यालयांचे लेखापरीक्षण वेळेत आणि अचूक करुन प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी लेखापरीक्षकाच्या वरिष्ठ आणि विभागीय लेखापरीक्षण कार्यालयांमध्ये समन्वय ठेवावा, असे आवाहन प्रधान महालेखाकार संगीता चौरे यांनी केले.
भारताचे नियंत्रक तथा महालेखापरीक्षक यांच्या अधिनस्त असलेल्या मुंबई येथील प्रधान महालेखाकार लेखापरीक्षक कार्यालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाची 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात श्रीमती चौरे बोलत होत्या. यावेळी समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर,  वरिष्ठ उपमहालेखाकार (प्रशासन) उदय शिंदे, वरिष्ठ उपमहालेखाकार (बाह्यलेखापरीक्षण) टी. एस. आर. गुप्ता आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम उपस्थित होते. यावेळी लेखापरीक्षण कार्यालयात महत्वपूर्ण  सेवा बजावणाऱ्या रंगनाथ लोकापूर, दत्तात्रय बर्वे यांच्या सह तत्कालीन सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रधानमहालेखाकार संगीता चौरे यांनी लेखापरीक्षणातील विविध पैलू आणि त्यात आजवर झालेले बदल स्पष्ट केले. श्रीमती चौरे म्हणाल्या, राज्य शासनाची राज्य व विभाग पातळीवरील बहुतांशी कार्यालये पुण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे या कार्यालयांच्या लेखापरीक्षणासाठी पुणे विभागीय कार्यालय निर्माण होणे अत्यंत गरजेचे होते. ही गरज ओळखून 1 एप्रिल 1968 मध्ये नवीन मध्यवर्ती इमारतीत विभागीय लेखापरीक्षण कार्यालयाची स्थापना करण्यात आली. शासनाच्या विविध कार्यालयांच्या योजनांचे लेखापरीक्षण करुन हा अहवाल विधान सभेत सादर केला जातो, त्यामुळे या योजनांची सद्यस्थिती नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होते. या विभागाचे महत्व लक्षात घेता वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयाला वेळोवेळी भेट द्यावी.  तसेच  कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेवून त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करावे.
श्री. चोक्कलिंगम यांनी लेखापरीक्षणाचे महत्व विशद केले. ते म्हणाले, शासकीय कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा घडविण्यासाठी नियमितपणे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. कामकाज करताना कर्मचाऱ्यांकडून झालेल्या आर्थिक बाबींमधील उणीवा दाखवून देणे आणि त्या सुधारण्याच्या दृष्टीने लेखापरीक्षण करणे अत्यंत महत्वाचे असते. शासनात लेखापरीक्षक हा प्रशासकीय कामकाजातील चूका दाखवून देवून त्या वेळीच सुधारुन कार्यालयाचा कारभार पारदर्शकपणे करण्यास मदत करणाऱ्या मित्राची भूमिका पार पाडतो.
वरिष्ठ उपमहालेखाकार (प्रशासन) उदय शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू विशद केला. तर वरिष्ठ उपमहालेखाकर (सामाजिक व सामान्य क्षेत्र II) टी. एस. आर गुप्ता यांनी पुणे विभागीय कार्यालयाचे काम उत्तम प्रकारे सुरु असल्याबद्दल येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात डी.एन.बर्वे व  एस. व्ही.नेने यांनी मनोगत व्यक्त केले.  लेखापरीक्षा अधिकारी उज्ज्वला ढेकणे यांनी प्रास्ताविकातून लेखापरीक्षण कार्यालयाची माहिती दिली. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका मानसी विजापुरे यांनी केले. आभार लेखापरीक्षा अधिकारी सदाफ शेख यांनी मानले. कार्यक्रमास  पुणे विद्यापीठाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या गारगोटे, वित्त व लेखा अधिकारी श्री. जाधवराव तसेच लेखापरीक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000


‘महारेरा’मुळे बांधकाम व्यवसायात पादर्शकता आली---मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.


‘महारेरा’मुळे बांधकाम व्यवसायात पादर्शकता आली---मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

पुणे,दि.23 :- महारेरा कायद्यामुळे बांधकाम व्यावसायीक व नागरीक निश्चिंत झाले असून या कायद्यामुळे बांधकाम व्यवसायामध्ये पादर्शकता आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्वाचे योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायीकांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या विश्वकर्मा-द ड्रीम बिल्डर्स ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खा.संजय काकडे,महापौर मुक्ता टिळक, लोकमत ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा, क्रेडाई संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश मगर, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर, देशाची बांधणी करणे आवश्यक असून त्यासाठी बांधकाम व्यावसायीकांच्या समस्या दूर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायीक व शासन यामध्ये सलोख्याचे संबंध असल्यास त्याचा फायदा सर्वांना होतो. अशाप्रकारच्या चर्चासत्रातून अडचणींवर चर्चा होऊन त्यावर तोडगा काढता येतो. बांधकाम व्यावसायीकांच्या प्रकल्पांना त्वरित मंजूरी देण्यात येत असल्यामुळे बांधकाम व्यावसायीकांवरील बँकेच्या व्याजाचे ओझे कमी होण्यास मदत झाली असून पर्यावरणविषयक नियमांमुळे बांधकाम प्रकल्प बाधीत होणार नाही याबद्दल कार्य करण्यात येईल. रेरामध्ये देशातील प्रकल्पांपैकी जवळपास साठ टक्के प्रक्ल्प महाराष्ट्रात आहेत. बांधकाम व्यावसायीकांना देण्यात येणाऱ्या विविध परवानग्यांचे पीएमआरडीएकडून सुलभीकरण करण्यात येत आहे. 
महारेरा मान्यताप्राप्त प्रकल्पांवर दुर्घटना घडल्यास त्या अपघात म्हणून हाताळण्याबाबत विचार करण्यात येईल असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. 
  वृत्तपत्राला समाजातील सर्व वर्गांना सोबत घ्यावे लागते, त्यासाठी सर्वांना जे हवे ते द्यावे लागते. प्रिंट मिडीयातून विविध विषयांना प्रसिध्दी देण्यात येते त्यामुळे ज्ञान वाढते असे सांगुन, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वाटचालीमध्ये लोकमतचा मोठा वाटा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
  पालकमंत्री गिरीश बापट यांनी सामान्य नागरीक आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका लोकमत वृत्तपत्राने घेतली असल्याचे सांगितले.
            यावेळी, विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत सामाजिक जडणघडणीत महत्वाचे योगदान दिलेल्या मान्यवरांचा महाराष्ट्र लीडरशीप अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये पद्मभूषण डॉ.के.एच.संचेती,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार, ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे, ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडीत सुरेश तळवलकर, ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचा पगडी, शाल व सन्मानपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
00000











समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही- मुख्‍यमंत्री

समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही- मुख्‍यमंत्री

पुणे, दिनांक 23- आता सुराज्‍याची लढाई लढावी लागेल, नव्‍या पिढीला सुराज्‍य द्यावे लागेल.  समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही, असे स्‍पष्‍ट मत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतीवीर चापेकर स्मारक समिति यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्‍याच्‍या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.  अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्‍मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे,  क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे,क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड सतिश गोरडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या  अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे होते. 

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, जो समाज इतिहास विसरतो, त्‍याला वर्तमानकाळ असतो, मात्र भविष्‍यकाळ नसतो. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्‍या स्‍मारकातून नव्‍या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. संग्रहालयात क्रांतीकारकांची आठवण जागृत ठेवली जाणार आहे. क्रांतीकारकांच्‍या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्‍वातंत्र्य धोक्‍यात येणार आहे. देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा, असे नमूद करुन  नवीन पिढीला सुराज्‍य द्यावे लागेल, असे सांगितले. समाजाच्‍या शेवटच्‍या माणसापर्यंत विकास पोहोचल्‍याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही, असे स्‍पष्‍ट केले.
आपल्‍या भाषणाच्‍या प्रारंभी मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी क्रांतीची प्रेरणा देणा-या लोकमान्‍य टिळकांच्‍या स्मृतीला अभिवादन केले. तसेच तरुणांच्‍या मनात क्रांतीची ज्‍योत पेटवणा-या चापेकर बंधूंच्या स्मृतिला वंदन केले. आषाढी एकादशीच्‍या दिवशी आपण पांडुरंगाला स्‍मरतो. आज महाराष्‍ट्रातील 12 कोटी जनता विठ्ठल-रखुमाईसारखी असून आपले दर्शन घेण्‍याचा मला योग आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्‍याचा आहे, पांडुरंग आपल्‍या जीवनात आनंद आणो, असे भावपूर्ण उद्गार काढले.
 मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी क्रांतीवीर चापेकरांच्‍या कार्याचे स्‍मरण केले. 19 व्‍या शतकाच्‍या शेवटी पुण्‍यनगरी प्‍लेगची साथ पसरली होती. रँड नावाच्‍या इंग्रज अधिका-याने पुण्‍यातील नागरिकांवर अनन्वित अत्‍याचार केले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेवून  चापेकर बंधूंनी नागरिकांवरील अत्‍याचाराचा बदला घेतला. या संग्रहालयात अनेक क्रांतीकारकांच्‍या स्‍मृति जतन केल्‍या जातील, त्‍यापासून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यकत केला. पिंपरी-चिंचवडमधील प्रश्‍नांचा उल्‍लेख करुन मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, शास्‍तीकराचा मुद्दा महत्‍वाचा असून पूर्वलक्षी प्रभावाने शास्‍ती कर संपवणार आहे. यात काही त्रुटी असून त्‍याबाबत लवकरच बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून नियमितीकरणाचे शुल्‍क किती घ्‍यायचे याचे अधिकार महापालिकेला देऊ, असेही ते म्‍हणाले.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी क्रांतीवीर चापेकर समृती संग्रहालयाच्‍या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऐतिहासिक असल्‍याचे सांगि‍तले.  चापेकर बंधूंनी देशात आदर्श निर्माण केला. तरुणांना त्‍यापासून प्रेरणा मिळेल. पिंपरी-चिंचवडमधील प्रश्‍नांचा उल्‍लेख करुन शासन पूर्णपणे  पाठीशी राहील, असेही ते म्‍हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक एकनाथ पवार यांनी केले. यावेळी आमदार लक्ष्‍मण जगताप यांचेही समयोचित भाषण झाले. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी संग्रहालयाची माहिती दिली.
संग्रहालयाच्या तिस-या मजल्यावर प्रबोधन पर्वाचा इतिहास सचित्र दाखविण्यात येईल. यात राजा राममोहन राय यांच्या पासून महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व प्रबोधन चळवळींचा इतिहास, त्याबरोबर स्वामी परमहंस, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या सर्व चळवळींचा सचित्र इतिहास ठेवण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या पाचव्या मजल्यावर 350 आसन क्षमतेचे सभागृह असणार आहे. सहाव्या मजल्यावर स्मारक समिती अन्य उपक्रम रेकॉर्डिंग रूम, बैठक असणार आहे. यात ऐतिहासिक पुरातन काळात वापरण्यात येणाऱ्या वस्तू, भांडी, वेशभूषा, अलंकार, युद्ध कलेचे साहित्य, गडकोट, किल्ल्यांच्या प्रतिकृती,पुरातन भित्तिचित्रे यांचा समावेश असेल.त्यातून देशभरातील भारतीय संस्कृति, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे दोन हजार वर्षातील घटना आणि घडामोडींवर चिरंतन स्मृति जपणारे हे सहा मजली राष्ट्रीय संग्रहालय उभारणार आहे.
00000






Monday, July 23, 2018

‘जलयुक्त’ सारख्या योजनांमुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही. - परिवहनमंत्री दिवाकर रावते


माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘संवाद वारी’ उपक्रमाचा समारोप
पंढरपूर दि.22 : जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि शेततळे या योजनांमुळे यापुढे भविष्यात महाराष्ट्राला कधीही दुष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे व्यक्त केला.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित ‘संवाद वारी’ कार्यक्रमाचा समारोप आणि पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कृषी पंढरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री विजय देशमुख, विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आ. सुरेश धस, आ. प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,आदी उपस्थित होते.

             संवादवारीने राज्य शासनाच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. चित्रप्रदर्शन, शाहीरी पोवाडे आणि पथनाट्यांच्या माध्यमातून योजना सर्वांपर्यत पोहचतील. राज्य शासनाने शेतक-यांच्या सन्मानासाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत, जलयुक्त शिवार अभियानातून अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, येणा-या कालावधीत राज्याला दूष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वासही परिवहनमंत्री रावते यांनी व्यक्त केला.
             ‘संवादवारी’ उपक्रमाच्या माध्यमातून लाखो वारक-यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यात आल्या आहेत. कलापथक, पथनाटय, चित्ररथ व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे योजना पोहचविण्याचे काम सर्व कालाकारांनी केले आहे. पंढरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात योजनांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा सर्व वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महासंचालनालयाच्या वतीने यावेळी करण्यात आले.
            यावेळी उपस्थितांना संवादवारी उपक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. तर लोकराज्य मासिकाच्या वारी विशेषांकाच्या ध्वनीफितीचे अनावरण करण्यात आले.यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. , माजी आमदार व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


संवादवारीचे ठळक वैशिष्टे
*  आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर पालख्यांबरोबर शासकीय   
     योजनाबाबत वारक-यांशी संवाद साधणारे उपक्रम राबविण्यात आले.
* चित्ररथ,प्रदर्शन ,एलईडी व्हॅन, लोककला,पथनाट्य उपक्रम राबविण्यात आले.
*  दोन्ही मार्गावर २४ ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले.प्रत्येक ठिकाणी एक ते दोन दिवसाचे प्रदर्शन होते.
     एका प्रदर्शनात सुमारे ४० पॅनल्स होते.
* या प्रदर्शनात जलयुक्त शिवार,शेततळे,गाळमुक्त धरण,शेती ,पाणी आणि वीजपुरवठा आदी योजनांची
   आणि योजनांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे.
00000








हिंगोली जिल्ह्यातील जाधव दाम्पत्याने केली विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा



पंढरपूर दि२३आषाढी वारीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील भगवंतीकडोळी गावातील जाधव दाम्पत्याला मिळालाया मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीचीशासकीय महापूजा पहाटे संपन्न झाली.
            यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावतेजलसंपदा मंत्री गिरीश महाजनपाणी पुरवठा  स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरपशुसंवर्धन  दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरपालकमंत्री विजयकुमारदेशमुखसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेविठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉअतुल भोसलेखासदार अनिल देसाईआमदार सुरेश खाडेपंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसलेविभागीयआयुक्त डॉदीपक म्हैसेकरजिल्हाधिकारी डॉराजेंद्र भोसलेमंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            गेल्या चार वर्षापासून आषाढी वारी करणाऱ्या अनिल गंगाधर जाधव  त्यांची सुविद्य पत्नी वर्षा अनिल जाधव (रा.भगवंतीपोकडोळीताशेणगावजिहिंगोलीयांना यावर्षीचा आषाढी एकादशीच्यामहापूजेचा मान मिळालाजाधव दाम्पत्याच्या हस्तेच यावर्षीची शासकीय महापूजा करण्यात आली.
            महापूजेनंतर मंदिराच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने जाधव दाम्पत्याचा सत्कार समितीचे अध्यक्ष डॉअतुल भोसले  त्यांच्या सुविद्य पत्नी गौरवीदेवी भोसलेयांच्या हस्ते करण्यात आलामानकरी दाम्पत्याला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्यावतीने एक वर्ष मोफत एसटी प्रवास पासाचे वितरण करण्यात आले.
            यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निर्मल दिंडी पुरस्काराचे वितरण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आलेनिर्मल दिंडी प्रथम पुरस्कार संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोहळ्यातील रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक  लाव्दितीय पुरस्कार कोथळी येथील संत मुक्ताई दिंडीला तर तृतीय पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडीलादेण्यात आलातसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वारीदरम्यान उत्कृष्ठ काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपा सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉअतुल भोसले यांनी केलेतर आभार गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मानले.
******