Monday, October 12, 2020

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनबाबत पुण्यात आढावा बैठक


पुणे,दि.12: महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशन संदर्भात पुण्यातील विधानभवन सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे(व्हीसी द्वारे), विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत तसेच अवर सचिव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

या बैठकीत विधानमंडळ कार्यवृत्तांसाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

0000000








पुणे विभागातील 4 लाख 8 हजार 495 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 लाख 73 हजार 341 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव


       पुणे,दि.12 :- पुणे विभागातील 4 लाख 8 हजार 495 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 73  हजार 341  झाली आहेतर ॲक्टीव रुग्ण संख्या 52  हजार 91 इतकी आहेकोरोनाबाधीत एकुण 12 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहेपुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.30  टक्के आहेअशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 6 हजार 864  रुग्णांपैकी 2 लाख 68 हजार 526 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण 31 हजार 282 आहेकोरोनाबाधित एकूण 7  हजार 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहेमृत्यूचे प्रमाण 2.30  टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.51  टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41  हजार 611 रुग्णांपैकी 33 हजार 533 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 6  हजार 714 आहेकोरोनाबाधित एकूण 1 हजार 364  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 847 रुग्णांपैकी 30 हजार 282 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 5  हजार 300 आहेकोरोनाबाधित एकूण 1 हजार  265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 41  हजार 171 रुग्णांपैकी  35 हजार 383  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 268 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 848  रुग्णांपैकी 40 हजार 771 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 527  आहेकोरोनाबाधित एकूण 1  हजार 550  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 703 ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 720सातारा जिल्ह्यात 316सोलापूर जिल्ह्यात 256सांगली जिल्ह्यात 277   तर कोल्हापूर जिल्ह्यात 134 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण - 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 5 हजार 13 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 790 ,सातारा जिल्हयामध्ये 422, सोलापूर जिल्हयामध्ये 260, सांगली जिल्हयामध्ये 546 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 995 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 20 हजार 294 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झालाप्राप्त अहवालांपैकी 4  लाख  73 हजार 341  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्हआहे.

टिप :- दि.  11 ऑक्टोबर  2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

                         *****


Friday, October 9, 2020

पुणे स्मार्ट सिटी ऍडव्हायजरी फोरमची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ‘पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 




            पुणे, दि. 9 : पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरु असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात पारदर्शकता असली पाहिजे. निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या व ‘स्मार्ट सिटी’ मिशनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ‘स्मार्ट सिटी’ संदर्भातील पुणे शहराचे राष्ट्रीय रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न व्हावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. 


       'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेड'च्या 'स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम'ची पाचवी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील विधानभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, अॅडव्हायजरी फोरमचे सदस्य सतीश मगर, अनिरुद्ध देशपांडे तसेच अन्य पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करुन कामे वेळेत व्हायला हवीत. देशात पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

  प्रकल्प राबविताना लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ञांच्या सूचना विचारात घेऊन 'स्मार्ट सिटी मिशन' च्या मार्गदर्शक तत्वानुसार कामे  करुन घ्यावीत.  कामात पारदर्शकता ठेवून कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून सुरु असणारी कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

 

खासदार गिरीश बापट यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासंदर्भात अनेक उपयुक्त सूचना केल्या. या प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेली विविध विकास कामे जलद पूर्ण करावीत, असेही त्यांनी सुचविले. 

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचे सादरीकरण करुन माहिती दिली. 

                                                                                 ****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ॲग्रो ॲम्बुलन्स लोकार्पण

 





           पुणे,दि. 9: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिरती माती, पाणी व पानदेठ परिक्षण प्रयोगशाळा असलेल्या ॲग्रो ॲम्बुलन्सचे  लोकार्पण करण्यात आले. शेतक-यांच्या सेवेत ही सेवा दाखल होत आहे.

         विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारसुविधेत सातत्याने वाढ रुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

 






             पुणे, दि. 9 : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घेवून त्यानुसार योग्य कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

             'कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खा. सुप्रिया सुळे, (व्हिसीव्दारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीष बापट, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, आमदार अतुल बेनके, आमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

             उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी शासन, प्रशासन व जनतेच्या सहकार्यातून कोरोनासंकटावर  मात करणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला. रुग्णालयांमध्ये स्वच्छता असावी, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा सुरळीत रहावा, अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेला गती देण्यासोबतच बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

           विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमे  अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ.सुभाष साळुंखे म्हणाले, 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार अभियान राबविण्यात येत आहे.पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

             विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.

             पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                                                                             0000000