Monday, June 29, 2020

गृहमंत्र्यांनी केला पोलीस कर्मचाऱ्यांसह, मदत करणाऱ्या व्यक्तींचा, संस्थांचा सत्कार



सातारा दि. 29 (जि. मा. का): जिल्ह्यात कोरोनाच्या लढाईमध्ये पोलिस दलाने अत्यंत चांगले आणि कौतुकास्पद काम केले. याचा मला सार्थ अभिमान आहे. पोलिसांच्या सहकार्याला धावून आलेल्या जनतेचाही मी आभार मानतो, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या   यौद्याचे मनोबल उंचावले. 
लॉकडाउनच्या काळात प्रभावी काम करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच पोलिसांना व गरजू नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा आज अलंकार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, उद्योजक फरोख कूपर आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना गृहमंत्री श्री. देशमुख पुढे म्हणाले, कोरोनाच्या लढाईमध्ये पोलिस दलाने मोलाची कामगिरी केली असून  यात अनेक पोलीसांना संसर्ग झाला. त्यात काहीजण मृत्युमुखी पडले, तरीही पोलिस दल धैर्याने या संकटाशी मुकाबला करत आहे.  पोलीस दलासाठी राज्य सरकार खंबीर आहे. कोरोनाच्या काळात सातारा जिल्ह्यातही चांगले काम झाले आहे. '' 
जिल्हा पोलिसांनी अधीक्षक सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तेजस्वी कामगिरी केल्याचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे यांनीही पोलिस अधीक्षक सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे सांगितले. पोलिस दलाला आमदार निधीतून पाच लाख रुपये दिल्याचे सांगतानाच रेनकोटही वाटप करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
या वेळी पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक गणेश वाघ, हवालदार नीलेश दयाळ, सागर गोगावले, अश्विनी माने यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या सीमांवर असलेल्या तपासणी नाक्यावर काम करणाऱ्या पथकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 
पोलिस दलाच्या आवाहनांवर मदतीसाठी पुढे येणाऱ्यांपैकी उद्योजक फरोख कूपर, अक्षय भोसले, वैभव कदम, प्रसाद कुलकर्णी, मंदार कलेढोणकर, डॉ. प्रियांजली वाळवेकर, डॉ. जवाहरलाल शहा, सुजित जगधणे, सलिम मुजावर, ऍड. जनार्दन बोथरे, महेंद्र सचदेव, पोलिस मित्र कुणाल मोरे, शुभम भोसले, विजय लिंगाडे, संध्या पवार, सुनील वेल्हाळ, गुणवंतराव जाधव, मेघनाथ बल्लाळ, रस्ता सुरक्षा दलाचे उपमहासमादेशक उमेश देशमुख, यशवंत गायकवाड, चंद्रकांत साळुंखे, रवी यादव आदींचा सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले तर धीरज देशमुख यांनी आभार मानले. 
यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलाचे सागरिका कॅंटीन व पोलिस वसाहतीच्या कामाची पाहणी केली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनाची व त्यातील दरपत्रकांची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्याचा मानसही श्री. देशमुख यावेळी व्यक्त केला. 

000

श्री.छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्याचे काम मार्च 2021 अखेर पूर्ण होणार- पालकमंत्री बाळासाहेब पाटील


सातारा दि : 29  ( जि मा का ) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे राज्याच्या नव्हे तर देशाच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. तो जाज्वल्य इतिहास जनतेसमोर यावा याकरिता  श्री. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्यासाठी आणि पूर्णत्वासाठी 12 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने अर्थसंकल्पिय तरतूद करून दिला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मार्च 2021 पूर्वी पूर्ण केले जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  
     श्री. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात सुरु असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ.छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अधिक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, या संग्रहालयाचे पुरातत्व विभागाचे सहायक अभिरक्षक अभिरक्षक उदय सुर्वे, या संग्रहालयाचे वास्तू विशारद विजय गजबर उपस्थितीत होते. 
      या वस्तू संग्रहालयात तळमजला व पहिल्या मजल्यावर वस्तू संग्रहालयाच्या प्रदर्शनासाठी मोठमोठी दालने, व्हरांडे, कार्यालयीन जागा, इमारतीच्या पूर्व भागातील तळघरात पार्किंगची व सभागृहाची सोय केलेली आहे. या सर्व बाबी जाणून घेऊन काही बदल पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  करायला सांगितले. यावेळी आ.छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही काही बदलाच्या सूचना केल्या. 
 पर्यटकांच्या बसेससाठी पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह, तिकीट घर हे बस स्टँडच्या बाजूच्या रोड लगत करण्यात आले असून पर्यटकांसाठीचे प्रवेश द्वारही त्याच बाजूला असणार आहे.  याचे सर्व बांधकाम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती राजभोज यांनी दिली.          शिवकाल उभं करण्यासाठी संपूर्ण अभ्यास करण्यात आला असून महाराजांच्या आरमारापासून शस्त्रास्त्र, नाणे इथं पर्यंतची माहिती विविध रूपात इथे दाखविण्यात येणार असल्याचे विजय गजबर यांनी यांनी यावेळी सांगितले.

अनलॉक काळात शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्रात बाधित वाढत आहेत ; जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा - गृहमंत्री अनिल देशमुख



सातारा दि. 29 (जि. मा. का): कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे म्हणजे बाधितांची संख्या कमी होईल, असा विश्वास  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केला.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक आज गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी  राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
राज्यातील 20 ते 22 लाख परप्रांतीय हे आपापल्या राज्यात गेले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी. फलटण आणि जावली तालुक्यातील संसर्ग झालेल्या रुग्णांच्या  मृत्युचे प्रमाण जास्त आहे, तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.  
बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे यामुळे बाधितांची संख्या कमी होईल. जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत आहे. मृत्युचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. बाधितांमध्ये 61 टक्के पुरुष व 39 टक्के महिला आहेत. आजपर्यंत 1 हजार 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात 21 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांचे जास्त प्रमाण  आहे. जिल्ह्यात 308  प्रतिबंधित क्षेत्र आहेत या प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने दिल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गरोदर मातांची काळजी घ्यावी. तसेच गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसिवीर हे औषध शासन खरेदी करणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 55 वर्षावरील 12 हजार कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. 50 ते 55 वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधेकाम दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी संकुलासाठी  निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
आषाढीवारी साठी जाणाऱ्या 9 पालख्या ह्या 30 जूनला पंढरपुरात पोहचतील. 2 जुलै रोजी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भेटीचा  कार्यक्रम होईल. 18 ते 20 वारकरी हे पादुका घेऊन जातील, याचेही नियोजन झाले आहे, असेही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी शेवटी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची तर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, उपस्थित आमदार यांनीही वेगवेगळ्या सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

00000

'कोरोना'शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


        बारामती, दि. 29 :  'कोरोना'च्या रुग्णांसह  इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार  मिळण्याची काळजी घ्यावी. 'कोरोना'च्या संकटाशी सामना करताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. 
          'कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मुलन आढावा' आणि 'विविध विकास कामांची आढावा' बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.
          यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणीची प्रक्रीया वाढवावी. कोव्हीड आणि नॉन कोव्हीड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असेही, आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच कोव्हीडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. 
          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले विकासाची कामे ही दर्जेदार व वेळेतच झाली पाहीजेत. जरी 'कोरोना'चे संकट असले तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखत काम करावे. जेथे अतिक्रमण असेल ते योग्य ती कार्यवाही करून काढून टाकण्यात यावे. परंतु सदर ठिकाणी असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ न देता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
000000

आषाढी वारीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये मटण, मासे विक्रीस बंदी अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले आदेश



          सोलापूर, दि. 29 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये  30 जून ते 02 जुलै अखेरपर्यंत मांस, मटण, मासे  विक्री आणि प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले.  
          1 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरात वारीनिमित्त मानाच्या पालख्या आणि वारकरी येतात. सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, शहरातील कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मांस, मटण, मासे विक्री आणि प्राणी कत्तलीवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.  

                                                   0000000

अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम






  पुणे दि. 29: अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2020 या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2020 ची माहिती असलेल्या पत्रकाचे प्रकाशन करुन व  चित्ररथाला  हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  
 यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक प्रताप सिंग चव्हाण, व्यवस्थापक संजय शितोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तंत्र अधिकारी प्रमादे सावंत, कृषि सहायक राजपुत सी.एस. आदी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020 मृग बहराकरीता फळपिकांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने 5 जून 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बाधित राखणे हे आहे. तसेच  ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित  पिकांसाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महवेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी  हस्तक्षेप राहणार नाही, ही योजनेची प्रमुख वैशिष्टये आहेत. विमा हप्त्याचा दर शेतकऱ्यांना फळ पिकनिहाय प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के आहे. 

  विमा कंपनीचे नाव बजाज एलाएन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी, पुणे असे असून टोल फ्री क्र. 18002005858, दुरध्वनी क्र.0206602666 , ई-मेल आय डी prmod.patil01@bajajallaianz.co.in हा आहे.  पिक विम्याच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषिअधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले आहे.

  या कार्यक्रमास  कृषि व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००

कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी समन्वयाने काम करा- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात



   पुणे,दि.29 :  कोरोनाविरुध्दची लढाई आपल्याला बरीच काळ लढाई लढावी लागणार आहे. या संकटकाळात प्रशासन चांगले काम करीत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर नक्की मात करु, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
            विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना साथरोग नियंत्रण विभागीय आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवडचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुणे शहर पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
         महसूलमंत्री श्री थोरात म्हणाले, शासनाने लॉकडॉऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला कोरोनासोबत जगण्याबरोबरच मोठी लढाई लढावी लागणार आहे. मान्सूनच्या काळात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता योग्य ते नियोजन करुन रुग्ण संख्या कमी करण्याबरोबरच मृत्यूदराचा आलेख शून्यावर आण्यासाठी सर्वांना मिळून समन्वयाने काम करावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि शारिरीक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो.
         मालेगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. याचा उपयोग पुणे शहराबरोबरच विभागात इतरत्र परिस्थिती निहाय उपयोगी पडेल का ? याबाबत माहिती घ्या. तसेच सामूहिक संसर्ग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या, ग्रामीण भागात कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कोवीड आणि नॉन कोविड रुग्णासाठी पुणे शहराबरोबरच विभागात करण्यात येणाऱ्या खर्चाची माहिती, प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशाचे पालन होत आहे किंवा कसे ? विभागातील चाचण्याची सद्यस्थिती व नियोजन, उपलब्ध असलेले बेड्स, रुग्णवाहिका, कोराना प्रतिबंधात्मक करण्यात येणाऱ्या उपायोजना याबाबत महसूल मंत्री थोरात यांनी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली.
     विभागीय आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा बाबतची माहिती दिली. पुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर महानगरपालिकेने प्रत्येकी एक लाख अँटीजन टेस्ट कीटची मागणी केली असून लवकरच कीट्स प्राप्त होणार आहे, असे सांगितले.
            जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली. तसेच  जिल्हा परिषदेमार्फत कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय कळविण्यात येतात. त्याची अंमलबजावणी आपापल्या भागात होत आहे किंवा कसे याबाबत माहिती घेण्यात येते.
**

पुणे विभागातील 15 हजार 606 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 25 हजार 949 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 29 :- पुणे विभागातील 15 हजार 606 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 25 हजार 949  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 296 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 524 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.3 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 21 हजार 237 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 12 हजार 410 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार 106 आहे. कोरोनाबाधित एकूण 721 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 423 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.40 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 822 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 660, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 96, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 11 रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 255 आहे. कोरोनाबाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सोलापूर जिल्हयातील 2 हजार 530 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 555 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 714 आहे. कोरोना बाधित एकूण 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 340 रुग्ण असून 215 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 113 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 831 कोरोना बाधीत रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 108 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 69 हजार 532 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 67 हजार 492 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 30 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 41 हजार 226 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 25 हजार 949 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 29 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 25.68 लाख लाभार्थ्यांना लाभ - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


  पुणे, दि. 29 - पुणे विभागात अंत्योदय  व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे  जून 2020   महिन्याचे नियमित मंजूर 66  हजार 574.22  मे.टन असून आजअखेर 66 हजार 178.8 मे टन (99.41 %)  धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य  वितरण  90.72 % आहे. याअंतर्गत एकूण 25 .68 लाख लाभार्थ्यांना  60 हजार 397 .23 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
        पुणे विभागात 28 जून 2020 रोजी  एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत.   यामध्ये  21 हजार  95गरजूंनी लाभ घेतला आहे.
           पुणे विभागामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नसल्याचेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
           
                                                                  0 0 0 0 0

Saturday, June 27, 2020

12 नागरिकांना आज डिस्चार्ज तर 218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 27 (जि. मा. का): विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये  उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या  12 जणांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील 9 वर्षीय बालिका.,
खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 4 वर्षीय बालिका व 32 वर्षीय महिला.,
माण तालुक्यातील वय 17 व 21 वर्षीय युवक व 39 वर्षीय पुरुष.,
महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 63 वर्षीय पुरुष., 
सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला.,
पाटण तालुक्यातील शिराळ येथील 70 वर्षीय पुरुष, 
कराड तालुक्यातील तुळसण येथील 25 महिला  व 28 वर्षीय पुरुष,  व 5 वर्षीय बालिकेचा समावेश आहे.  

218 नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 50, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 45, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 39, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 34, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 21,  कोरोना केअर सेंटर शिरवळ  येथील 10, रायगाव येथील 13, मायणी येथील 6 एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 
000

कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार


▪️ शासकीय इमारतीच्या  देखभाल व दुरुस्तीसाठी निधी देणार
▪️ विकास आणि रोजगार निर्मितीसाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करणार


सातारा दि. 27 (जि. मा. का): कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासन पूर्ण खबरदारी घेत आहे. कोरोना संदर्भात काम करणाऱ्या यंत्रणेला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जात नाही. रुग्णांचा रिपोर्ट लवकरात लवकर मिळावा यासाठी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविड चाचणी केंद्र  सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयतील नियोजन भवनात विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेतला सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,  खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटीलेटरच्या तसेच इत्यादी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भितीही कमी झालेली आहे, परंतु  प्रत्येकाने मास्क वापरुन  व सुरक्षित अंतर ठेवूनच आपली काळजी घ्यावी  आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. आज लॉकडाऊनला शंभर दिवस झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे यापुढेही धान्य देण्याची शासनाची तयारी आहे.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी देण्यात आलेली होती, परंतु आजपर्यंत या महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी मंत्रालयाकडे पाठवलेले तीन प्रस्ताव दाखवले आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेसंदर्भात बैठक घेण्यात येणार असून पुढील 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून या शासकीय महाविद्यालयालय उभारण्याच्या कामास गती देण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शासकीय इमारती आहेत. यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आमदार फंडातून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील 10 टक्के निधी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला असता मागील वर्षी 28 टक्के धरणातील पाणीसाठा होता,आज   समाधानकारक 36 टक्के आहे. जिल्ह्यातील रस्ते हे वन विभागाच्या हद्दीतून जातात, खराब झालेल्या रस्त्यांच्या  दुरुस्तीबाबत  निर्णय जे  मंत्रालयस्तरावर असतील ते तिथे  तसेच स्थानिक पातळीवरील निर्णय पालकमंत्री व जिल्हाधिकारी घेतील.
विकासाबरोबरच रोजगार निर्मिती होण्यासाठी भविष्याच्या परिस्थितीचा विचार करुन महाराष्ट्रात मोठे उद्योग कसे येतील याचे तज्ञांच्या सल्यानुसार नुसार दूरदर्शी आराखडा  तयार करण्यात येईल.
  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती दिली जाईल, जिल्हास्तरावरील प्रश्न पालकमंत्री व जिल्हाधिकारी बैठक घेऊन सोडवतील तर मंत्रालयस्तरावरीलही प्रश्न गतीने सोडविले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
0000

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जाणून घेतल्या ग्रामस्तरावरील समस्या



आरोग्यसेविका, आशासेविकांना सर्वेक्षणाबाबत केल्या सूचना

सोलापूर, दि.27: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पानगाव (ता. बार्शी) ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्तरावरील समस्या जाणून घेऊन उपाययोजना सूचवल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आशासेविका यांना गावातील सर्वेक्षणाबाबत विविध सूचना दिल्या.

श्री. शंभरकर हे आज पानगाव दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तहसीलदार प्रदीप शेलार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जोगदंड, सरपंच सखुबाई गुजले, मंडल अधिकारी शरद शिंदे, तलाठी सचिन गोडगे, ग्रामविकास अधिकारी भागवत भोसले यांच्यासह आरोग्यसेविका, आशासेविका उपस्थित होत्या.

गावातील कोरोनाबाबत कुटुंब सर्वेक्षण करताना पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल गनचा वापर करा. याच्या वापरानंतर ते सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करा. वयोवृद्ध, रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, दमा, शुगर असे आजारी असणाऱ्या रूग्णांची काळजी घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. सर्वेक्षणानंतर या रूग्णांना किमान आठवड्यातून दोनदा भेटी देऊन माहिती घ्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनीही मास्क आणि ग्लोजचा वापर करूनच सर्वेक्षण करा, गंभीर रूग्णांना तत्काळ रूग्णालयात पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

गावची लोकसंख्या सर्वेक्षणानुसार 5907 असून 1127 कोमॉर्बिड रूग्ण आहेत. 10 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 789 हे 60 वर्षांवरील तर 338 रूग्ण इतर आजाराचे असल्याची माहिती डॉ. जोगदंड यांनी दिली. ग्रामपंचायतीमार्फत रूग्णांना अर्सेनिक गोळ्या देण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती श्री. भोसले यांनी दिली.   

गावात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी प्रयत्न करावेत. कर्जमाफी झालेल्यांची यादी बँकेला देऊन त्यांना पीक कर्ज देण्याच्या सूचना करा, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.

खरिपाचे क्षेत्र 2200 हेक्टर असून 60 टक्के सोयाबीन, तूर पिकाची पेरणी झाल्याचे तलाठी श्री. गोडगे यांनी सांगितले.

श्री. शंभरकर यांनी गावातील सर्वेक्षण कसे चालते? घरकुले किती जणांना दिली? पेरणी किती झाली?, खतांबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आहेत का? याबाबतही माहिती घेवून मार्गदर्शक सूचना दिल्या.

पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 23 हजार 970 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 27 :- पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 23 हजार 970 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 8 हजार 535 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 990 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 496 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 19 हजार 587 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 11 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 532 आहे. कोरोनाबाधित एकूण 680 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 381 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.07 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.47 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 811 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 747, सातारा जिल्ह्यात 29, सोलापूर जिल्ह्यात 10, सांगली जिल्ह्यात 06 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 917 रुग्ण असून 689 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 186 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 2 हजार 350 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 640 आहे. कोरोना बाधित एकूण 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 319 रुग्ण असून 207 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 102 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 797 कोरोना बाधीत रुग्ण असून 712 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 75 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 60 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 58 हजार 785 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 932 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 34 हजार 487 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 23 हजार 970 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 27 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी आवश्यक साधनसामुग्री सुसज्जजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला

तळेगाव दाभाडे येथील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
पुणे दि.27 : -  कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज करण्यात येत आहे. भविष्यात कुठलीही आपत्ती उद्भवल्यास तात्काळ उपचाराची सुविधा उपलब्ध असण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करावी, निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले. कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी नियम पाळले गेले पाहिजेत. नियमभंग करणा-यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेळी त्यांनी स्पष्ट केले.
         तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे  शहराचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शेळके, उप विभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंझाड, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी राम म्हणाले, अर्थव्यवस्थेत सुधारणांच्या दृष्टीने काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. उद्योग- व्यवसायांना परवानगी दिली. पण याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व इतर दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. त्यासाठी महसूल, नगरपालिका, पोलीस व इतर सर्व यंत्रणांनी  कोणत्याही परिस्थितीत नियमपालनाच्या दृष्टीने कडक अंमलबजावणी केली पाहिजे. असे निर्देश त्यांनी दिले.
       जिल्हाधिकारी राम म्हणाले , लोणावळा परिसरात रुग्णसंख्या कमी आहे, म्हणून निष्काळजी राहून चालणार नाही तर पुढील संभाव्य धोका विचारात घेता वैद्यकीय सुविधांची उभारणी करावी असे सांगून तळेगाव येथे मुंबई, पुण्यासह बाहेरगावावरून येणारांची संख्या विचारात घेता संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा वाढवावी तसेच या क्वारंटाईन सेंटरला चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यावर भर द्यावा,  बाहेरील नागरिकांच्या विलगीकरणासंदर्भात सूचना करुन  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जनजागृती करण्यात यावी. असे सांगितले.
टाळेबंदीतील शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आदींचा अवलंब होत नसल्यास कारवाई करून शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे. मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देण्यात यावा तसेच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्राधान्याचे आव्हान आहे. ती सजगता ठेवून कामे करावीत. जिथे उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली तिथे लक्ष केंद्रित करून अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने दररोज कोरोना विषयक जनजागृतीसाठी शहरातून वाहनाव्दारे जनजागृती करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राम यांनी दिले.
  आमदार  सुनिल शेळके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करावी, असे सांगितले.
  उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी राम यांनी तळेगाव दाभाडे येथे राव कॉलनी येथील मायक्रो कंटेनमेंट झोन, कोवीड केअर सेंटर तसेच शहरालगतच्या तलावाची पाहणी केली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आषाढी पालखी एकादशी 2020 मध्ये संतांच्या पादुका पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका -जिल्हाधिकारी नवल किशोर राम



पुणे दि.27 : -  आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच  30 जून 2020 रोजी दशमीला श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे , श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे व श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवड, जि.पुणे या चार पालखी संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
                       दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखी सोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठया प्रमाणात  कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालणेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरीकांना व जनतेला होऊ नये यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 
          श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे करीता उपविभागीय अधिकारी, खेडचे संजय तेली (मो.नं.9405583799), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे करीता महसूल नायब तहसिलदार, हवेलीचे संजय भोसले (मो.नं.9960171046), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे करीता निवासी नायब तहसिलदार, दौंडचे सचिन आखाडे (मो.नं.7875078107), श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवड, जि.पुणेकरीता  महसूल नायब तहसिलदार, पुरंदरचे उत्तम बढे  ( मो.नं.9402226218) अशा प्रकारे नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहेत.
        नेमणुका करण्यात आलेल्या इन्सीडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक असून संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्चित करावा व सदर पादुका घेवून जाणा-या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहचतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासा दरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणा-या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.  
                      तसेच या पादुकांचे प्रस्थान झालेपासून पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहचतील याबाबत जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या विनोद पाटील, श्री रुक्मणीच्या मंदिर समिती, पंढरपूर ( संपर्क क्र. 8408026069) यांच्याशी समन्वय करुन योग्य ते नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

                                                               00 00

कोरोना मुकाबल्‍यासाठी नियोजन



       पुणे शहरात  9 मार्च 2020 ला प्रथम रुग्ण मिळाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. पुण्‍यामध्‍ये रुग्‍ण वाढत असतांना ग्रामीण भागात 16 एप्रिलपर्यंत फक्‍त 20 रुग्‍ण होते. 3 मे आणि 17 मे रोजी टाळेबंदी (लॉकडाऊन) शिथील झाल्‍यानंतर ग्रामीण भागात मुंबई आणि पुणे तसेच इतर रेड झोनमधून लोकांचे स्‍थलांतर झाले. ग्रामीण भागात स्‍थलां‍तरित झालेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये कोरोना संसर्ग आढळून आला आणि त्‍यामुळे रुग्‍णसंख्‍या वाढली.

       ग्रामीण भागाची स्थिती लक्षात घेवून प्रतिबंधित क्षेत्रात विविध उपाय योजण्‍यात आले. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम मार्गदर्शनाखाली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दैनंदिन सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. आशा स्‍वयंसेविकांमार्फत प्रत्‍येकी दररोज 50 गृहभेटी सुरु करण्‍यात आल्‍या. आरोग्‍य कर्मचारी आणि खाजगी डॉक्‍टरांमार्फत खाजगी केमिस्‍ट सर्वेक्षण आणि संशयित रुग्‍णांची नोंद करण्‍यात येवू लागली. वैद्यकीय अधिका-यांमार्फत खाजगी रुग्‍णालयांना भेटी देवून संशयित रुग्‍णांची नोंद व पाठपुरावा सुरु करण्‍यात आला. इतर ठिकाणांहून म्‍हणजे परदेशातून आणि रेडझोनमधून प्रवास करुन आलेल्‍या व्‍यक्‍तींवर विशेष लक्ष ठेवून त्‍याबाबतची नोंद आणि पाठपुरावा करण्‍यात आला. अतिजोखीम व सहव्‍याधी असलेल्‍या सर्व व्‍यक्‍तींचे नियमित सर्वेक्षण करण्‍यात येत आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक व गरोदर मातांचे  विशेष सर्वेक्षण केले जात आहे.

       जिल्‍ह्यांच्‍या सीमांवर 20 ठिकाणी आरोग्‍य तपासणी नाक्‍यांची उभारणी करण्‍यात आली असून तपासणी करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीची रजिस्‍टरमध्‍ये नोंद घेण्‍यात आली आहे. आतापर्यंत 20 लक्ष लोकांची तपासणी करण्‍यात आली आहे. कोरोना विशेष नियंत्रण कक्षाद्वारे 37 हजारांहून अधिक कॉल्‍स हे कोरोना समन्‍वयासाठी झालेले आहेत. पुणे ग्रामीण भागात 26 जूनपर्यंत एकूण 811 रुग्‍ण होते त्‍यापैकी 508 बरे झालेले तर 270 एकूण क्रियाशील रुग्‍ण आहेत. 33 रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. पुणे ग्रामीण भागातील रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाण 62.63 टक्‍के तर ग्रामीण भागातील मृत्‍यूचे प्रमाण 4.06 टक्‍के इतके आहे. जिल्‍ह्यातील 9 लक्ष 34 हजार 538 कुटुंबांचे ‘आशा सर्वेक्षण’ करण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये फीवर क्लिनीक एकूण बाह्यरुग्‍ण संख्‍या 2 लक्ष 89 हजार 690 तर सर्दी, ताप, खोकला इतर रुग्‍ण 11 हजार 206 होते. संदर्भित केलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या 696 इतकी होती.  अतिजोखमीच्‍या व्‍यक्‍तींना शिक्‍के मारुन घरी विलगीकरण करण्‍यात आले. विलगीकरण झालेल्‍या व्‍यक्‍तींवर आशा व ग्रामपंचायतीमार्फत विशेष लक्ष ठेवण्‍यात आले.

       पुणे ग्रामीण जिल्‍ह्यात एकूण 306 प्रतिबंधात्‍मक क्षेत्रांपैकी 173 क्षेत्रात यशस्‍वी कार्यवाही पूर्ण झाली. उरलेल्‍या 133 क्रियाशील क्षेत्रामध्‍ये 3055 पथके कार्यरत आहेत. एका पथकाकडून दररोज 50 ते 100 घरांचे सर्वेक्षण केले जात असून आतापर्यंत 11 लक्ष 43 हजार 215 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 141 बाधित ग्रामपंचायत आणि 11 बाधित नगरपालिकांमध्‍ये झालेल्‍या सर्वेक्षणामध्‍ये 2699 अतिजोखीम संपर्क असलेले आणि 4914 कमी जोखीम संपर्क असलेले होते. प्रत्‍येक पथकाकडे थर्मल गन व पल्‍स ऑक्‍सीमीटर असून ‘सारी’ रुग्‍णांचा शोध घेतला जातो. लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची वैद्यकीय           अधिका-यामार्फत तपासणी होते. शेवटचा रुग्‍ण आढळल्‍यापासून 14 दिवसांपर्यंत सर्वेक्षण चालते. बाधित रुग्णाच्‍या संपर्कातील एकूण 345 केसेस ह्या सर्वेक्षण उपक्रमाच्‍या मदतीने शोधून काढण्‍यात आलेल्‍या आहेत. सहव्‍याधी सर्वेक्षणामध्‍ये (कोमॉर्बिड सर्वेक्षण) ग्रामीण भागात 60 वर्षांवरील 6 लक्ष 28 हजार 36 तर इतर व्‍याधी असलेल्‍या व्‍यक्‍ती 2 लक्ष 9 हजार 30 आढळून आल्‍या.
       समर्पित कोविड रुग्‍णालये 5 कार्यान्वित असून 1130 खाटा, 117 आयसीयू खाटा, 32 व्‍हेंटीलेटर्स आणि 496 ऑक्सिजन खाटांची उपलब्‍धता आहे. समर्पित कोवीड आरोग्‍य केंद्र 19 कार्यान्वित असून 1054 खाटा, 124 आयसीयू खाटा, 36 व्‍हेंटीलेटर्स आणि 293 ऑक्सिजन खाटा उपलब्‍ध आहेत. ग्रामीण भागात 48 कोविड केअर सेंटरची स्‍थापन करण्‍यात आली असून 9399 खाटांची उपलबधता आहे. अशा प्रकारे एकूण 72 रुग्‍णालयांची व्‍यवस्‍था असून 11 हजार 583 खाटांची उपलब्धता आहे. एकूण 241 आयसीयू, 68 व्‍हेंटीलेटर्स व 789 ऑक्सिजन खाटांची सोय उपलब्‍ध आहे.
       पुणे जिल्‍हा परिषद, जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी, राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान यांच्‍या मार्फत विप्रो समर्पित कोविड आरोग्‍य केंद्र कार्यान्वित करण्‍यात आले असून मुख्‍यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते 11 जून रोजी हस्‍तांतरण सोहळा संपन्‍न झाला. या केंद्रात 504 खाटा, 10 आयसीयू खाटा आणि 5 व्‍हेंटीलेटर्सची उपलब्‍धता आहे. म्‍हाळुंगे इंगळे समर्पित कोविड केअर सेंटर सुध्‍दा पुणे जिल्‍हा परिषद, जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी, राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान यांच्‍या मार्फत कार्यानिव्‍त करण्‍यात आले असून येथे 1400 खाटांची सोय उपलब्‍ध आहे. संशयित व बाधित रुग्णांसाठी येथे वेगळी व्‍यवस्‍था आहे. म्‍हाडा इमारतीच्‍या सदनिकेमध्‍ये स्‍वतंत्र सोय आहे. हा सदनिका परिसर लोकवस्‍तीपासून दूर असून रुग्‍णाकडून स्‍थानिक जनतेकरिता संसर्गाचा धोका नाही. खासदार डॉ. अमोल कोल्‍हे यांच्‍या हस्‍ते 15 मे रोजी हस्‍तांतरण सोहळा संपन्‍न झाला. याशिवाय उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्‍या हस्‍ते 20 जून रोजी रोगप्रतिकारकशक्‍ती वाढीसाठी व्‍हीटॅमिन डी, सी, झिंक गोळ्या, आर्सेनिक 30 आणि आयुर्वेदीक प्रातिनिधीक स्‍वरुपात वाटप करण्‍यात आले.
       पुणे ग्रामीण कोरोना बाधित रुग्‍णांकरिता भविष्‍यातील नियोजन करण्‍यात आले आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रुग्‍णसंख्‍या लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्‍ण पुणे शहराबाहेर उपचारास ठेवण्‍याकरीता तालुकास्‍तरीय कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे.  केंद्र शासन आणि राज्‍य शासनाकडील सुधारित मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन बाधित रुग्‍णाला जवळच्‍या कोविड रुग्‍णालयात उपचारासाठी  ठेवणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत विप्रो हॉस्‍पीटल (504 खाटा, 10 आयसीयू खाटा), नवले हॉस्‍पीटल (100 खाटा, 20 आयसीयू खाटा) येथे समर्पित कोविड उपचार केंद्र असून नवले हॉस्‍पीटल येथे अधिक 100 खाटांची उभारणी करणे आवश्‍यक आहे. भविष्‍यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता व पुणे शहरावरचा ताण कमी करण्‍याकरिता उप जिल्‍हा रुग्‍णालय बारामती, मंचर आणि भोर येथे 50 खाटांचे समर्पित कोविड रुग्‍णालय तात्‍काळ सुरु करणे आवश्‍यक आहे. औंध येथील जिल्‍हा रुग्‍णालयात ग्रामीण रुग्‍णांकरिता अधिक 100 खाटांची सोय तात्‍काळ करणे आवश्‍यक आहे. ससून रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालय, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना कोरोना प्रतिबंधाकरिता आवश्‍यक उपाययोजना करण्‍यासाठी जिल्‍हा वार्षिक नियोजनातून एकूण 65. 78 कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
       कोरोना बाधितांवर उपचाराबरोबरच माहिती-शिक्षण-संवाद उपक्रमाचाही वापर करण्‍यात येत आहे. यामध्‍ये 2700 बॅनर्स, 14 हजार 336 पोस्‍टर्सद्वारे प्रसिध्‍दी करण्‍यात आली.6 लक्ष माहितीपत्रके वाटण्‍यात आली. सोशल मिडीयावरुन व्हिडीओ फील्‍म्‍स, ऑडिओ क्लिप्स प्रसारित करण्‍यात आल्‍या. एलइडी वाहनाद्वारेही प्रचार करण्‍यात आला.
       पुणे जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने महाराष्‍ट्र नॉलेज कार्पोरेशनच्‍या (एमकेसीएल) सहकार्यातून इंटीग्रेटेड डीसीज सर्वेलन्‍स प्रोग्राम (आयडीएसपी) समर्पित वेबपोर्टल 12 मार्चपासून संपूर्ण जिल्‍ह्यासाठी कार्यरत आहे. जिल्‍ह्यातील 68 संनियंत्रित अधिका-यांची टीम या वेबपोर्टलचा प्रभावी वापर करीत आहे. यावर 1094 हून अधिक डॉक्‍टरांची नोंदणी तसेच 1 लक्ष 43 हजारांहून अधिक नागरिकांच्‍या होम क्‍वारंटाईनचे यशस्‍वी व्‍यवस्‍थापन करण्‍यात आले आहे.
       ‘पुनश्‍च हरि ओम’ म्‍हणजेच ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत टाळेबंदी (लॉकडाऊन) हळूहळू उठवण्‍यात येत आहे.  तथापि, कोरोनाचा धोका संपलेला नाही, हेही नागरिकांनी यानिमित्‍ताने लक्षात घेणे आवश्‍यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे अवघड नाही, मात्र त्‍यासाठी वैयक्तिक दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे.

राजेंद्र सरग, 
जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

Friday, June 26, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी समन्वयाने काम करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्‍येष्‍ठ नेते तथा खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा

 गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित

            पुणे,दि.26 : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना  सोबत घेवून त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

            विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक ज्‍येष्‍ठ नेते तथा  खासदार शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

             बैठकीला  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आमदार शरद रणपिसे, आमदार चेतन तुपे, आमदार भिमराव तापकीर, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार सिद्धार्थ शिरोळे   हे लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे  संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य सेवा व अभियान विभागाचे संचालक डॉ.अनुप कुमार यादव,  शासनाचे वैद्यकीय सल्‍लागार डॉ. सुभाष साळुंखे, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या सह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी लोकप्रतिनिधींना नियमित संपर्क करावा. तसेच  अधिकाऱ्यांनी त्‍यांना  नेमून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबवावे, अशा सूचनाही श्री.  पवार यांनी दिल्या.

             उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,  कोरोनाच्‍या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोमेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  सर्वांनी समन्‍वयाने काम  केल्यास आपण कोरोनाची लढाई निश्चितपणे जिंकू, असा  विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढवा- ज्‍येष्‍ठ नेते व खासदार शरद पवार

   ज्‍येष्‍ठ नेते व खासदार शरद पवार यांनी इंडियन कौन्‍सील ऑफ मेडीकल रिसर्चच्‍या मार्गदर्शक  सुचनांनुसार कार्यवाही करण्‍यात यावी, तसेच कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्‍याच्‍या सूचना केल्‍या. प्रतिबंधीत क्षेत्राचाही नियमित आढावा घ्‍यावा. खाजगी रुग्‍णालयातील कोरोनाच्‍या रुग्णांवरील उपचारांसाठी  अवाजवी शुल्‍क आकारणी  होणार नाही यासाठी  आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असेही ते म्‍हणाले.

               पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा - आरोग्य मंत्री राजेश टोपे

             कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेतली आहेत. त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा. त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत,  त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटीलेटर बेडस्, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल. कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावा अशा सूचनाही दिल्या.

            आरोग्य मंत्री  टोपे म्हणाले,  स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावे, लोकांच्या मनात कोरोना विषाणूविषयीची भीती  कमी करण्यासाठी सोशल मिडीया तसेच  दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके,  रेडीओ यांचा वापर करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींना विचारात घेवून  जनजागृती करण्यावर भर द्यावा. लहान बाळापासून ते वयोवृध्द आजीपर्यंत अनेकजण  कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या अनुभवातून ‘यशकथा’  तयार कराव्‍यात. राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अॅण्‍टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्‍या दृष्टिने सर्वांनी एकत्र येवून कोरोना विषाणूवर मात करण्याचे आवाहनही  टोपे यांनी केले.

            प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबबावे -गृहमंत्री अनिल देशमुख 

            कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा  एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक विनाकारण फिरतांना आढळून येत असल्‍याच्‍या तक्रारीच्‍या पार्श्‍वभूमीवर  महानगरपालिका व पोलीस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले.

            गृहमंत्री देशमुख म्हणाले, लॉकडाऊन  कालावधीत तसेच लॉकडाऊन  शिथील झाल्यानंतर सोशल मिडीयाचा फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर करण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे.  त्यामुळे फेकन्यूज, नागरिकांचे फसवणुकीचे प्रकार इत्यादी बाबी घडतांना दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी एका सायबर विषयक तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.  कोरोनाच्या लढाईत कोरानाचा संसर्ग होवून मृत्यू पावलेल्या पोलीसांच्या कुटुंबाला सेवानिवृत्त काळापर्यंत शासकीय निवासस्थानात वास्तव्य करता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय गृह विभागाने घेतला आहे, असेही त्‍यांनी सांगितले. लॉकडाऊन  कालावधीत परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले होते. आता ते  परत राज्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी, अशा सूचनाही गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या.

            महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्‍या संसर्गाला आळा घालण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. तसेच चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी महापालिकेला निधी मिळावा, अशी विनंती त्‍यांनी केली.

            खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, कोरोना रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाचे आदेश, सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्‍यांनी सांगितले.  

            खासदार गिरीश बापट यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करायला हवे, अशी सूचना केली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. या केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय सोयी सुविधा द्यायला हव्यात, असे त्‍यांनी सांगितले.

            खासदार अमोल कोल्हे यांनी मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण, रुग्णांना देण्यात येणारी औषधे, रॅपिड टेस्टिंग टेस्‍ट ची सेन्सिटीव्हीटी तपासणे  आदी बाबींचा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे, असे सांगितले.

            आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार शरद रणपिसे, आमदार चेतन तुपे, आमदार भिमराव तापकीर, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके आदी लोकप्रतिनिधींनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

 

 

            विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा आदीं बाबतची माहिती दिली.

            जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली.

            आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्‍यांच्‍या-त्‍यांच्‍या महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वॉर रुम राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना आदींची माहिती दिली.

यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Thursday, June 25, 2020

पुणे विभागातील 13 हजार 576 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 22 हजार 59 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 25 :- पुणे विभागातील  13 हजार 576  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 22 हजार 59 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 7 हजार 548 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 472 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   4.24 टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 17 हजार 905 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 10 हजार 601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 664 आहे. कोरोनाबाधित एकूण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 365 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.21 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.57 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 706 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 631, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 22 , सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 864 रुग्ण असून 680 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 143 आहे. कोरोनाबाधित एकूण 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 2 हजार 209 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 388 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 585 आहे. कोरोना बाधित एकूण 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 316 रुग्ण असून 197 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 110 आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 765 कोरोना बाधीत रुग्ण असून 710बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 46आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 48 हजार 902 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 45 हजार 750 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 152 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 23 हजार 364 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 22 हजार 59 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 25 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक -जिल्हाधिकारी नवल किशोर राम


  पुणे, दि.25: पुणे जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तसेच कामाच्या ठिकाणी व प्रवासात असतांना चेहऱ्यावर मास्क परिधान वापर करण्याचे बंधनकारक करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे.
  राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे. कोविड- 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून  शासनाने लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली आहे. 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन सामप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी 'मिशन बिगीन अगेन' बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाचे ठिकाणी व प्रवासात असताना चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केलेले आहे तसेच सार्वजनिक स्वच्छता राखणे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पान तंबाखू, गुटखा खाऊन थुंकने किंवा त्याशिवाय न थुंकण्याबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बधंनकारक आहे.
  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू केली आहे. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीतील जे नागरिक मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना, थांबलेले असताना व गाडी चालवत असताना आढळून आल्यास अशा व्यक्तींना रुपये 500/- इतका दंड आकारण्यात येणार आहे. तसेच नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत,ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीतील जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखु, गुटखा खाऊन थुंकल्यास किंवा त्या शिवायही थुंकल्यास अशा व्यक्तींना रुपये 500/- इतका दंड आकारण्यात येणार आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रात निश्चित करण्यात आलेल्या दंडाची वसुली ग्रामस्तरावरील ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कर्मचारी  तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, छावणी परिषद क्षेत्रामध्ये संबधित मुख्याधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचेमार्फतीने निश्चित करण्यात आलेल्या दंडाची वसुली करावी. संबंधित भौगोलिक क्षेत्रात दंडाची वसुल केलेली रक्कम ती त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करणे बंधनकारक राहील, असेही निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
  या आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना विरूध्द भारतीय साथरोग अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आदेशीत केले आहे.
0000

दि 25 जून मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय

 

1.महाराष्ट्र राज्य व्यवसाय,व्यापार,आजिविका व नोक-या यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर(सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

2.महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

3.रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ.

4.हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.
5.माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण - २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ.

6.कोविड-१९ च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.

7.राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी.समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार.
8.नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.
9.आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ.राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा.

10. एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार 
11 गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना 

12. कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता.


9 जणांना सोडले घरी; 166 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 190 जणांचे नमुने पाठविले तपासणीला



सातारा दि. 25 (जिमाका) : विविध रुग्णालयांतून व कोरोना केअर सेंटरमधून उपचार घेवून  बरे झालेल्या 9 नागरिकांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातरा येथील माण तालुक्यातील म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय पुरुष.
सह्याद्री हॉस्पिटल कराड येथील कराड तालुक्यातील म्हासोली येथील 65 वर्षीय पुरुष व कोरेगांव तालुक्यातील कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष.
कोविड केअर केंद्र मायणी येथील खटाव तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष.
कोविड केअर केंद्र खावली येथील कोरेगांव तालुक्यातील अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला.
कोविड केअर केंद्र वाई येथील वाई तालुक्यातील शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, शेलारवाडी (बावधन) येथील 49 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष.
190 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातरा येथील 14, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 29, स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय,कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 17, शिरवळ येथील 10, रायगांव 13, पानमळेवाडी 8, मायणी 16 व पाटण येथील 30 असे एकूण 190 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलजे, कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
तसेच काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलजे, कराड यांचेकडून 166 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. 
                                                0000

शासनाच्या निर्णयानुसारच पालखी सोहळा नियोजन भाविकांनी निर्णयाचा मान राखावा- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन

     पंढरपूर, दि.25 :  राज्य शासनाच्या निर्णयानुसारच महापूजा व पालखी सोहळ्याबाबत नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावर घेतलेला निर्णय भाविकांच्या व जनतेच्या हिताचा असेल. त्या निर्णयाचा भाविकांनी व जनतेने मान राखून त्याचे पालन करावे असे, आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले.   आषाढी वारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे उपस्थित होते.
श्री. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालखी सोहळयाची परंपरा अबाधित राखत शासनाने दिलेल्या नियमावली  नुसार ,सार्वजनिक आरोग्याचे रक्षणाच्या दृष्टीने नियोजन करावे लागेल. पालख्या पंढपुरात दाखल झाल्यानंतर पादुकांचे चंद्रभागा स्नान, प्रदक्षिणा, पादुका भेट आवश्यक ठिकाणी मंदीर समिती, नगर पालिका प्रशासन यांनी  नियोजन करावे,
प्रदक्षिणा मार्गावर स्थानिक नागरिकांची गर्दी होणार नाही यांची दक्षता पोलीस प्रशानाने घ्यावी.  पालखी सोहळ्याबाबत पंढरपूरात नेमण्यात येणाऱ्या पोलीस, आरोग्य व इतर  अधिकारी –कर्मचारी यांची स्वतंत्र राहण्याची व आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. सर्व सोयीनियुक्त सुसज्ज रुग्णालयाची व्यवस्था करावी तसेच आवश्यक ठिकाणी रुग्णवाहीका सज्ज ठेवण्यात याव्यात.चंद्रभागा नदीतील पाण्याची पातळी लक्षात घेता संताच्या पादुका स्नानासाठी   घेवून जाणाऱ्या मानकरी यांच्या सुरक्षतितेच्या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी.  मानाच्या पालख्या ज्या  मठात थांबणार आहेत त्या मठांची व परिसराची तसेच स्वच्छता गृहाची निर्जंतुकीकरण करावे,  अशा सूचनाही विभागीय डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी दिल्या.
         या बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, मंदीर समिती मार्फत करण्यात येणारे येथील नियोजन  तसेच कारेानाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.
00000000

मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना जारी केले आदेश. अटी, शर्ती पाळाव्या लागणार



सोलापूर दि.25:- जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह आणि घर व घराच्या परिसरात अटी शर्तींच्या अधिन राहून लग्न समारंभास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत.
या आदेशात त्यांनी नमूद केलेल्या अटी पुढीलप्रमाणे – 

1.लग्न समारंभाच्या ठिकाणी एकावेळी मंगल कार्यालयामधील कर्मचारी, उपस्थित सर्व व्यक्ती, बँन्ड /वादक, भटजी, डेकॉरेटर व इतर यांच्यासह एकूण संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. 
2.मास्क आणि सुरक्षित अंतराचे (social Distancing) पालन करणे बंधनकारक राहील. 
3.लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुनच प्रवेश देणे आवश्यक राहील.
4.मंगल कार्यालयामध्ये एअर कंडीशनचा वापर करू नये, मंगल कार्यालयात सर्व बाजूने हवा खेळती  राहील अशी व्यवस्था करावी.
5.मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तु / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करावे. 
6.लग्नसमारंभ सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00या कालावधीतच आयोजित करावा.
7.कोणतीही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येणार नाही.
8.लग्नसमारंभाच्या ठिकाणी 55 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर माता व दहा वर्षांखालील मुलांचा प्रवेश टाळावा.
9. लग्न समारंभासाठी संबंधित तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. लग्न समारंभाच्या सात दिवस अगोदर पूर्वपरवानगी अर्ज व लग्न समारंभासाठी येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते नमूद करून यादी जमा करणे आवश्यक  राहील.
10. कार्यक्रमाच्या ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावा. मंगल कार्यालय अथवा विवाहस्थळ प्रतिबंधीत क्षेत्रात येत असल्यास विवाह सोहळा आयोजित करता येणार नाही.

वरील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करण्याची कार्यवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबत देखरेखीसाठी पथके नियुक्त केली जाणार आहेत त्यांची रचना पुढीलप्रमाणे असेल.  
नगरपालिका हद्द:- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके स्थापन करावीत.
गावपातळीवर:- ग्रामपंचायत व पोलीस विभागाची संयुक्त पथके स्थापन करावीत.

पथकाबाबत संबधित उपविभागीय अधिकारी यांची संनियंत्रणाची जबाबदारी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51,55तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार  कारवाईस पात्र असेल.
                                                    0000