Thursday, October 6, 2016

लग्नापुर्वी एचआयव्ही चाचणीचा गावांनी ठराव करावा : देशमुख


सोलापूर दि. 06: - माळशिरस तालुक्यातील खुडुस येथील ग्रामसभेत लग्नापुर्वी एचआयव्ही चाचणी करण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठरावा करावा, असे आवाहन महिला बालविकास विभागाच्या सभापती  सौ. सुकेशिनी देशमुख यांनी केले.
                   सोलापूर जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्ग झालेल्या बालकांना सकस आहार देण्यात आला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम झाला.
                  सौ. सुकेशिनी देशमुख म्हणाल्या, एचआयव्ही संसर्ग  झालेल्या व्यक्ती सामान्य व्यक्तीप्रमाणे काम करु शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. एचआयव्ही संसर्गित बालकांना पोषक आहार देणारी सोलापूर जिल्हा परिषद  ही राज्यात पहिली जिल्हा परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.
                 या अभिनव उपक्रमास जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाख रुपये देण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर, राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक कमलाकर फड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजाराम पोवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी धर्मपाल शाहू, डॉ. किशोर इंगोले, डॉ. श्रीकांत येळगावकर, लीना राणे आदी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment