Monday, October 10, 2016

पुणे ग्रामीण पोलीस ठाणे अंमलदारांना अधिकार प्रदान


            पुणेदि. 10 :  पुणे ग्रामीण  पोलीस अधीक्षक डॉ.जय.जाधव  यांनी पुणे ग्रामीण  पोलीस क्षेत्रातील  पोलीस स्वाधीन अधिकारी यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम36 नुसार अधिकार प्रदान केले आहे.
            या अधिकारान्वये रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणूकीत व्यक्तीचे वागणे अगर बिभत्स व अश्लिल हावभाव किंवा वर्तन अगर कृत्याबाबत आदेश देणे, ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्चीत करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या  कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यांत येणाऱ्या लाऊड स्पिकरची वेळ, पध्दती, घ्वनी तिव्रता, आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करणे, रस्त्यावर किंवा  सार्वजनिक जागेत वाद्य वाजविणे, गाणी, संगीत ड्रम्स, ताशे, ढोल  किंवा इतर वाद्ये, हार्न वाजविणे किंवा कर्कश आवाज करणारे अन्य वाद्य वाजविण्यावर नियंत्रण ठेवणे याबद्दल लेखी अगर तोंडीआदेश देण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. हे आदेश दिनांक  20 ऑक्टोबर, 2016 रोजी  24-00 वाजेपर्यंत  लागू राहतील.
            या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील
असेही आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment