Saturday, October 15, 2016

मतदार यादी पुनरीक्षणाची मुदत 21 ऑक्टोबरपर्यंत




सोलापूर दि. 15 :- मतदार छायाचित्र याद्यांची संक्षिप्त पुनरीक्षणाची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत वाढविण्यात झाली आहे.
                  भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार एक जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर मतदार याद्यातील दावे आणि हरकती येत्या 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत स्वीकारण्यात येतील, असे जिल्हा निवडणूक कार्यालयातील तहसिलदार टी. सी. मेमाणे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                 सोलापूर जिल्ह्यामध्ये एकुण एकंदर  3290 मतदार यादी भाग असुन प्रत्येक भागाकरीता एक प्रमाणे 3290 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्राचे ठिकाणी मोहीम कालावधी संपेतोपर्यंत कायम स्वरुपी  एका पदनिर्देशित अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. छायाचित्र मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमात अधिक पारदर्शकता यावी, या करिता फॉर्म नमुना 6 मतदार यादीमध्ये नाव सामाविष्ठ करणेसाठी आहे. नमुना 7 मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी आहे. नमुना 8 मतदार यादीतील तपशीलात बदल करण्यासाठी आहे. नमुना 8 अ विधानसभा मतदारसंघांतर्गत पत्ता बदल करण्यासाठी आहेत.
                        एका पेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नावाची नोंद करणे, लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1950 च्या कलम 17, 18 व 31 अन्वये अयोग्य आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत व मयत नावाची वगळणी करण्यासाठी  त्यांनी स्वत:हून वा कुटुंबीयांतर्फे अर्ज दाखल करावेत.
                           नागरिकांनी  दावे व हरकती स्विकारणेची मुदत दिनांक 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत वाढविण्यात आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी , सोलापूर   यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment