Wednesday, June 24, 2020

परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती


पुणे दि .24 : -  पुणे ते हतिया (झारखंड) ही 100 वी श्रमिक ट्रेन पुणे येथून दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता रवाना करण्यात आली. आतापर्यंत परराज्यातील एकूण 1 लाख 25 हजार प्रवासी पुण्यातून  श्रमिक ट्रेनमधून रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

                   पुणे ते हतिया ( झारखंड)  रवाना झालेल्या या  श्रमिक ट्रेन  मधुन एकुण 682 प्रवासी  रवाना करण्यात आले. त्यापैकी  618 प्रवासी झारखंडला, 57 प्रवासी  उड़ीसा तर 7 प्रवासी पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात आले. आता पर्यंत पुणे येथून 1 लाख 25 हजार  प्रवासी  श्रमिक ट्रेनने त्या त्या राज्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत.
0 0 0 0

No comments:

Post a Comment