Saturday, August 29, 2020

पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा : पालकमंत्री भरणे

 

कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचारासाठी उपाययोजना

               पंढरपूर.दि.29:. कोविड बाधित आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी समन्वय अधिकारी नेमावा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथे दिल्या.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.बैठकीस आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, आदी उपस्थित होते.

आमदार भालके यांनी  कोविड विषाणूची बाधा झालेले आणि न झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. काही खाजगी डॉक्टरांकडून सामान्य रुग्णांवर उपचाराला नकार दिला जातो. त्यामुळे  सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचारा पासून मुकावे लागत आहे. यावर तोडगा काढला जावा, असे त्यांनी सांगितले. यावर समन्वय अधिकारी नेमला जावा. त्याने कोविड बाधित रुग्णांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, आणि अनुषांगिक माहिती नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

           पंढरपूर येथे 65 एकर परिसरात उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर मधून कोरोना बाधित रुग्णांच्या वेळीच उपचार होतील. या सेंटरला आणि तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना आवश्यकती मदत आणि निधी  जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल असेही,श्री भरणे यांनी सांगितले. कोविडच्या कालावधित चांगले काम करणाऱ्या आशा वर्कर यांच्या मानधनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हॉस्पिटल यांना आक्सिजनचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा वेळेत होईल. कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल येथे आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि औषधे पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. पंढरपूर येथे लवकरच समन्वय अधिकारी नियुक्त केला जाईल असे त्यांनी सांगितले. 

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या  विविध उपाययोजना व सोयी, सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिली.

           यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, डॉ.केचे आदी उपस्थित होते. 

                                                    0000000

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे -पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

 








       

 पुणे दि.29- पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावेअसे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी  केले.

             पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवेअपर पोलीस आयुक्त संजय शिंदेपोलीस उप आयुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

            पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणालेकोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या  व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी.  पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे.  पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना  ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतोअसेही ते म्हणाले.

            यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवेमोहिम नलावडेराहुल तुपेवैभव लोढाअजय मुनोतराहुल लंगर,जमीर शेखअवधुत दिवटेवैभव भाकनकुणाल तोडीमोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

            पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणालेआपण सर्वांनी सगळया शंका-कुशंकांवर मात करुन अनेकवेळा प्लाझ्मा दान केले आहे. तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे. ही मोहीम शहराबरोबरच ग्रामीण भागातही राबवावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावेअशी भावना त्यांनी  व्यक्त केली.

            यावेळी प्लाझ्मा दाते अजय मुनोतराहुल लंगरवैभव भाकन व प्लाझ्मा स्वीकारणारे संदिप सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.

            पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना म्हणालेकोरोनावर मात करण्यासाठी पुणे शहर पोलीस विभागाने प्लाझ्मा थेरपी हा चांगला उपक्रम हाती घेतला असून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केलेल्या आवाहनामुळे 405 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मदतीचा हात पुढे करुन प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. यामुळे प्लाझ्मा दाता एक मोठी चळवळ होऊ शकेल. उपस्थितांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आभार मानले.

            यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारीकर्मचारीप्लाझ्मा दाते व प्लाझ्मा स्वीकारलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

००००

Friday, August 28, 2020

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील 'कोरोना' प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा







        पुणे, दि. 28 :  कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे यंत्रणांनी नियमभंग करणा-यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले.  कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

              विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. सुभाष साळुंखे, डॉ.दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे.  सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे, हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी  दिले.

             कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील डॉक्टरांना तज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यादृष्टिने कार्यवाही करावी. कोरोना कालावधीत पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत, त्यातील बाधित पोलिसांच्या तसेच कार्यरत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

        प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर, संपर्क व्यक्ती शोध, प्रतिबंधित क्षेत्र, बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता, 60 वर्षेवरील व सहव्याधी सर्व्हेक्षण, रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णांचे बील व्यवस्थापन याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार  सुविधाही पुरेशा प्रमाणात असल्याचे  सांगितले.

                  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

            पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

***

मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

 ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद

मास्क न वापरणारेसुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई करा

                -उपमुख्यमंत्री अजित पवार

  जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा

 ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक जनजागृती करावी

 कोरोनासोबतच पावसाळयाच्या कालावधीतील आजाराबात अधीक दक्षता घ्या








        पुणेदि.28: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतूगत काही दिवसात जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छतामास्कचा वापर व सुरक्षित आंतर व शासनाच्या निमयमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. मास्क न वापरणारेसुरक्षित आंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

 ‘कोविड-१९’ विषाणू  उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळेखासदार श्रीरंग बारणेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेआमदार सर्वश्री दिलीप मोहितेसुनिल शेळकेजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारेविभागीय आयुक्त सौरभ रावजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखजिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पुणेपिंपरी चिंचवड महानगरात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्रपणे अधिका-यांची नेमणूक करावीकोरोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेवून कार्यवाही होणे अपेक्षित आहे जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल,असे त्यांनी सांगितले.

कोरोनासोबतच पावसाळयाच्या कालावधीतील आजाराबात अधीक दक्षता घेण्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावीतसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ॲप तयार करावेअसे निर्देशही त्यांनी दिले.

            राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणालेग्रामीण भागातील रुग्णालयातील आवश्यक सोई सुविधांची वाढ करावी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता असावीकोरोना प्रतिबंधासोबतच उपचाराच्या सुविधांबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.

            यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार खासदार श्रीरंग बारणेआमदार सर्वश्री दिलीप मोहितेसुनिल शेळकेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेउपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

                        विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणेपिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेले जम्बो रुग्णालयांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाला प्राधान्याने उपचार देण्यात येतीलउपचारापासून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाहीयाची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.

             जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णकोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थितीआरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.

             यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

        ००००००

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी -उपमुख्यमंत्री अजित पवार

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील 'कोरोना' प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा

        पुणे, दि. 28 :  कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे यंत्रणांनी नियमभंग करणा-यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले.  कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

              विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. सुभाष साळुंखे, डॉ.दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे.  सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे, हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी  दिले.

             कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील डॉक्टरांना तज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यादृष्टिने कार्यवाही करावी. कोरोना कालावधीत पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत, त्यातील बाधित पोलिसांच्या तसेच कार्यरत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

        प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर, संपर्क व्यक्ती शोध, प्रतिबंधित क्षेत्र, बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता, 60 वर्षेवरील व सहव्याधी सर्व्हेक्षण, रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णांचे बील व्यवस्थापन याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार  सुविधाही पुरेशा प्रमाणात असल्याचे  सांगितले.

                  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

            पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

***

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार













  पुणे दि.28- कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची  कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

      बाणेर येथील पुणे महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, माजी महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त सौरभ राव,  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश  देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना बाधित  रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड रुग्णालये सुरु करण्यात येत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. रुग्णालयाच्या उभारणीमध्ये उद्योजक, महानगर पालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या कोविड रुग्णालयामुळे पुणेकरांना याचा चांगला उपयोग होईल. आपण सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन  केले पाहिजे.  जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असेही ते म्हणाले.  हे कोविड रुग्णालय उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिशय चांगले रुग्णालय उभारल्याबद्दल मी पुणे महानगर पालिकेला  प्रथम शुभेच्छा देतो. ज्यांनी या कामासाठी मदत केली त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली असून पुणे महानगरपालिकेने जास्तीत जास्त तपासण्या करुन कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, असेही ते म्हणाले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

००००

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू उपमुख्यमंत्री अजित पवार

 












 

पुणेदि. 28- कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकारराज्य सरकारपुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्यादृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकूअसा  विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  व्यक्त केला.

         पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटोक्लस्टरचिंचवड येथील कोविड-19 रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसखासदार श्रीरंग बारणेआमदार चंद्रकांत पाटीललक्ष्मण जगतापमहेश लांडगेसंग्राम थोपटेअण्णा बनसोडेपिंपरी-चिंचवड  महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरेउपमहापौर तुषार हिंगेस्थायी समितीचे सभापती संतोष लोंढेसत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाकेविरोधी पक्षनेते विठ्ठल काटेविभागीय आयुक्त सौरभ रावपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसेजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकरपिंपरी-चिंचवडचे पोलीस अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळेपोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठपिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटीलअजित पवारप्रविण तुपे यांच्यासह आजी माजी महापौरनगरसेवक आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारीडॉक्टरकर्मचारी उपस्थित होते.

         उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेपिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जातीधर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेतकमी खर्चात उपचार मिळाले पाहिजेखाटांची कुठेही कमतरता पडणार नाहीयाची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचारांती जादा देयक आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरीता शहरासह ग्रामीण भागात पथके तयार करुन देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना विरुध्दच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याचादृष्टिने संशोधन सुरु आहेही निश्चितच आशादायी बाब आहे.

       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवानिमित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी कोठेही गर्दी न करतासामाजिक अंतर पाळतनियमित मास्क वापरुन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरे  करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या संकटकाळात पोलीसडॉक्टरप्रशासनसेवाभावी संस्था तसेच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय  चांगले काम करीत आहे. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोना विरुध्दची लढाई जिंकून देशराज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

            विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटो क्लस्टरचिंचवड येथे  कोवीड-19 रुग्णालय उभारल्याबद्दल समाधानी आहे. कोरोना चाचण्यांचे मोठ्या प्रमाणात वाढवून चाचणीमध्ये लक्षणे नसलेल्या नागरिकांना गृह किंवा संस्थात्मक विलिनीकरण केले पाहिजे. यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण आणता येईल. नागरिकांच्या मदतीने एकत्रित लढाई लढूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्की यश येईल.

         महापौर माई ढोरे म्हणाल्यापिंपरी -चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात  मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यावेळेपासून आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे. महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सोई-सुविधांबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी  तर आभार पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

*****

Wednesday, August 12, 2020

पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 46 हजार 340 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव



  पुणे,दि.12 :- पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 906  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  3 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  69.45 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हा

  पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  1 लाख 12 हजार 131  रुग्णांपैकी  84 हजार 645  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 934 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 552 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.49 टक्के आहे. 

सातारा जिल्हा

  सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 5  हजार 939 रुग्णांपैकी   2 हजार  806 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2 हजार  941 आहे. कोरोनाबाधित एकूण  192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर जिल्हा

    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  11 हजार 647 रुग्णांपैकी  7 हजार  626 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 449   आहे. कोरोनाबाधित एकूण 572  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 4  हजार 902 रुग्णांपैकी  1 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3  हजार  51  आहे. कोरोनाबाधित एकूण 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

  कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 11  हजार  721 रुग्णांपैकी  4 हजार 867 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6  हजार 531 आहे. कोरोनाबाधित एकूण  323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3  हजार   561 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात  2 हजार 44 , सातारा जिल्ह्यात 174, सोलापूर जिल्ह्यात 323, सांगली जिल्ह्यात 126  तर कोल्हापूर जिल्ह्यात  894 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 28 हजार 942  नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 46  हजार 340 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

( टिप :- दि. 11 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

***

Sunday, August 9, 2020

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर आणि अधिकाधिक बाधित सहवासितांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवा- सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे





▪️ एक-दोन दिवसात क्रांती सिंह नाना पाटील सर्वसाधारण  रुग्णालयात कोरोना चाचणी  होणार सुरु


खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या कोरोना उपचार देयकाचे होणार ऑडीट

  

सातारा दि. 9 (जि. मा. का) :  सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढविले पाहिजे. तसेच प्रत्येक कोरोना रुग्णामागे कमीत कमी 15 निकट सहवासितांची टेस्ट केली पाहिजे. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येईल. तसेच या जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा, अशा सूचना आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे यांनी केल्या.

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आरोग्य मंत्री श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती सातारा-कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास  मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, हातकणंगलेचे  आमदार राजू आवळे, कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

कोरोना टेस्टींगचा अहवालाला 2 ते 3 दिवस लागत आहेत, त्यामुळे बाधितावर उपचार करण्यास उशीर होत आहे, असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, संबंधिताचा नमुना घेतल्यानंतर त्याचा अहवाल हा 24 तासात प्राप्त झाला पाहिजे म्हणजे संबंधितावर वेळेत उपचार करता येतील. राज्य शासन येत्या काही दिवसात 500 रुग्णवाहिका खरेदी करणार असून त्यांचे वाटप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांना करण्यात येणार आहे. बऱ्याच रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाहीत म्हणून उपचार करण्यास उशिर होत आहे तरी सातारा व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णवाहिका अधिगृहित कराव्यात.

शासकीय रुग्णालयांमध्ये फिजीशयनची कमतरता आहे तरी खासगी हॉस्पीटलच्या  फिजीशीयनची सेवा कोरोना रुग्णांसाठी घ्यावी , त्यांनी  मानवतेच्या दृष्टीकोनातून 6 ते 7 दिवस कोविड रुग्णालयांमध्ये काम करावे, असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री पुढे म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंर्तत कोल्हापूर जिल्ह्यात 45 रुग्णालये व सातारा जिल्ह्यातील 27 रुग्णालये आहेत, या रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्गावर सर्वांसाठी मोफत उपचार केले जात आहेत. कुठले रुग्णालय पैसे घेत असले तर त्या रुग्णालयावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशा सूचना करुन येत्या एक- दोन दिवसात सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे  कोरोना चाचणी प्रयोग शाला सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोरोनाचे काही रुग्ण हे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत काही रुग्णालये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने देयक रुग्णांकडून अदा करुन घेत आहेत, अशा काही तक्रारी येत आहेत सातारा  व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय विभागांमध्ये जे ऑडीटर असतात त्यांची नेमुणक करुन त्यांच्यामार्फत देयक तपासणी करुन ते संबंधित रुग्णाला देण्यात यावे. तसेच भरारी पथकाचीही नेमणूक करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागा रिक्त आहेत त्या जागा भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत तरी त्यांनी ज्या रिक्त जागा आहेत त्या तात्काळ भराव्यात.  इतर आजारांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात  जाणाऱ्या रुग्णांना उपचार करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत, अशा   तक्रारी येत आहेत,  अशा रुग्णालयांवर जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी.  

मुंबईच्या धर्तीवर डॅशबोर्ड तयार करावा

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील एकही कोरोना बाधित हा रुग्णालयातील बेडपासून वंचित राहू नये यासाठी सातारा व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने डॅशबोर्ड तयार करावा. या डॅशबोर्डमुळे कुठल्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे याची माहिती सहज उपलब्ध होते त्यामुळे बाधिताला वेळेत उपचार करता येतील. जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या

    सातारा-कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. कामगाराचा कारखान्यांमार्फत विमा काढला जातो त्या विम्यामध्ये कोरोनाचाही समावेश करावा, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर या बैठकीत सांगितले.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे तरी कुणीही घाबरुन न जाता या संसर्गाला समोर जावूया तसेच राज्य शासन सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करीत असल्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी सांगितले.

काही कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत तरी प्रत्येक कोविड रुग्णालयात शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखील संबंधिताला बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बैठकीत केली.

बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले नागरिक आपली माहिती प्रशासनापासून लपवत आहेत. शेवटच्या क्षणी ते आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधतात यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, परंतु आता प्रत्येक घरात जावून सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरु असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या बैठकीत सांगितले.

कोरोना संदर्भात उपाययोजना राबविण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने येत्या एक-दोन दिवसात मुंबई बैठक घेऊन निधी उपलब्ध करुन द्यावा, असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

कोरोनाचे संकट हे अख्या जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एक छोटेसे अद्यावत रुग्णालयाची  निर्मिती करुन ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आपला देश राज्य नक्की कोरोना मुक्त होईल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला.

कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढवाव्यात, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी बैठकीत सांगितले.

कोल्हापूरचे जिल्हा प्रशासन कोरोना संदर्भात चांगले काम करीत असून त्यांना राज्य शासनाने आणखीन सुविधा उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केल्या.

आरोग्य विभागाच्या मागणीनुसार निधी तसेच टेस्टींगचे रिपोर्ट लवकर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे, असे आमदार मकरंद पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

फलटण कोविड रुग्णालयात व्हेंटीलेटरची संख्या वाढवावी, असे आमदार दिपक चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले.

सातारा-जावलीच्या डोंगराळ भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी रुग्णवाहिकांची गरज असल्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या बैठकीत सांगितले.

एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये कोविड सेंटर उभे करावे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरी करणाद्वारे दिली.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

00000

Friday, August 7, 2020

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 27 हजार 820 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 

  पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 27 हजार 820 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 39 हजार 885 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हा

  पुणे जिल्हयातील 1 लाख 264 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 70 हजार 904 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 70 आहे.  कोरोनाबाधित एकूण 2 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  70.71  टक्के आहे. 

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 4 हजार 976 रुग्ण असून 2 हजार 426 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 391 आहे. कोरोनाबाधित एकूण 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर जिल्हा

  सोलापूर जिल्ह्यातील 9 हजार 875 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 323 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 16 आहे. कोरोना बाधित एकूण 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 905 रुग्ण असून 1 हजार 181 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 611 आहे. कोरोना बाधित एकूण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 800 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 768 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 797 आहे. कोरोना बाधित एकूण 235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 853 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 955, सातारा जिल्ह्यात 229, सोलापूर जिल्ह्यात 53, सांगली जिल्ह्यात 236 तर कोल्हापूर जिल्ह्यात 380 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 55 हजार 967 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 हजार 820 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

( टिप :- दि. 6 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

***

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून 'जम्बो कोविड केन्द्रा'चे काम तातडीने पूर्ण करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 











                 पुणे दि. 7 :-  'कोरोना' संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच 'जम्‍बो कोविड केंद्रा'चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

           उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण तसेच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे  उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन पहाणी केली.

           यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'जम्बो कोविड केंद्रा'ची उभारणी करताना दर्जेदार काम करण्यावर भर असला पाहिजे. 'कोरोना' संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सर्व सोईसुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच रुग्णालय उभारणीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

             यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी आण्णासाहेब मगर क्रीडांगण तसेच शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओइपी ) प्रांगणात जम्बो कोविड केंद्र उभारणी करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचना, ऑक्सिजनयुक्त, आयसीयू खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) असलेले सर्व सोई सुविधा युक्त कोविड केंद्र उभारण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा, दोन खाटांमधील अंतर, कोरोनाबधित  रुग्णांवर करण्यात येणाऱ्या चाचण्या, विद्युतीकरण, वाहनतळ, शौचालय, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, डॉक्टर व परिचारिका यांच्या राहण्याची व भोजनाची सोय, खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात कोविड केंद्राच्या आजूबाजूने साठणारे पाणी आणि त्‍याचा निचरा करण्याची व्यवस्था आदी बाबींसह पायाभूत सुविधांबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली.

             पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोवीड केअर सेंटर पहाणी दौऱ्यावेळी पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे  सभापती संतोषअण्णा लोंढे,  सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता नाना काटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महागनगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे,  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्‍या नगरसेविका वैशाली घोडेकर, नगरसेवक सर्वश्री योगेश बहल, संजोग वाघेरे, राजू मिसाळ, सचिन चिखले, अजित गव्हाणे, पंकज भालेकर, 'जेस आयडियास' कंपनीचे अजित ठक्कर, भावेश ठक्कर, अर्पित ठक्कर व शिवाजी नगर येथील जम्बो कोवीड केंद्र पहाणी दौऱ्याच्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

***