Thursday, January 27, 2022

डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतीशील विचारवंत हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार



            मुंबईदि 27 :- "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेसाहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतीशील विचारवंत हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.

            उपमुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात, समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. 'मुक्तांगण'च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केले. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचे कार्यत्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायीमार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञपत्रकारलेखकचित्रकारशिल्पकारविचारवंतसामाजिक कार्यकर्ता असे बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिकसाहित्यिकसांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या,  'मुक्तांगणपरिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे.

0000

Tuesday, January 18, 2022

ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 



कोल्हापूर, दि. 18(जिमाका) : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही दिवंगत प्रा.एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.
यावेळी स्वर्गीय प्रा.एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास, स्नुषा संगीता, नात रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रा.पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार, लोकप्रतिनिधी, शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनीही दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
यावेळी दिवंगत प्रा.एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास पाटील यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

'दिलखुलास' कार्यक्रमात संयुक्त सुरक्षा सेवा (सीडीएस) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान याची मुलाखत

 


            मुंबईदि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान याची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआरया ॲपवर बुधवार दि. १९ आणि गुरूवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.         

            संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेचे स्वरूपत्याचा अभ्यासक्रमपरीक्षेची तयारी कशी करावीआवश्यक संदर्भ साहित्यशारीरिक चाचणी आदि विषयांची सविस्तर माहिती अपूर्व पडघान यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.                 

00000

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पुणे व नागपूर साठी 38 कोटी 58 लाख रूपयांचा निधी वितरीत


             मुंबईदि.१८ : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

          विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरीत करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाखसोलापूर जिल्ह्याला १० कोटीसातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी  ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरीत करण्यात आला आहे.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणेसोलापूरसातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरीत करण्यात आला आहे.

0000