Wednesday, August 28, 2019

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने जाणून घेतली माहिती




पुणे, दि. 29: जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पूरामुळे झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सादरीकरण करून नुकसानीची माहिती दिली.
                राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आले आहे. काल संध्याकाळी त्यांचे पुण्यात आगमन झाले. आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या पथकात चित्तरंजन दास, आर.पी. सिंग, व्ही.पी. राजवेदी, मिलींद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांची दोन दिवस पाहणी करून दि. 31 ऑगस्ट रोजी पथक कोकण विभागात जाणार आहे.
                समितीसमोर झालेल्या नुकसानीची माहिती सादर करताना सचिव किशोरराजे निंबाळकर म्हणाले, या आपत्तीत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून बचाव व मदत कार्य युध्द पातळीवर केले. यावर्षी मान्सूनचे राज्यात उशीरा आगमन झाले. त्यानंतर दि. 3 ते 10 ऑगस्ट या कालावधीत कोकण आणि पुणे विभागात अतिवृष्टी झाली. या दोन्ही विभागातील भीमा आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पूरामुळे बाधित झालेल्या राज्यातील 7 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. या बाधित लोकांची 1 हजारहून अधिक शिबीरात व्यवस्था करण्यात आली. या बाधित लोकांना शासनाच्यावतीने 10 किलो तांदूळ आणि गहू तसेच रॉकेलचे वाटप करण्यात आले. तसेच बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार तर शहरी भागातील कुटुंबांना 15 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या अतिवृष्टीमुळे जीवित हानी बरोबरच वित्तीय हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शेतीचे देखील नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये बाधित अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
                पुणे विभागातील नुकसानीची माहिती देताना डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, विभागातील 58 तालुक्यांपैकी 38 तालुक्यांना पूराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये 727 गावे बाधित झाली असून 1 लाख 80 हजार 448 कुटुंबातील 7 लाख 59 हजार 595 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीत विभागातील 60 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 6, सांगली जिल्ह्यातील 28, सोलापूर जिल्ह्यातील 3 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश आहे. या आपत्तीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराचे पाणी नद्यांच्या धोकापातळीपेक्षा 7 ते 8 फुटांनी अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ते संपर्क पूर्णत: तुटला होता. सांगली व कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. या दोन्ही जिल्ह्यात बागायती क्षेत्र अधिक असून या पूरामुळे या पीकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. तसेच इचलकरंजी या शहरात असणाऱ्या हॅण्डलूम आणि पॉवरलूम या उद्योगाला याचा फटका बसला असून या ठिकाणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची पडझड झाली. शेतीसह शेतकऱ्यांच्या पशूधनाचे ही मोठे  नुकसान झाले आहे.
कोकण विभागातील नुकसानीची माहिती देताना विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड म्हणाले, 27 जुलै रोजी महालक्ष्मी या रेल्वेला पूराचा फटका बसल्याने ही रेल्वे पूराच्या पाण्यात आडकली होती. त्या दरम्यान कोकण विभागात अतिवृष्टी झाली. महाड, चिपळूण या शहरात पाणी घुसले होते. या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, पूल आदींचे मोठ्या प्रमाणात झाले. तसेच सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला. या काळात प्रशासनाने बचाव व मदत कार्यावर भर दिला. त्यांनी यावेळी झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली.   
या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशारे राम, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*****







Thursday, August 15, 2019

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिक व उपस्थितीतांना दिल्या शुभेच्छा.







राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते
पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण
स्वातंत्र्य सैनिक व उपस्थितीतांना दिल्या शुभेच्छा..
         
             पुणे दि 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर नऊ वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले.
         यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी मंत्री खासदार गिरीश बापट, संजयकाका पाटील, संजय काकडे, अमर साबळे,  माजी राज्यमंत्री आमदार दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम ,पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. 
            ध्वजारोहणानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.याशिवाय अन्य मान्यवर व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या .
राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.
             यावेळी पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव रणजितकुमार, खासदार संजय काकडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000000


Tuesday, August 13, 2019

मदत व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणार - विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर


प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

पुणे दिनांक 13 : कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणक्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा असला तरी पर्जन्यमान सामान्य आहे. या आपत्तीत आत्तापर्यंत 48 जण मृत्युमुखी पडले असून पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याचे व सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
 आता पूर ओसरलेला आहे, आमच्यापुढे आव्हान आहे, ते मदत व पुनर्वसनाचे! या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सार्वजनिक बांधकाम, कृषि विभाग, विद्युत विभाग, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  दिनांक 13 मे 2015 च्या शासन निर्णयात आपत्ती प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक विभागाने काम करावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम करावे, असे सांगितले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, सध्या पूरपरिस्थिती  निवळत आहे. सध्या सांगली येथे नदी पातळी धोका पातळीच्या केवळ 4 इंचावरुन वाहत आहे तर कोल्हापूरमध्ये धोका पातळीच्या 1 फूट 11  इंचावरून वाहत आहे.  मात्र सध्या धरणक्षेत्रात पाऊस सामान्य असल्याने ही पूर पातळी झपाट्याने उतरणार आहे.
धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक 25 हजार 287 क्युसेक असून 27 हजार 265 क्येसेक इतका पाण्याचा विसर्ग आहे. कर्नाटक मधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक असून धरणात 6 लाख 11 हजार 970 क्युसेक इतकी आवक आहे .दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पुढच्या काही तासात सामान्य होईल.
 या पूरस्थितीत पुणे विभागात एकूण 48 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21, कोल्हापूर जिल्ह्यात 10, सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी 7 तर सोलापूर जिल्ह्यातील 3 व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1 हजार 448 घरांची अंशत: पडझड झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 236 घरांची अंशतः 268 घरांची पूर्णतः तर 313 गोठ्यांची पडझड झाली आहे.
 कोल्हापूर मधील काही भागात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. शासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयात जमा झालेली मदत पूरग्रस्त भागांना पाठवण्यात आली आहे.  यामध्ये 24 ट्रक कोल्हापूरला, 19 ट्रक सांगली जिल्ह्याला पाठवण्यात आली आहे. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जमा झालेली 6 लाख 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे जमा करण्यात आली आहे
बाधित क्षेत्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 732 वीज ग्राहकांची तर सांगली जिल्ह्यातील 48 हजार 255 वीजग्राहकांच्या खंडित वीज पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणाची विविध पथके वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत. त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यातील बँकिंग सेवा ही पूर्ववत होत आहेत, सर्व बँकेत व एटीएममध्ये  आवश्यक असणाऱ्या रकमेचा भरणा करण्यात आला आहे.  त्याचबरोबर बाधित क्षेत्रातील बंद रस्ते व पुलांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात मोठ्या प्रमाणात यश येत आहे तसेच एसटीची सांगली जिल्ह्यातील 22 मार्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील 20 मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
 सध्या पूरस्थिती सामान्य होत असून शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान व पाच हजार रोख रक्कम सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात सुरुवात केली आहे, उर्वरित ठिकाणी ही रक्कम देण्यात येणार आहे. स्वच्छतेबरोबरच आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून 302 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे. पूर ओसरताच बाधीत क्षेत्रातील शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मृत जनावरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. जनावरांची विल्हेवाट लावण्यात येत असून जनावरांच्या आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले
000000



  

Monday, August 12, 2019

जीवनावश्यक सेवा पुरविण्याबरोबरच पुनर्वसनाच्या कामाला विशेष प्राधान्य - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर




5 हजारांच्या रोख मदतीचे उद्यापासून वाटप;स्वच्छतेच्या कामांना सुरूवात

पुणे दि. 11: पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूर झपाट्याने ओसरत असला तरी अजूनही तेथील नद्या धोकापातळीच्या वरुन वाहत आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली असून सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांसह पूलांची कामे करून त्यांच्याशी संपर्क पूर्ववत प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. बाधीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छतेसह पशूवैद्यकीय सेवा विशेष प्राधान्याने देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. तसेच जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर कमी झाला असून अलमट्टी धरणातून 5 लाख 70 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, मात्र धरणात 6 लाख 11 हजार क्युसेक एवढी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या नद्या अजूनही धोका पातळीच्यावर सरासरी पाच फूट वाहत आहेत. विभागातील 147 रस्ते बंद असून 66 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूरशी रस्ते वाहतूक सुरु झाली असून पुणे-बंगळुरू महामार्गावरुन जीवनावश्यक सेवेची वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांनाच सोडण्यात येत आहे.
95 हजार 206 कुटंबांचे स्थलांतर
पुणे विभागातील 584 बाधीत गावातील 95 हजार 206 कुटुंबातील एकूण 4 लाख 74 हजार 226 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची 596 निवारा केंद्रात त्यांची सोय केलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 855, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 678, सातारा जिल्ह्यातील 10 हजार 755, सोलापूर जिल्ह्यातील 29 हजार 777 तर पुणे जिल्ह्यातील केवळ 161 लोकांचा समावेश आहे. पुरामुळे विभागात एकूण 43 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 लोक, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 7 लोक तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. सांगली शहरात रविवारी रात्री उशीरा दोन पुरूषांचे मृतदेह अढळून आले असून अद्यापी त्यांची ओळख पटलेली नाही.
वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर
महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पुरामुळे 30 उपकेंद्रातील 412 वाहिन्या, 9 हजार 489 रोहित्रे व 3 लाख 29 हजार 603 ग्राहक बाधीत झाले आहेत. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 72 हजार 921 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता नसल्याने कृषक रोहित्रांऐवजी घरगुती वापरांसह इतर प्रकारच्या बंद रोहित्राच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंद असणारा वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणच्या बाहेरील पथके बाधीत क्षेत्रात पाहोचली असून त्यांनी काम सुरु केले आहे.
313 एटीममध्ये 25 कोटींचा भरणा
पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांकडील पासबुक, चेकबुक खराब झाले असल्याचे गृहीत धरून मदत देताना बँकांनी युआयडीच्या माध्यमातून बाधीतांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानापैकी 5 हजार रुपयांची मदत प्रत्येक कुटंबांना मंगळवार पासून रोख स्वरूपात देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच बाधित क्षेत्रातील 469 एटीएम पैकी बंद एटीमए यंत्रे दुरूस्त करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सध्या 313 एटीएम मशिन सुरळीत करण्यात यश आले असून त्यांच्यामध्ये 25 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.  तसेच एसबीआय व ट्रेझरी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही मृत जनावरांचे स्वतंत्र शवविच्छेदन न करता संबंधित बाधीतांना वीमा रक्कम मंजूर करण्याच्या सूचना वीमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही.
पाणीपुरवठा योजनांच्या दुरूस्त्यांवर भर  
पुणे विभागातील बाधीत झालेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. सध्या मीरज शहराच्या पाणी पुरवठा योजनेतून सांगली शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे तर कोल्हापूर शहराला शिवाजी विद्यापीठाच्या पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठा केला जात आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरांचा पाणीपुरवठा दोन दिवसात सुरू होईल. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करण्यात येणार आहेत.
स्वच्छतेच्या कामासाठी ‘बीएमसी’ची मदत  
पुरामुळे बाधीत झालेल्या ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून येत्या चार ते पाच दिवसात ती प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेचे पथक दाखल झाले असून त्यांनी मनुष्यबळासह यांत्रिक साहित्य पुरविले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छता कार्मचाऱ्यांची टीम व साहित्य बाधीत भागात रवाना करण्यात आले आहे.
मदतीचे स्टँडर्ड किट...
सामाजिक संस्थांसह वैयक्तिक लोकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. मात्र मदतीच्या माध्यमातून देण्यात येणारे साहित्य पूरग्रस्तांपर्यंत योग्य रित्या वेळत पोहोचविण्यासाठी शासनाच्यावतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक संस्था, सामाजिक संस्था मदतीचे साहित्य आणून देत आहेत. मात्र ते साहित्य तातडीने पूरग्रस्तांना उपयोगी पडावे यासाठी शासनाच्यावतीने मदतीचे एक स्टँडर्ड कीट तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये टूथपेस्ट, साबणापासून तयार स्वयंपाकाचे सर्व साहित्य असणार आहे. एका किट मधील शिधा एका कुटुंबाला किमान एक आठवडा पुरेल इतका आहे, लागल्यास अतिरिक्त शीधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मदतीचे स्टँडर्ड किट तयार करून देण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना करण्यात आल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

****

Saturday, August 10, 2019






विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली
चालणार मदत व पुनर्वसनाचे काम
पुणे दि. 10 : पुणे विभागात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव, मदत व पुनर्वसनाचे काम सुनियोजीतपणे चालण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना सर्वाधिकार दिले आहेत.
मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे देशभरातून आलेल्या राष्ट्रीय प्रतिसाद दल, भारतीय वायूसेना, थल सेना, राज्य आपत्ती प्रतिसाद दल व इतर प्रतिसाद यंत्रणा यांना पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व तुकड्यांच्या नियुक्त्या, जीवनावश्यक वस्तूंचे नियंत्रण, पूरस्थितीनंतर करावयाचे मदत व पुनर्वसन आपल्या अधिपत्याखाली करण्यात यावे.  
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा होणारी रक्कम, सार्वजनिक विश्वस्त संस्था, खासगी व्यक्ती, विविध मंदिरे, सी.एस.आर. व इतर स्त्रोतातून वस्तू स्वरूपात जमा होणाऱ्या वस्तू, औषधे याबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करावे. तसेच पूरस्थितीत मदत छावणीत आश्रय घेतलेल्या व्यक्तींच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था, अन्नधान्य, कपडे, औषधोपचार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनानूसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असे पत्रात म्हटले आहे.
****





मदतीसह जीवनावश्यक साहित्यांची वाहतुक करणाऱ्या
वाहनांसाठी महामार्गावर स्वतंत्र ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था
-         विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Ø  पुणे विभागातील 585 गावातील 85 हजार 119 कुटुंब बाधीत
Ø  पुणे विभागातील 4 लाख 13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
Ø  सांगली सोलापूर जिल्ह्यातील 30 हजार 515 जनावरांना सुरक्षित स्थळी हलविले
Ø  सांगलीला 80 कोल्हापूरला 150 सातारा 72 अशी एक 302 वैद्यकीय पथके कार्यरत
Ø  अलमट्टीतून 5 लाख 30 हजार क्युसेकचा विसर्ग
Ø  एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
Ø  विभागातील 203 रस्ते व 94 पुलांवरील वाहतूक बंद
Ø  पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग अजूनही बंद

पुणे दि. 10: पुणे विभागात पावसाचा जोर कमी झाला असून कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने विभागातील पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. विभागातील 4लाख 13 हजार 945 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थानांतर करून त्यांची  535 शिबीरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता बाधीत कुटुंबांना ‘युआयडी’च्या आधारावर ओळख ग्राह्य धरून शासनाकडून आलेले सानुग्रह अनुदान तातडीने देण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंसह मदत व बचावाच्या वाहनांना पुण्यापासून कोल्हापूर व सांगलीपर्यंत महामार्गावर स्वतंत्र ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
पुणे विभागातील पूरस्थितीसह बचाव व मदत कार्याची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर ओसरला हवामान विभागाच्यावतीने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही. कोयना धरणासह इतर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून 5लाख 30 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र कर्नाटकमधील घटप्रभा नदीच्या क्षेत्रात पाऊस पडल्याने या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून कृष्णेसह इतर नद्यांच्या पाण्यामुळे अलमट्टी धरणात 6 लाख क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास येत्या 72 तासात पाणी ओसरायला सुरुवात होणार आहे.


मदत व पुनर्वसनासाठी प्रशासन सज्ज
विभागातील पूरस्थिती निवळल्यानंतर स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागाची स्वच्छता करण्यासाठी विशेष मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. तसेच शहरातील अनेक शौचालये पुरामुळे बाधीत झाल्यामुळे फिरती शौचालये पुरविण्यात येणार आहेत. मदत व पुनर्वसनाच्या कामांना गती देण्यासाठी शासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 15 तर सांगली जिल्ह्यासाठी 13 विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
पूरस्थितीनंतर येणाऱ्या रोगराईवर व इतर आरोग्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पूरबाधित गावात विशेष आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून ही वाहतूक सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा जीवनावश्यक साहित्याच्या वाहनांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पुरामुळे पाण्यात असलेल्या पुलांची व रस्त्यांची पाहणी करूनच सर्वसामान्य वाहनांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

पुणे विभागातील पूर स्थिती (दिनांक 10.8.2019रोजी दुपारी  3.50 वाजेपर्यंत)

पाऊस
जिल्हा
प्रत्यक्ष झालेला पाऊस
पावसाची टक्केवारी
अतिवृष्टी/पूर परिस्थिती असलेले तालुके
सांगली
526.72
224
निरंक
कोल्हापूर
1553.95
128
3(राधानगरी,.बावडा    चंदगड)
सातारा
993.76
183.71
2(जावळी महाबळेश्वर )



धरणातील पाणीसाठा/पाणीपातळी विसर्ग
धरण
साठाक्षमता
पाणीपातळी
आवक
जावक/विसर्ग
कोयना
102.75
2161’07
44357
44853
अलमट्टी

517.30 m
600833
530000




पाणी पातळी (फुट इंचामध्ये)
स्थळ
धोका पातळी
कालची पाणीपातळी
आजची पाणीपातळी
वाढ/घट
कराड पूल




आयर्विन पूल
45’
57’3
55’10
1’5 घट
अंकलि पूल
50’3
62’4
61’7
0’7 घट
राजाराम बंधारा
43’
52’5
51’8
0’9 घट
राजापूर बंधारा
58’
62’4
62’8
0’4 वाढ


स्थानांतरित कुटंबे
.क्र.
जिल्हा
बाधित तालुके
बाधित गावे
स्थानांतरीत कुटूंबांची संख्या
स्थानांतरीत व्यक्तींची संख्या
स्थानांतरीत व्यक्तींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा केंद्र संख्या
1
सांगली
4
108
28,537
1,43,641
117
2
कोल्हापूर
8
249
48,588
2,33,150
187
3
सातारा
8
128
2180
10031
128
4
पुणे
1
1
31
161
1
5
सोलापूर
6
99
5783
26962
102
एकूण
27
585
85,119
4,13,945
535




पुराने वेढल्यामुळे संपर्कहीन गावे
.क्र
जिल्हा
बाधित तालुक्यांची संख्या
संपूर्ण संपर्क तुटलेल्या गावांची संख्या
संपूर्ण संपर्क तुटलेल्या व्यक्तींची संख्या
तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविलेल्या लोकांची संख्या
1
सांगली
3
28(मिरज-6,वाळवा-2,पलूस-20)


2
कोल्हापूर
4
18(शिरोळ-9,.बावडा-1,करवीर-3,हातकणंगले-5)
58,690
47,401
3
सातारा
0
0
0
0
4
सोलापूर
2
16
8147
8147
5
एकुण
8
47



पुरामुळे मयत व्यक्ती
.क्र.
जिल्हा
पुरामुळे मयत व्यक्तींची संख्या
पुरामुळे बेपत्ता व्यक्तींची संख्या
1
सांगली
12
8
2
कोल्हापूर
4
1
3
सातारा
7
1
4
पुणे
6
0
5
सोलापूर
1
0
एकूण
30
10

सांगली जिल्हयामध्ये ब्रम्हनाळ (ता.पलूस) येथून खटावच्या दिशेने जाणाऱ्या बोट दुर्घटनेत 9 महिला, 1 पुरूष 2 लहान बालक असे एकुण 12 व्यक्ती मृत पावले आहेत. अजूनही 6 व्यक्ती बेपत्ता आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून जाऊन 1 व्यक्ती अंगावर झाड पडून 1 व्यक्ती अंगावर भिंत पडून मयत झाली आहेत.



अतिवृष्टीमुळे पशुधनाचे नुकसान
.क्र
जिल्हयाचे नाव
वर्गनिहाय पशुधनाचा तपशील (संख्या)
नुकसानीची अंदाजित रक्क्म (रुपये)


गाय वर्ग
महिष वर्ग
(लहान पशुधन)
(वासरे गाय)
शेळी
मेंढी
कोंबडया
इतर

1
सांगली
9
5
3
6
0
2700
0
12,12,000
2
कोल्हापूर
10
14
0
29
0
5800
0
0
3
सातारा
1
4
3
3
0
2100
0
5,83,000
4
पुणे
0
0
0
0
0
0
0
0
5
सोलापूर
0
0
0
0
0
0
0
0
एकुण पुणे विभाग
20
23
6
38
0
10,600
0
17,95,000

मदत बचावकार्य-
एनडीआरएफ/ एसडीआरएफ/टेरिटोरल आर्मी/ नेव्ही/ एनजीओ जिल्हा प्रशासनकडील पथके
जिल्हा
पथके
बोटी
जवान
सांगली
37
95
569
कोल्हापूर
48
74
456


अन्नधान्य वितरण
शासनाने अतिवृष्टी पुरामुळे बाधीत कुटूंबाना अन्नधान्य वितरीत करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयानूसार प्रतिकुटूंब 10 किलो गहू 10 किलो तांदुळ मोफत पुरविण्या येणार असून त्याचे नियोजनही करण्या आले आहे. सदयस्थितीत मदत कॅम्पमधील स्थलांतरीत व्यक्तींना शिजवलेले अन्नपाणी इतर जीवनावश्यक साहित्यही पोहोचविण्यात येत आहे.

वाटप करण्यात आलेले मदत साहित्य-
.क्र
साहित्य
एकुण
1
बिस्किट पाकिटे
61,740
2
पिण्याचे पाणी बॉटल
43,800
3
दुध पावडर पाकिटे
2500
4
औषधे
3000 कॅप्सूल
5
मेणबत्त्या
3600
6
फुडपाकिटे
21,600
7
सोलर लाईट
1500


1.भारतीय जनसंविधान मंच कोल्हापूर कॉलींग या संस्थेमार्फत 4000 बिस्किट पाकिटांचा कोल्हापूरमध्ये पुरवठा केला असून कोल्हापूर शहरामधील कॅम्पमध्ये या संस्थेमार्फत 2 वेळचे जेवण दिले जात आहे.
2.ल्हापूर जिल्हयामध्ये गोकुळ डेअरी मार्फत 24 तास मोफत दुध पुरवठा करण्यात येत आहे. येथे कोणीही येवून दुध घेऊन जाऊ शकतात.
3.सांगली कोल्हापूर जिल्हयातील सर्व हॉस्पीटल हे रुग्णांना मोफत सेवा पुरवित आहे.




12. महावितरण-
प्रादेशिक कार्यालय, महावितरण, पुणे अंतर्गत पुरग्रस्त भागात जिल्हानिहाय विदयुत पुरवठा खंडीत माहिती
.क्र
जिल्हयाचे नाव
उपकेंद्र संख्या
वाहिनी संख्या
रोहित्र संख्या
ग्राहक संख्या
1
पुणे
0
0
1378
12,276
2
कोल्हापूर
17
152
3570
1,17,644
3
सांगली
14
167
2607
1,33,700
4
सातारा
1
2
821
10,397
5
सोलापूर
0
1
1956
22,613

पुणे विभाग एकुण
32
322
10,332
2,96,630

कोल्हापूर जिल्हयातील 9 उपकेंद्र, 453-रोहित्रे 56 हजार 326 ग्राहकांची वीज सेवा सुरू केली आहेत. तसेच सांगली जिल्हयातील 1-उपकेंद्र , 217-रोहित्र 10 हजार 404 ग्राहकांची सेवा सुरू केले आहेत. पाणी कमी होताच कोल्हापूर सांगली जिल्हायातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यसाठी लागणारे साहित्य जसे की, पोल,रोहित्र,मीटर,. तयार ठेवण्यात आले आहेत.
कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक 7875769103 सांगली जिल्हयासाठी 7875769449 कळविण्या आला आहे. स्थानांतरित केलेल्या मदत कॅम्पमध्ये वीजपुरवठा देण्यासाठी विदयुत जनरेटरची सोय करण्या आली आहे.


विभागातील बंद पुल व रस्ते
.क्र.
जिल्हा
बंद रस्त्यांची संख्या
पुराच्या पाण्यामुळे बंद असलेल्या पुलांची संख्या
दरड कोसळल्यामुळे बंद असलेल्या रस्त्यांची संख्या
1
सांगली
66
33
0
2
कोल्हापूर
91
39
2
3
सातारा
5
5
0
4
पुणे
8
3
2
5
सोलापूर
33
14
0

एकुण
203
94
4
सांगली :- सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 29 प्रमुख जिल्हामार्ग 37असे एकुण 66 रस्ते बंद आहेत.
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयामध्ये 30 राज्यमार्ग 61प्रमुख जिल्हामार्ग असे एकुण 91रस्ते बंद आहेत.



अतिवृष्टीमुळे राज्यपरिवहन महामंडळाच्या द्द करण्यात आलेल्या फे-या (मार्गांची संख्या)
.क्र
जिल्हा
फे-याची संख्या)
(मार्गाची संख्या)
1
सांगली
8060
43
2
कोल्हापूर
29517
31






पुणे विभाग- जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
.क्र
जिल्हा
नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाव
भ्रमणध्वनी क्रमांक
1
सांगली
0233-2600500
श्री रफिक नदाफ
9096707339
2
कोल्हापूर
0231-2652953/2652950
श्री संकपाळ
9823324032
3
सातारा
02162-232175/232349
श्री देविदास ताम्हाणे
9657521122
4
पुणे
020-26123371
श्री विठठल बनोटे
8975232955
5
सोलापूर
0217-2731012
श्री बडे
9665304124
6
विभागीय नियंत्रण कक्ष पुणे
020-26360534
श्री एस एस भोंग
9730701205


पूर परिस्थिती मधील मयत/बेपत्ता व्यक्तींची माहिती
जिल्हा-सांगली -मयत व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचे ठिकाण
लिंग
वय
शेरा
1
गंगुबाई भिमा सलगर
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
60




बोट दुर्घटना एकूण मयत संख्या -12
स्त्री -11
(2 लहान मुली)
पु.-01
2
बाबूराव आण्णा पाटील
ब्रम्हनाळ ता.पलूस
पु
65
3
वर्षा भाऊसो पाटील
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
40
4
लक्ष्मी जयपाल वडेर
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
65
5
कस्तूरी बाबासाहेब वडेर
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
35
6
राजमती जयपाल चौगुले
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
62
7
कल्पना रविंद्र कारंडे
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
35
8
सुवर्णा उर्फ नंदा तानाजी गडदे
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
35
9
राजवीर आप्पासो टनटटी
ब्रम्हनाळ ता.पलूस
पु.
4 महिने
10
सोनाली आप्पासो घटनटटी (अश्विनी नरुटे यांचे बाळ)
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
4
11
सुरेखा मधुकर नरुटे
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
45
12
रेखा शंकर वावरे
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
40

जिल्हा-सांगली -बेपत्ता व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचे ठिकाण
लिंग
वय
शेरा
1
सौरव तानाजी गडदे
ब्रम्हनाळ ता.पलूस
पु.
8

बोट दुर्घटना एकूण बेपत्ता संख्या
पु- 03 (एक लहान मुलगा)
स्त्री-03 (एक लहान मुलगी)
2
सुनिल शंकर रोगे
ब्रम्हनाळ ता.पलूस
पु.
33
3
आमसिध्द महादेव नरुटे
ब्रम्हनाळ ता.पलूस
पु.
16
4
कोमल मधुकर नरुटे
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
21
5
मनिषा दीपक पाटील
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
31
6
क्षिती दिपक पाटील
ब्रम्हनाळ ता.पलूस
स्त्री
4
7
सचिन दत्तात्रय पोळ
कडेगांव
पु.
35
पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
8
दत्तात्रय तुकाराम सावंत
मिरज
पु.
55



जिल्हा-कोल्हापूर-
मयत व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचे ठिकाण
लिंग
वय
शेरा
1
केशव बाळु पाटील
इटे ता.आजरा
पुरुष
55
ओढयाच्या पाण्यात वाहून
2
गंगुबाई शामराव सोरटे
केर्ले ता.करवीर
स्त्री
80
अंगावर भिंत पडून
3
जिजाबाई एकनाथ खोत
देळेपैकी संकपाळवाडी ता.भुदरगड
स्त्री
50
पुराच्या पाण्यात वाहून
4
जिजाबाई बडकु कडुकट
हलकर्णी ता.चंदगड
स्त्री
55
झाड अंगावर पडून

बेपत्ता व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचे ठिकाण
लिंग
वय
शेरा
1
आवाक्का शंकर भोसले
ता.गडहिंग्लज
स्त्री

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने


जिल्हा-सातारा-
एकुण  मयत 7 त्यापैकी नावे प्राप्त झालेल्या व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचे ठिकाण
लिंग
वय
शेरा
1
धिरज शिंगटे
रा.मर्ढे
पुरुष


2
लता चव्हाण
कामथी तर्फ परळी
स्त्री


3
सागर आत्मारात बल्लाळ
वेंढवाडी
पुरुष



जिल्हा-सातारा 
बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचे ठिकाण
लिंग
वय
शेरा
1
सतीश सोमा कचरे
मौजे नायगाव, ता.खंडाळा
पु.
43
दुचाकी वाहनासोबत नायगाव ते केसुर्डी  दरम्यान पुलावरुन वाहत्या पाण्यासोबत वाहून गेल्याने


जिल्हा-पुणे
 मयत व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचे ठिकाण
लिंग
वय
शेरा
1
कुणाल अजय दोडके
मावळ
पु

घरावरचे छत पडून
2
श्रीराम दर्ज सोहू
मावळ
पु

धबधब्याखाली मृत्यू
3
जयप्रकाश नायडू
मावळ
पु

घरावरचे छत पडून
4
नजमा सलिम शेख
जुन्नर
स्त्री

ढिगा-याखाली मृत्यू
5
कौशल्या चंद्रकांत खान
पुरंदर
स्त्री

नदीपात्रात पाय घसरून
6
कबाल बाबु खान
दौंड
पु

पुरात वाहून गेलेने



जिल्हा-सोलापूर-
मयत व्यक्तीची माहिती
.क्र.
व्यक्तीचे नाव
राहण्याचा  पत्ता
लिंग
वय
सदयस्थिती
1
संतोष विष्णू पाटोळे
मौजे वाघोली ता.माळशिरस
पु
42
मयत


****