Saturday, October 29, 2016

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती


पुणे, दि. 24 : राज्यातील इयत्ता 9 वी व 10वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जतीच्या विद्यार्थ्याना व विद्यार्थीनींना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागु करण्यात ली आहे.
            या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती व इतर अनुदानाचे दर पुढील प्रमाणे आहेत. वसतिगृहात न राहणाऱ्या अनिवासी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती रु.150, पुस्तके व तदर्थ वार्षिक अनुदान रु.750 आहे. वसतिगृहात राहणाऱ्या निवासी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती रु.350  पुस्तके व तदर्थ वार्षिक अनुदान रु.750 आहे.
    या शिष्यवृत्तीशिवाय विनाअनुदानित शाळेतील अपंग विद्यार्थी / विद्यार्थीनिकरीता अतिरिक्त भत्ते पुढील प्रमाणे आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी मासिक भत्ता, वसतिगृहात न राहणाऱ्या अपंग  विद्यार्थ्यांकरीता वाहतुक भत्ता,  अपंग  विद्यार्थींच्या सोबत्याकरीता भत्ता, अपंग विद्यार्थ्यांच्या मदतनीसाकरीता भत्ता प्रत्येकी 160 रुपये, मंदबुध्दी  विद्यार्थींकरीता शिकवणी भत्ता 240 रुपये आहे.
            योजना ऑनलाईन असल्याने http://mahaescholmaharashtra.gov.in या पोर्टलवरुन विद्यार्थ्यांनी अर्ज भरावयाचे आहेत. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ऑनलाईन भरण्यात आलेल्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रत (फ्रेश/ रिनिवल) , सक्षम प्राधिकाऱ्याचा विद्यार्थी / विद्यार्थ्यांनीचा जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दोन लाखाच्या आत उत्पन्न्असल्यास पालक नोकरी असतील र त्यांनी वार्षिक उत्पन्ना बाबत नियोक्त्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी वरील योजनेच्याबाबतीत अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्याशी संपर्क साधावा.
000



शहरात काही भागात नो पार्किंग व एकेरी वाहतूक

   
पुणे, दि.29: शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालावी यासाठी काही ठिकाणी नो पार्किंग  करण्यात आली आहेअसे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी कळविले आहे. यानुसार अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांचे व्यतिरीक्त इतर कोणतेही वाहन चालविण्यास अथवा पार्किंग बंदी करण्यात येत आहे. नो पार्कींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पिंपरी वाहतूक विभाग पुणेअंतर्गत, मुंबईपुणे  हायवेवर  पिंपरी-चिंचवड मनपा  समोर अहिल्यादेवी चौक ते पिंपरी चौक या रोडवर  पर्यत  नो-पार्किग करण्यात  येत आहे.


0000

भाऊबीजेनिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद


     पुणे, दि.29 : भाऊबीजेनिमित्त 1 नोव्हेंबर, 2016 रोजी शासकीय  सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,पिंपरी-चिंचवड  या कार्यालयांचे  कामकाज बंद राहणार आहे. तथापी,  प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे   उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,पिंपरी-चिंचवड येथे ऑनलाईन अपॉइंटमेंटद्वारे अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्या नागरीकांनी पुर्वनियोजीत अपॉइंटमेंट घेतल्या आहेत त्यांनी कामकाजाच्या पुढील सात दिवसात कोणत्याही सोयीस्कर दिनांकास कार्यालयात उपस्थित राहावे. त्या दिवशी त्यांचे शिकाऊ  अनुज्ञप्ती / पक्की अनुज्ञप्ती कामकाजाची कायर्ववाही करण्यात  येईल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे  यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

00000

विभागीय लोकशाही दिन रद्द




पुणे,दि.29: - महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक नगरपरिषद  नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीच्याआचारसंहितामुळे नोव्हेंबर  डिसेंबर 2016 महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यातआला आहेयाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावीअसे विभागीय आयुक्त पुणे यांनी प्रसिध्दीद्वारे कळविले आहे.
0000

Friday, October 28, 2016

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणे,दि.28 : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त नागरिक मोठया प्रमाणावर  बाहेरगावी जात आहेत. या कालावधीत जिल्हयातील प्रमुख मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे तसेच सातारा रोडवर वाहतुक सुरळीत रहावी, लोकांना त्रास होणार नाही, यासाठी संबधित यंत्रणांनी सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हायवे पोलीस, ग्रामीण पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते विकास महामंडळ,महसुल विभागाचे  अधिकारी यांच्या तातडीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, दिवाळी सुट्टी कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीची कोंडी होवू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. टोल नाक्यावर तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू नये लेन कटिंग होवू नये, मोठी वाहने ओव्हर टेक करु नये. वाहनाची गती प्रमाणापेक्षा जास्त राहू नये याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच हायवे पोलीसांना या कालावधीत आवश्यक उपायोजना करण्यासाठी वाहने उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले.
   सातारा रोडवर रस्त्याच्या लगत अतिक्रमण करुन विविध पदार्थाची विक्री केली जाते. यामुळेही अपघात होवू शकतो. वळण रस्त्यावर निकषाप्रमाणे सूचना फलक असले पाहिजे. त्याचप्रमाणे निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी  कठडे आहेत की नाही  याची खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी  सौरभ राव यांनी दिल्या.
            याप्रसंगी  जिल्हाधिकारी यांनी  संबधित विभागाकडून सध्या काय परिस्थिती आहे. वाहतुकीची कोंडी व अपघात टाळणेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत. आदिबाबत सविस्तर माहिती  घेतली. तसेच वाहतुकी  संदर्भात  विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यानुसार रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग, आयआरबी, आदि संबधित विभागांना आवश्यक कार्यवाही  करण्याबाबत कळविले जाणार असल्याचे सांगितले.
            तसेच दिवाळीच्या सुट्टीनंतर कायमस्वरुपी उपययोजनाची कालबध्द कार्यवाही करुन भविष्यात अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
0000000

Thursday, October 27, 2016

आधार क्रमांक नसल्यास रॉकेल मिळणार नाही


सोलापूर दि. 27 : - आधार क्रमांक रॉकेल अथवा रास्त भाव दुकानदार अथवा परिमंडळ कार्यालयाला सादर केला नसल्यास त्यांना रॉकेल मिळणार नाही, असे अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
           याबाबत अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्र लाभार्थ्यांनी 30 ऑक्टोबर 2016  पर्यंत  आधार क्रमांक उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. जे लाभार्थी 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सादर करणार नाही त्यांचा कोटा 31 जानेवारी 2017 पर्यंत रोखून  ठेवण्यात यावा. वरील कालावधीत आधार क्रमांक सादर केल्यास 31 जानेवारी 2017  नंतर त्यांचा कोटा व्यपगत हाईलजे  लाभार्थी 1 नोव्हेंबर 2016 नंतर आणि 31 जानेवारी  2017 पूर्वी आधार क्रमांक सादर करतील तेच लाभार्थी अनुदानित रॉकेलसाठी पात्र ठरतील. एक फेब्रुवारी 2017 नंतर जोपर्यंत लाभार्थी आधार क्रमांक आणि मोबाईल फोन क्रमांक सादर करणार नाहीत तोपर्यंत लाभार्थी अनुदानित रॉकेलकरीता पात्र ठरणार नाही. अशा लाभार्थ्यांना अनुदानित रॉकेल देणे बंद करण्यात येईल, असे पसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000


आधार क्रमांक नसल्यास अन्नधान्य मिळणार नाही


        सोलापूर दि. 27: -  आधार क्रमांक नसल्यास यापुढे स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नसल्याचेअन्नधान्य वितरण अधिकारी  श्रीमंत पाटोळे यांनी  पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
       श्री. पाटोळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले की , सध्या ज्या लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळत आहे, परंतु त्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेला नाही अशा लाभार्थ्यांची नावे 16 नोव्हेंबर 2016 पासून लाभार्थी यादीतून कायमस्वरूप वगळण्यात येतील. त्यांना लाभ दिला जाणार नाही. अन्न सुरक्षा अधिनियमातून लाभ घेणा-या लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत उपलब्ध करून द्यावा , असे आवाहनही श्रीमंत पाटोळे यांनी केले आहे.
                                                                   0 0 0 0


Tuesday, October 25, 2016

ध्वनीपद्रुषणाची पातळी ओलांडल्यास कारदेशीर कारवाई


पुणे, दि. 25 :  ध्वनीपद्रुषणाची पातळी मोजून कारदेशीर कार्यवाही करण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्हयातील 36 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत्यांची नावे, पोलीस स्टेशनचे नंबर, -मेल आयडी यांची माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या www.puneruralpolice.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे पुणे ग्रामीण, जिल्हा विशेष शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
      पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे नागरीकांना ध्वनी प्रदुषणाची तक्रार ते राहात असलेले पोलीस स्टेशनचे टेलिफोनवर, -मेलवर तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलाचे नियंत्रण कक्षाचे फोन नंबर 100 वर देता येईल. ध्वनी प्रद्रुषण कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होतोगुन्हा शाबितीनंतर 5 वर्षे कैद किंवा 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकतेदिवाळी, ख्रिसमस हे सण व 31 डिसेंबर दिवशी ध्वनी प्रद्रुषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे.

0000