Tuesday, April 26, 2022

शैक्षणिक क्षेत्रात काळानुरूप बदल करून कौशल्य विकासावर भर द्यावा -कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे

 


पुणे, दि. २६ : शिक्षणात समाज परिवर्तनाची क्षमता असते आणि भारती विद्यापीठाचे कार्य याच दिशेने सुरू आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि शैक्षणिक प्रक्रियेत काळानुरूप बदल करून कौशल्य विकासावर भर द्यावा, असे आवाहन आरोग्य आणि कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या 27 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पद्मश्री डॉ.गणेश देवी, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, कुलगुरू माणिकराव साळुंके, डॉ. के. एच. संचेती, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, डॉ.अस्मिता जगताप उपस्थित होते.
श्री. टोपे म्हणाले, शिक्षणाची व्याप्ती वाढली आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि आधुनिक शिक्षणासोबतच मानवतेचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावा. नवीन शैक्षणिक धोरणात या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञान येत आहे, या तंत्रज्ञानाचा शैक्षणिक संस्थांनी स्वीकार करावा. शैक्षणिक क्षेत्रात त्यादृष्टीने बदल करण्याची गरज आहे.
स्वर्गीय पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ स्थापन करून शैक्षणिक क्षेत्राला नवी उभारी देण्याचे कार्य केले. शैक्षणिक क्षेत्रात भारती विद्यापीठाने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचा उल्लेख श्री.टोपे यांनी केला.
राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, भारती विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. स्वर्गीय पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागात शिक्षणासाठी होणारी अडचण लक्षात घेत शैक्षणिक संस्था सुरू केली. भारती विद्यापीठाच्या ग्रामीण भागातील ८५ शाळांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. कोरोना कालावधीत भारती विद्यापीठाने केलेल्या कार्याची दखल देश पातळीवर घेतली गेली. आरोग्य मंत्री श्री. टोपे, डॉ. संचेती, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
पद्मश्री डॉ.गणेश देवी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. भारती विद्यापीठाला महाराष्ट्राच्या प्रगतशील विचाराचा वारसा लाभला आहे. शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने केलेले कार्य महत्व्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.के.एस. संचेती व सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा जीवन साधना पुरस्काराने गौरव करण्यात आला. श्री.संचेती व श्री. आढाव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
000

Monday, April 25, 2022

राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन

 


            मुंबईदि. 25: भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर आनंद सॉ लिखित यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी नुकतेच केले.

            मुंबईतील महाराष्ट्र नेवल एरियामध्ये आय.एन.एस. आंग्रेफोर्ट येथे लेफ्टनंट कमांडर या पदावर कार्यरत असलेले या कादंबरीचे लेखक ए.के. सॉ यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या अनुभवांचे इंग्रजी भाषेतील विविध कथांतून वर्णन केले आहे.

            देशसेवेचे व्रत अविरतपणे जोपसतांना आपल्या अनुभवकल्पनांमधून साकारण्यात आलेले हे पुस्तक वाचकवर्गासाठी साहित्याची भेट ठरेलअसे सांगून राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी लेफ्टनंट कमांडर ए.के. सॉ यांना या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी  लेफ्टनंट अशोक कुमारनेवल अधिकारी तृप्ती शर्मा आदी या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित होते.

००००


राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 



 

            मुंबईदि. 25 :- महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेनेजातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचारानेसहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतताकायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतोसर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागतेहे लक्षात घेऊन राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत केले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीसर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय  सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा गृहविभाग नियमकायद्यानुसारच कार्यवाही करेल. कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनसर्वांच्या सहकार्याने एक चांगला मार्ग निघावाअसा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्थाजातीय सलोखा राहावासौहार्दाचे वातावरण बिघडू नयेयासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

            राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेपरिवहन मंत्री अनिल परबमुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखशेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटीलबहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूरलोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटीलआमदार प्रणिती शिंदेआमदार क्षितीज ठाकूरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकरनितीन सरदेसाईसंदीप देशपांडेसमाजवादी पक्षाचे रईस पठाणएमआयएमचे वारिस पठाणवंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूरआम आदमी पक्षाच्या प्रिती मेननमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकरआरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

कायदा सर्वांसाठी समान - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले कीध्वनीक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांसाठी बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य शासनाने जुलै 2017पर्यंत वेळोवेळी शासननिर्णय जारी केले आहेत. त्या शासननिर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे. समाजात तेढ वाढेलकायदा-सुव्यवस्था बिघडेलअशी वक्तव्ये कुणी करु नयेत. कायदा सर्वांसाठी समान असूनकुणीही कायद्याचा भंग करु नये. आजच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. यावेळी  बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगते व्यक्त केली.      

***********



Friday, April 8, 2022

मुख्यमंत्र्यांचा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, क्षेत्रीयस्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद राज्यातील विकास कामांचा, योजनांचा सर्वंकष आढावा जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशनमोडवर वेग द्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे · मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश

 



 

            मुंबईदि. 8 : राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागामिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या, तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे गतीने पूर्ण कराअशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्या. मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेऊन पूरअतिवृष्टी तसेच दरड कोसळणे अशा आपत्तीच्या प्रसंगाचा सामना करण्यासाठी योग्य ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविण्याचे निर्देशही यावेळी दिले.

            मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तसर्व जिल्हाधिकारीसर्व महानगरपालिका आयुक्तजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधिक्षक आदी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यात त्यांनी राज्याच्या प्राधान्यक्रमावरील कामांचा आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगेमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांच्यासह सर्व विभागांचे  सचिवस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जनहिताच्या योजनांचे मिशन निश्चित करा

            जनहिताच्या योजनांचे एक मिशन निश्चित करून त्यासंबंधीचे प्रस्ताव प्रत्येक जिल्ह्यातून मागवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

विभागीय मुख्यमंत्री कार्यालय सक्षमतेने कार्यान्वित ठेवा

            सर्वसामान्य जनतेची जी कामे स्थानिक पातळीवर होऊ शकतात त्यासाठी त्यांना मुंबईत येण्याची गरज पडू नये, या उद्देशानेच प्रत्येक विभागात विभागीय मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यासाठी महिन्यातील एक दिवस पूर्ण आढावा घेऊन सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भातील आढावा एका विशेष बैठकीद्वारे स्वत: घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

जिल्ह्यातील विविध विकासकामांकडे लक्ष द्यावे

            कृषीशिक्षणआरोग्य या क्षेत्रांसह जिल्ह्यातील उद्योगगुंतवणूक तसेच कौशल्य विकासाची व रोजगार संधींच्या निर्मितीची कामे वेगाने सुरु होतील, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीप्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची पूर्तता याकडेही लक्ष देण्यात यावे.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवा

            राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. पाण्याची ठिकाणे शाळेपर्यंत पोहचण्यासाठी जिथे पूल नाहीत, तिथे साकव बांधून महिला तसेच विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची सुविधा निर्माण होईल, असे पहावे.

वेळेत कर्जपुरवठा व्हावा

            खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा सुरळीत पुरवठा होईलपीक कर्जाचे बँकाकडून वेळेत वितरण होईल याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्याने ते नवीन पीक कर्जास पात्र झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. नागपुरातील पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली होती. त्यावेळी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची जाहीर केले होते. मध्यंतरी कोविडच्या बिकट परिस्थितीत हे अनुदान वाटप थांबले होते. आता अर्थसंकल्पातही या अनुदानासाठी तरतूद केली आहे. हे अनुदान वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य

            जिल्ह्यात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण होईलपर्यावरणाचा समतोल राखून पायाभूत सुविधांची कामे करतांना जिथे भूसंपादनाची कामे बाकी आहेत तिथे ती वेगाने मार्गी लावावीत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कोविडविरुद्ध असामान्य लढा

            कोविडकाळात सर्व विभागीय तसेच जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता प्रचंड मेहनत घेतलीअसामान्य लढा दिला त्यामुळे आज कोरोना नियंत्रणात आणता आला. यासाठी मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीकेंद्र सरकारने आता आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने आपण कोविड निर्बंध शिथील केले आहेत. असे असले, तरी कोरोनाचा नवीन विषाणू कुठे ना कुठे जन्माला येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मास्क सक्ती नसली तरी मुक्तीही झालेली नाही, हे ही नागरिकांनी लक्षात घ्यावे व स्व-संरक्षणासाठी मास्कचा वापर करावा. मास्क वापरण्याचे बंधन नसले तरी आपली जबाबदारी कायम आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विविध विभागांच्या योजना तसेच पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा

            बैठकीत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनआरोग्य सेवा आणि संस्थांचे बळकटीकरणकुपोषण निर्मुलनकृषी व खरीप हंगामपीक कर्जाचे वितरणपाणी टंचाईमान्सूनपूर्व कामेउद्योगकौशल्य विकासरोजगार संधी,रस्ते आणि योजनांवरील खर्चजलजीवन मिशनपायाभूत सुविधांची कामेभूसंपादन आदी विषयांच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या सचिवांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना करावयाच्या कामांबाबत माहिती दिली.

००००


विंग्ज इंडिया 2022 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) ला अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान

 


 

            मुंबईदि. 8 नागरी उड्डयन मंत्रालयभारत सरकार (एमओसीए) आणि फिक्कीद्वारे आयोजित विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि अवार्डस् समारंभात महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनीला (एमएडीसी) अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

            सर्वोत्कृष्ट नागरी उड्डयन पद्धतीनवीनतम कल आणि नवकल्पना प्रदर्शित करणे आणि आदान – प्रदान करणे या उद्देशाने दिनांक 24 ते 27 मार्च 2022 या कालावधीत बेगमपेट विमानतळहैदराबाद येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

            महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) ने विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि विंग्स इंडिया अवॉर्ड्समध्ये "भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले. एमएडीसीने महोत्सवाच्या ठिकाणी अतिशय प्रशस्तनाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विमान वाहतूक क्षेत्रातील ठळक वैशिष्ट्येएमएडीसीमिहान प्रकल्पमिहानमधील प्रमुख विमान वाहतूक प्रकल्प आणि मिहानमधील कंपन्यांची माहिती प्रदर्शित करत विमान वाहतूक क्षेत्रातील राज्याच्या लक्षणीय  कामगिरीचे प्रदर्शन केले. मान्यवर आणि व्यावसायिक ग्राहकांना हाताळण्यासाठी आणि बिझनेस टू बिझनेस मीटिंग आयोजित करण्यासाठी एअरसाइडवर आणखी एक सुंदर दालन उभारण्यात आले होते.

            केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्तेप्रामुख्याने शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड यांना  "बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर" या श्रेणीतील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

            राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी या पुरस्काराबद्दल एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले असून एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेलअशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

000