Friday, July 31, 2020

सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केले- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर


पुणे दि. 31 :- आपण सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्‍याची भावना मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्‍यक्‍त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे डॉ.  म्हैसेकर आज (31 जुलै ) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल मध्ये पार पडलेल्या निरोप समारंभात त्‍यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. यावेळी  विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्‍या पत्‍नी रोहिणी आणि मुलगा अथर्व उपस्थित होते. त्याचबरोबर नूतन विभागीय आयुक्त सौरभ राव, अपर विभागीय आयुक्त राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, साताऱ्याचे  जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भागवत, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त शांतनू गोयल, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच  विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आपले कर्तव्य पार पाडतांना परिस्थितीची जाणीव ठेवावी लागते. समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेवून काम केल्यास कामाचा आनंद मिळतो. सामान्य नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड विश्वास असतो. या विश्वासाला तडा न जावू  देता काम करणे गरजेचे असते. सामान्य माणसाला योग्य प्रकारे न्याय मिळेपर्यंत परिस्थिती हाताळली पाहिजे. आपण सर्वजण महत्त्वाच्या पदावर काम करतांना शासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असतो. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून, सहकाऱ्यांना सोबत घेत काम करणे फार महत्त्वाचे असते. एखाद्या प्रकरणाचा निकाल देतांना सर्व बाजूंनी विचार करुन वस्तूनिष्ठ निकाल देण्याचा प्रयत्न असला पाहिजे. प्रत्येक संकट आपल्यासाठी संधी असते. या संकटावर मात करण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून शांतपणे विचार करुन निर्णय घेणे अपेक्षित असते. या काळात सर्वांचे सहकार्य लाभले, याबद्दल सर्वांचा आभारी आहे, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.

            परभणी येथे जिल्‍हा परिषदेत उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून काम करत असतांना एका शेतकऱ्याने दुपारी 4 च्‍या दरम्‍यान नाव लिहून भेटण्‍यासाठी चिठ्ठी पाठवली. कामाच्‍या व्‍यापात त्‍याला सायंकाळी 6 वाजता चेंबरमध्‍ये बोलावले. पण तो निघून गेला होता. त्‍यानंतर तीन-चार दिवसांनी तो आल्‍यानंतर त्‍याला म्‍हणालो, ‘एवढी काय घाई होती, थांबायला काय झालं होतं?’,त्‍यावर तो शेतकरी नम्रपणे म्‍हणाला, ‘साहेब, मला गावाला परत जायला संध्‍याकाळी 6 ला शेवटची बस होती. मी जर थांबलो असतो, तर मला मुक्‍काम करावा लागला असता आणि माझी इथं काहीही सोय नाही’ या प्रसंगानंतर मी सामान्‍य माणसाला कधीही वाट पहायला लावली नाही, अशी आठवण डॉ. म्‍हैसेकर यांनी सांगितली.

            नूतन विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यात अनेक नामवंत अधिकारी होऊन गेले आहेत. त्यांची प्रशासकीय कार्यप्रणाली आमच्यासारख्या अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. या प्रशासकीय कार्यप्रणाली व संस्कृतीमुळे महाराष्ट्राचे नाव देशभरात नेहमी चर्चेत असते. डॉ. म्हैसेकर यांच्यासोबत काम करतांना त्यांच्या कार्यपद्धतीचा, बारकाईने अभ्यास करण्याच्‍या गुणाचा फायदा होणार आहे. कोविड परिस्थितीवर मात करण्यास आम्हा सर्वांसाठी त्यांचा अनुभव मार्गदर्शक ठरणार आहे. श्री. राव यांनी रामायणातील ‘धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी’ या उक्‍तीचा संदर्भ दिला. संकटकाळात धैर्य, धर्म, मित्र यांची खरी ओळख होते. कोरोनाच्‍या संकटकाळात काम करतांना सर्वांच्‍या मदतीने यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला. या पुढील कालावधीत कोविड प्रादुर्भाव रोखणे हे आमच्यासमोरील प्रमुख आव्‍हान आहे, या करिता आपणाला ‘मिशन मोड’वर काम करुन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे,असे सांगून डॉ.म्हैसेकर यांचे पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व उत्तम आरोग्यदायी जावो, अशा शुभेच्छाही श्री. राव यांनी यावेळी  दिल्या.

            जिल्हाधिकारी नवल किशार राम म्हणाले, डॉ. म्‍हैसेकर यांच्या सोबत काम करतांना त्यांचा अनुभव आमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली, त्याचे श्रेय डॉ. म्हैसेकर यांच्‍या नेतृत्‍वाला जाते. त्यांच्या अंगी असलेली उत्तम सांघिक कार्य करण्याची क्षमता, नेतृत्वगुण, शांत आणि कार्यतत्पर वृत्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. कोवीड-19 च्या अनुषंगाने त्‍यांनी  नियोजनपूर्वक रणनिती आखली होती. त्‍याचा आम्‍हाला कोरोनाचे संकट कमी करण्‍यात मदत झाली.

             कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माध्यमांच्यावतीने जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या सह विविध अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी केले.

पुणे विभागातील 62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 1 लाख 3 हजार 411 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 31 :- पुणे विभागातील  62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 271 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 21  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.68 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील  82 हजार 924 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित 52  हजार 450  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28  हजार 542 आहे.                                                                                        यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 170 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 822, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 105 , पुणे कॅन्टोंन्मेंट  144, खडकी विभागातील 20, ग्रामीण क्षेत्रातील 2  हजार 281, यांच्याकडील  रुग्णांचा समावेश आहे. 
          पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 315, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 350, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 58, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 41 , व ग्रामीण क्षेत्रातील 137, रुग्णांचा समावेश आहे. तसेच  738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  63.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.33 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 754 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 825, सातारा जिल्ह्यात 162 , सोलापूर जिल्ह्यात 204,  सांगली जिल्ह्यात  222 तर कोल्हापूर जिल्ह्यात  341 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 824  रुग्ण असून  1  हजार 982   बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 713 आहे. कोरोनाबाधित एकूण 129  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सोलापूर जिल्हयातील 8 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण असून  4 हजार 817  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3 हजार 143 आहे. कोरोना बाधित एकूण  483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 169 रुग्ण असून  612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार  487 आहे. कोरोना बाधित एकूण  70  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 6 हजार 51  कोरोना बाधीत रुग्ण असून  2  हजार 509 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 386 आहे. कोरोना बाधित एकूण 156  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 1 हजार  356 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  4 लाख 95 हजार  680 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 3  हजार 411 नमून्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आहे.
( टिप :- दि. 31 जुलै 2020 रोजी दुपारी  3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

Thursday, July 30, 2020

जिल्ह्यातील 163 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित


सातारा दि. 31 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 163 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
 कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
पाटण तालुक्यातील त्रिपोडी येथील 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 25 वर्षीय महिला, मल्हार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील बोरगाव येथील 17 वर्षीय युवक, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 28 वर्षीय महिला, बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती, परखंदी येथील 73 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, मुंगसेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यातील  शामगाव येथील 76,44 वर्षीय महिला 13 वर्षीय मुलगी,कालवडे येथील 14,12,13 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला व  20 वर्षीय पुरुष, घरलवाडी येथील 59 वर्षीय पुरुष,वडगांव येथील 63 वर्षीय पुरुष 60,34 वर्षीय महिला, 7,9 वर्षीय बालीका, शिवडे येथील 25,63 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय पुरुष,उंब्रज येथील 65,58 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष व 65,37 वर्षीय महिला व 14,17 वर्षीय बालक, आगाशिवनगर येथील 36,40,65 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय बालक, 19 वर्षीय तरुण, 17 वर्षीय युवती,  गजानन हौ. सोसा. येथील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 37 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 25 वर्षीय महिला, कोयनावसाहत येथील 20,50,37,37 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष,18,12वर्षीय युवक व 15 वर्षीय युवती, मलकापूर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष,रविवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बु. येथील 34 वर्षीय पुरुष,सह्याद्री हॉस्पिटल येथील 16 वर्षीय युवती, 46,35 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 89 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, पंढरपूर फाटा येथील 26 वर्षीय पुरुष,28 वर्षीय महिला, वींग येथील 45 वर्षीय पुरुष व 74 वर्षीय महिला, खंडाळा येथील 30, 33 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 20 वर्षीय पुरुष,राजेवाडी येथील 75 वर्षीय महिला, मंडई कॉलनी शिरवळ येथील 19 वर्षीय महिला, मोरवे येथील 67 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील भवानी पेठ येथील 28,21 वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील 3, 12 वर्षीय बालक, 23,38 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 57 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष, अतीत येथील 49 वर्षीय पुरुष, औंध येथील 70 वर्षीय महिला, गोडोली येथील 39 वर्षीय महिला,शिवथर येथील 61 वर्षीय पुरुष, शाहुपुरी येथील 63 वर्षीय पुरुष, सदर बझार येथील 23 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील दहिवडी येथील 33,35 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, शिंगणापूर येथील 69 वर्षीय पुरुष. 
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 36 वर्षीय पुरुष, पिंपोडे येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, वाघोली येथील 35 वर्षीय महिला व 55,60,74 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 50 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, रहीमतपुर येथील 24 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 70 वर्षीय महिला.
खटाव तालुक्यातील खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडुज येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मायणी येथील 39,31 वर्षीय पुरुष. 
फलटण तालुक्यातील जींती नाका येथील 18 वर्षीय युवक, 33,74 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 45, 20, 39 वर्षीय पुरुष, 17,14,13 वर्षीय युवती व 35  वर्षीय महिला व 4 वर्षाची बालीका, रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, सासवड येथील 70,64 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 38 वर्षीय पुरुष, उपळे येथील 53 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 11,9,7 वर्षीय बालीका 70,23 वर्षीय महिला, 58,23,38,51,60,55 वर्षीय पुरुष,  गोडवली येथील 31,70,23 वर्षीय महिला, मल्होत्राभवन भोसे खिंड येथील 30 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालीका, पाचगणी येथील 24 वर्षीय पुरुष व 22 व 48 वर्षीय महिला.
जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी 55,60,25,31,45,60 वर्षीय महिला,75,40,35,30,29,53,57,91 वर्षीय पुरुष व 10,8 वर्षाचा बालक व 6 वर्षाची बालीका,सायगाव येथील 54 वर्षीय पुरुष.
घेतलेले एकूण नमुने 27870
एकूण बाधित 3824
घरी सोडण्यात आलेले 1982
मृत्यू 130
उपचारार्थ रुग्ण 1712

00000 
नोट : दोन जणांचे रिपोर्ट बाहेरच्या जिल्ह्यातील असल्यामुळे कमी करण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा ; मृत्यूदर रोखण्यासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्या -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पुण्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात आढावा







पुणे दि. 30: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या, जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच कोरोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब आहे, अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी हे प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून मुख्यमंत्री  म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिका-यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे तसेच प्रत्येक प्रभाग अधिका-याने आपल्या प्रभागात कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करा, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला कोरोनामुक्त करूया, असा आशावाद व्यक्त करतानाच येत्या काही  दिवसात आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितपणे मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे तसेच पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी तसेच इतर उपस्थित अधिका-यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गणेश सोनोने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुकत् स्मिता झगडे यांनी वॉर्डनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 98 हजार 657 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  पुणे दि. 30 :- पुणे विभागातील  60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  98 हजार  657 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 885 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 682  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 982  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.91 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण   2.72 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील  79 हजार 99 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित 50  हजार 573  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार 656 आहे.                                                                                      यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 हजार 420 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 227, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 98 , पुणे कॅन्टोंन्मेंट  148, खडकी विभागातील 22 , ग्रामीण क्षेत्रातील 1  हजार 741, यांच्याकडील  रुग्णांचा समावेश आहे.  
         पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण  1 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 290 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 331, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 56 , पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 39 , व ग्रामीण क्षेत्रातील 123 , रुग्णांचा समावेश आहे. तसेच  738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  63.94  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.36 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 581 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 430 , सातारा जिल्ह्यात 138 , सोलापूर जिल्ह्यात 297,  सांगली जिल्ह्यात  182 तर कोल्हापूर जिल्ह्यात  534 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 662  रुग्ण असून  1  हजार 933   बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1601 आहे. कोरोनाबाधित एकूण 128  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 8 हजार 239  कोरोना बाधीत रुग्ण असून  4 हजार 696  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3 हजार 63   आहे. कोरोना बाधित एकूण  480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 947 रुग्ण असून  612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार  271 आहे. कोरोना बाधित एकूण  64  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 5 हजार 710  कोरोना बाधीत रुग्ण असून  2  हजार 276 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3   हजार 294 आहे. कोरोना बाधित एकूण 140  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 84 हजार  272 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  4 लाख 78 हजार  282 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5  हजार  950 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  3 लाख 78  हजार 800 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. 
( टिप :- दि. 30 जुलै 2020 रोजी दुपारी  3.00  वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पुण्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात आढावा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा मृत्यूदर रोखण्यासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्या -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे






पुणे दि. 30: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या, जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच कोरोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब आहे, अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी हे प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून मुख्यमंत्री  म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिका-यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे तसेच प्रत्येक प्रभाग अधिका-याने आपल्या प्रभागात कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करा, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला कोरोनामुक्त करूया, असा आशावाद व्यक्त करतानाच येत्या काही  दिवसात आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितपणे मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे तसेच पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी तसेच इतर उपस्थित अधिका-यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गणेश सोनोने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुकत् स्मिता झगडे यांनी वॉर्डनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडून -मुख्यमंत्री सहायता निधीस 51 हजार रुपयांची मदत



पुणे, दिनांक 30- कोरोना विरुद्धच्या लढयात समाजातील सर्वस्तरातील लोकांकडून, सामाजिक संस्थांकडून शासनाला सहकार्य मिळत असून  आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश  विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री   उद्धव ठाकरे यांच्याकडे  सुपूर्त केला.
                  विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या कोरोना प्रतिबंधक आढावा बैठकीवेळी हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
                                                      0 0 0 0  0

मंत्रिमंडळ निर्णय

*| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २९ जुलै २०२० |*


● कोव्हिडमध्ये विकास कामांची गती मंदावू नये म्हणून शासकीय कंत्राटदारांसाठी विविध उपाययोजना जाहीर
● धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळी सुधारणार
● कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय
● महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पास मान्यता
● विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून
https://mahasamvad.in/?p=19010

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दहावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन*
_प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद मोठा, भावी वाटचालीस शुभेच्छा_
https://mahasamvad.in/?p=18988

*दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन*
_अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन_
https://mahasamvad.in/?p=18983

*मुंबई पोलिसांना कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थान ठेवण्याची मुभा - गृहमंत्री अनिल देशमुख*
https://mahasamvad.in/?p=18995

*स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी - मंत्री छगन भुजबळ*
https://mahasamvad.in/?p=18986

*राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर*
_आज बरे झाले ७४७८ रुग्ण - आरोग्यमंत्री राजेश टोपे_
https://mahasamvad.in/?p=19030

_अर्थसंकल्पातील घोषणेची पूर्तता_
*ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका - आरोग्यमंत्री राजेश टोपे*
https://mahasamvad.in/?p=18990

*पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयास १२ कोटी ७९ लाख रुपये निधी मंजूर*
_सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती_
https://mahasamvad.in/?p=19007

*वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार*
_येत्या ३१ जुलैला न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडू - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख_
https://mahasamvad.in/?p=19016

*प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत*
_शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन_
https://mahasamvad.in/?p=19005

*पाणीपुरवठा विभागातील तालुका स्तरावरील समूह व गट समूह समन्वयकांच्या सेवा ३० सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ*
_पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती_
https://mahasamvad.in/?p=19014

*दिशाभूल करणारे अन्नघटक वेष्टनावर छापणाऱ्या कंपनीवर छापा*
https://mahasamvad.in/?p=19026

*कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १४ हजार गुन्हे दाखल; ३१ हजार व्यक्तींना अटक*
https://mahasamvad.in/?p=19002
__
_MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग, जिओ चॅट आणि टेलिग्राम चॅनल वर फॉलो करू शकता._

Wednesday, July 29, 2020

एक लाख शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम- कृषी मंत्री दादाजी भुसे



पुणे, दि. २९- कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  यांच्या संकल्पनेतून कौशल्‍यावर आधारित काम करणा-या एक लाख शेतमजुरांसाठी महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

      शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या पीक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सूक्ष्म सिंचनाची देखभाल -दुरूस्ती, रोपवाटिकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी इ. सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिल्यास कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होवून शेतकऱ्यांना सुध्दा मोठा फायदा होणार आहे. शेतमजुरांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची शेतक-यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन   व गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये १ लाख मजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठरविले असून प्रत्यक्ष अंमलबजावणीस  सुरूवात करण्यात आलेली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्राशिक्षणाचे प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार असून त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
सद्यस्थितीमध्ये कापूस व मका या प्रमुख पिकासाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरुन किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल.
या प्रशिक्षणाबाबत संबंधित जिल्ह्यातील प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन 
संचालक, आत्मा,
कृषि आयुक्तालय यांनी केलेआहे.

पुणे विभागातील 56 हजार 414 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरीविभागात कोरोना बाधित 95 हजार 76 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 29 :- पुणे विभागातील 56  हजार 414 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  95 हजार 76  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 36 हजार 77 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार  585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  955 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.34 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.72 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 76  हजार 669 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित 47  हजार 197  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 663 आहे.                                                                                                                                                                              यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार488 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 327, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 93, पुणे कॅन्टोंन्मेंट 144 , खडकी विभागातील 24 , ग्रामीण क्षेत्रातील 1  हजार 587 , यांच्याकडील  रुग्णांचा समावेश आहे.  
                पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1  हजार 809 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 254 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 322 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील  53, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील  37, व ग्रामीण क्षेत्रातील 112 , रुग्णांचा समावेश आहे. तसेच  698 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  61.56  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.36  टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार    11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 20, सातारा जिल्ह्यात 182 , सोलापूर जिल्ह्यात 263 , सांगली जिल्ह्यात  112 तर कोल्हापूर जिल्ह्यात 434 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 524  रुग्ण असून 1   हजार 865  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 540  आहे. कोरोनाबाधित एकूण 119  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 7 हजार  942 कोरोना बाधीत रुग्ण असून  4 हजार  648 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार  824 आहे. कोरोना बाधित एकूण  470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1  हजार 765 रुग्ण असून  612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 96 आहे. कोरोना बाधित एकूण  57  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 5 हजार 176  कोरोना बाधीत रुग्ण असून  2  हजार 92 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2  हजार 954 आहे. कोरोना बाधित एकूण 130   रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 69 हजार  420 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4  लाख 64 हजार  547 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  4 हजार 873  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  3 लाख 68  हजार 625 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. 

( टिप :- दि. 29 जुलै 2020 रोजी दुपारी  3.00  वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

कोवीड –19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन


  पुणे विभागासाठी प्लाझ्मा दान सुविधेसाठी वेगळे ॲप
पुणे दि.29: कोवीड – 19 वर आजतागायत  कुठलेही रामबाण औषध निघाले नसले तरी कोवीडबाधित रुग्णांचा 28 दिवसानंतर ती व्यक्ती कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुस-या बाधित रुग्णाला देता येतो.कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, प्लाइमा ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. प्लाझ्मा दान करणारी व्यक्ती 18 ते 60 वयोगटातील कुठलीही व्यक्ती ज्या व्यक्तीचे वजन 50 किलो पेक्षा जास्त आहे तसेच हिमोग्लोबीन 12.5 पेक्षा जास्त आहे, अशी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. आपण किंवा आपल्या परिचित व्यक्ती ज्यांना कोवीड होता, त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दानमुळे कोणताही धोका त्या व्यक्तीला पोहचत नाही, प्लाझ्मा दानमुळे दोन व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आपण किंवा आपल्या परिचित व्यक्तीला प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करावे. असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे विभागासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी वेगळे ॲप तयार करण्यात येत आहे. त्या ॲपमध्ये प्लाझ्मा दान करण्यासाठी आपली नोंद करू शकतात. त्याबरोबर आपल्याला किंवा आपल्या परिचित  व्यक्तीला प्लाझ्माची गरज भासल्यास  प्लाझ्माची मागणी करू शकतात, प्लाझ्मा दान रक्तदानासारखेच आहे, हे अमुल्य दान आहे. म्हणून कोरोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यास पात्र असल्यास प्लाझ्मा दान करुन गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

Tuesday, July 28, 2020

रुग्णांच्या मृत्युच्या कारणांचे सखोल परीक्षण करुन रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणावा-केंद्रीय पथक प्रमुख कुणाल कुमार



पुणे दि. 28:- पुण्यातील प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून यापुढे रुग्णांना जलद गतीने व प्रतिसादात्मक उपचार दिले जावेत. तसेच रुग्णांच्या मृत्युच्या कारणांचे अधिक सखोल परीक्षण करण्यात येऊन रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी सूचना केल्या.
 केंद्रीय पथक प्रमुख कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुणे शहर व परिसरातील कोविड परिस्थिती व उपाययोजना या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस केंद्रीय पथकामधील सदस्य अरविंद कुशवाह आणि डॉ. सिमीकांता बॅनर्जी उपस्थित होत्या. त्याचबरोबर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,  विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल तसेच महानगरपालिका व शहरामधील प्रमुख रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
          केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देवून यांच्यावरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच सर्व रुग्णालयांमध्ये सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसवावे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार रुग्णांना उपचार करावे, रुग्णांना मानसिक उपचार देणे तसेच लक्षणे नसणा-या रुग्णांना गृह विलगीकरण करीता प्रवृत्त करण्याबरोबरच मृत्यूदर शुन्यावर आणण्याकरीता प्रयत्न करावेत, अशा सूचनाही दिल्या.
        विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी प्रशासन व आरोग्य यंत्रणा ह्या चांगले काम करत असून त्यांनी आपली बांधिलकी जपली आहे. शासनाने सर्व आरोग्य कर्मचा-यांना विमा योजना लागू केलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य कल्याण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला (वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह) दिला जात आहे. तसेच शासनाच्या सुचनेनूसार सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसविण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
       विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी या समस्यांबाबत शहरामधील मेडीकल असोसिएशनबरोबर बैठका घेऊन निर्णय घेण्यात आलेले आहेत. प्रशासनाची भूमिका स्पष्ट असून प्रत्येक व्यक्तीचे प्राण वाचले पाहिजेत. तसेच पुढील 45 दिवस आपणा सर्वांना संकटकालीन योद्धा म्हणून काम करावयाचे आहे याची जाणीव ठेवून काम करावे, असे सांगितले.
       बैठकी दरम्यान शहरामधील प्रमुख रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना येणा-या विविध समस्या मांडल्या.
**

लॉकडाऊनमध्ये मृत्यूदर घटविण्यात यश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती



                सोलापूर, दि. 28: लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर घटविण्यात  यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. सोलापूरचा मृत्यूदर काही दिवसापूर्वी सुमारे दहा टक्के होता. वाढविलेल्या चाचण्या आणि त्वरीत करण्यात आलेले उपचार यामुळे तो आता 5.5 टक्क्यावर आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
                सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 17 जुलै ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
                जिल्हाधिकारी  श्री. शंभरकर यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या कालावधीत टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले. 1 जुलै ते 27 जुलै या कालावधीत सुमारे 33 हजार 870 चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यातून 5 हजार 701 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या.  लॉकडाऊन कालावधीत 12 हजार 146 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. या वाढलेल्या टेस्टमुळे उपचारासाठी आवश्यक असणारी आरोग्य  व्यवस्थाही विकसित करण्यात आली. सध्या जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 664, डेटिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 3 हजार 499 आणि डेटिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 3 हजार 499 बेडची क्षमता विकसित करण्यात आली.
                गंभीर रुग्णांवर नामवंत डॉक्टरांकडून उपचार करता यावे यासाठी टेलि-आयसीयु प्रणाली  लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, पुणे येथील डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या हायस्पीड डाटा लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
                सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध ठिकाणी उभारण्यात येणारी कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलसाठी पदभरती  प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ३८२४ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
                  केटरिंग कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये योगासने, प्राणायाम, संगीत यांचाही उपचारासोबत वापर करण्यात आला. तिथे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. समुपदेशक नेमण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने  लॉकडाऊनच्या कालावधीत सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजूंना सुमारे 36 हजार  फूड पाकिटांचे वितरण केले ,असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
यावेळी श्री.शिंदे, श्री. शिवशंकर, श्री. पाटील, श्री. वायचळ यांनीही लॉकडाऊन काळात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
                                                                                00000000

जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन


पुणेदि. 28 जुलै (जिमाका) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील टाळेबंदीमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक १.० व २.० अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरु करण्यात आलेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. याबाबीचा विचार करता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्यावतीने नोकरीकरीता इच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी एका परिपत्रकान्वये दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना किंवा कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे वेल्डर, पेंटरफिटरमोटार मेकॅनिकडिझेल मेकॅनिकमशिनिस्ट, शीटमेटल वर्करएमएमटीएम, मशीन ऑपरेटरइलेक्ट्रीशियनग्राईडर, टर्नर यासारखे आयटीआय ट्रेड व एनसीटीव्हीटी या सारख्या पदासाठी आवश्यक त्या तांत्रिक पात्रताधारक उमेदवारांसाठी एकूण 3 हजार 85 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ‘ऑनलाईन’ पध्दतीने नोंदवावे. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावीजेणेकरुन कोरोनाच्या प्रादूभार्वामुळे शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार या उभयतांना सहज शक्य होईल.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाणदिनांक व वेळ एसएमएस अलर्ट द्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक-युवतींनी 4 ऑगस्ट २०२० रोजी पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, तसेच या रोजगार मेळाव्यात केवळ ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार असल्याने ई-मेलद्वारे सादर केलेले अर्जविचारात घेतले जाणार नाहीत, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
*****
--

Monday, July 27, 2020

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल


पुणे, दि. 27: प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२०-२१ या खरीप हंगामापासून राज्यात तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल यांनी दिली आहे.
     जिल्ह्यात पीक विमा योजना प्रसिद्धीची सुरूवात दक्षता पथकाचे अधिक्षक कृषी अधिकारी श्री मुळे आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधिक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवडी यांच्या हस्ते विमा योजना विषयी माहिती असलेल्या प्रचार रथाला झेंडा दाखवून करण्यात आली.
       प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे-नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतक-यांना नाविण्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हा हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे.
       ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी आहे, कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २.० टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे, या प्रकारची प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
        या योजनेतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पूरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार असल्याची माहितीही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री पडघलमल यांनी दिली आहे.
**

शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्याकरीता महा ई-सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र रात्री 9 वाजेपर्यंत चालु ठेवण्यास परवानगी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम


पुणे, दि. 27: जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र 31 जुलै 2020 पर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत किंवा रांगेतील शेतकरी संपेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहे.
       कोरोना (COVID-19) या विषाणु मुळे पसरत असलेला आजार संसर्गजन्य म्हणुन घोषित केलेला आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोख्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासुन लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केले आहे. जिल्हयात कोराना बाधीत रुग्णांच्या संपर्कात लोकानी येवू नये म्हणुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सांयकाळी 5 ते सकाळी 7 या कालावधीत संपुर्ण जिल्हयात मनाई आदेश लागु केले आहे.
         या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत सेतु केंद्र व महा ई सेवा केंद्र व केंद्र चालक/आदेशाचे पालन न करणारे कोणतेही व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र असून संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्थानक प्रभारी अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 व 52 तसेच साथरोग प्रतिबंधक 1897 अन्वये व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार व महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम 2020 मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करणेत येईल. या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली आहे.
**

पालकमंत्री भरणे यांनी केले वीरजवान भास्कर वाघ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन



        सोलापूरदि.27: बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील वीरजवान भास्कर वाघ यांना लडाखमध्ये अपघाती वीरमरण आले होते. रविवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून धीर दिला.

            श्री. भरणे म्हणालेआज कारगिल विजय दिवस आहे. वीरजवान वाघ हे आपल्या सेवेसाठी सैन्यात भरती झाले होते. त्यांचा काश्मिरमधील लेहमधून कारगिलकडे जाताना अपघातात मृत्यू झाला होता. शासन त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील. शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ग्रामस्थांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबाला आधार देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

            वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांच्या वतीने जि.प. सदस्या रेखा राऊत यांनी पत्नी राणी वाघ यांना अंगणवाडीसेविका म्हणून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री श्री. भरणे यांच्याकडे केली.

            यावेळी आमदार यशवंत मानेसरपंच श्री. जाधवरवीरजवान वाघ यांचे वडील सोमनाथ वाघआई राजूबाईपत्नी राणीदोन्ही मुलीमुलगा आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

                                                                        000000


नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश





■शासनस्तरावरील विषय मार्गी लावणार
■ स्थानिक प्रशासनाने आमदारांशी समन्वय ठेवून विकास कामे पूर्ण करावीत
■ विकास कामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही
        पुणे, दि.27: 'कोरोना'चा सामना करताना, विकास कामांनाही गती द्यावी. सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत शासनस्तरावरील कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
     पुण्यातील वडगाव शेरी (नगररोड) भागातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, अधीक्षक अभियंता विजय शिंदे तसेच वन व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
       खराडी ते शिवणे नदीकाठच्या रस्त्यासह नगररोडवरील रस्त्यांच्या प्रलंबित कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले, सार्वजनिक हित लक्षात घेऊन येथील रस्त्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने प्रशासन स्तरावरील प्रश्न स्थानिक आमदार, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने सोडवावेत, असे आदेश त्यांनी दिले.  वनविभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागांच्या मंजुरीसाठीचे प्रस्ताव शासनाला तातडीने सादर करावेत, त्यामुळे शासनस्तरावरील कामे लवकरच मार्गी लावता येतील, असे ते म्हणाले.
           नगररोड भागातील उड्डाणपुलाच्या कामाबाबत स्थानिक आमदार व महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन तो विषय मार्गी लावावा, असे सांगून विकास कामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.

         जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिकेचे संबंधित विभाग, वन विभाग व अन्य संबंधित विभागांनी समन्वय साधून पाठपुरावा ठेवून रस्त्यांची विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

           आमदार सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी मतदार संघातील रस्त्यांच्या प्रलंबित कामांची माहिती दिली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामांसाठी पाठपुरावा करु, असे सांगितले.
           महापालिका आयुक्त विक्रम कुमार व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामे पूर्ण होण्यात प्रशासकीयस्तरावर येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन प्रलंबित कामे गतीने पूर्ण करुन घेऊ, असे सांगितले.
0000

इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनच्या वतीने 2 लक्ष 11 रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द



पुणे, दिनांक 27- उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनच्यावतीने 2 लक्ष 11 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 साठी देण्यात आली आहे.
  यावेळी इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वसंत खंकाळ, उपाध्यक्ष मोहन निमोणकर, सहसचिव विश्वनाथ सहस्त्रबुद्धे, खजिनदार विजय खोचे उपस्थित होते.                                                         
                                                        0 0 0 0  0

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



        पुणे, दि. 27 :  पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात  अंदाजे 27 हजार 37 क्विंटल अन्नधान्याची, 20  हजार 908 क्विंटल  भाजीपाल्याची, 8 हजार 837 क्विंटल फळांची तर  कांदा, बटाट्याची 33 हजार 902 क्विंटल इतकी आवक झाली आहे.
            पुणे विभागात  26 जुलै  2020  रोजी  91.87  लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून  26.289 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  ( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 12.15 वा. पर्यंतची आहे )

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं…





बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती
        सोलापूर, दि.27: जेवण चांगलं मिळतंय का....वेळेवर साफ-सफाई होते का....उपचार व्यवस्थित मिळतात का....हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे....इथं चांगली काळजी घेतली जात आहे.....हा संवाद आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि कोरोना रुग्णांमधील.
            यावेळी आमदार यशवंत मानेजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरप्रांताधिकारी हेमंत निकमअतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडेप्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अंकिततहसीलदार डी.एस. कुंभारजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेलेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादारनगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळीतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड आदी उपस्थित होते.
            श्री. भरणे यांनी   रविवारी सायंकाळी बार्शीतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, रुग्णांकडून माहिती घेतली.   आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. शासन आपल्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे. तुम्ही बरे होताय, काळजी करू नका. मनोधैर्य वाढवाखचू नकाअसेच हसत खेळत रहा, घाबरू नका, अशा शब्दात श्री. भरणे यांनी रूग्णांना धीर दिला.
            बार्शीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालय वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे पॉलिटेक्निक कॉलेज याठिकाणी
चार तर वैरागमध्ये श्रीसाई आयुर्वेदिक महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी असणाऱ्या त्रुटींची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 
·         सूरपाट्यांनी भारावले पालकमंत्री
            पालकमंत्री श्री. भरणे आले त्यावेळी एकीकडे देशभक्तीपर गीते तर एकीकडे रुग्णांमध्ये सुरपाट्याचा खेळ रंगात आला होता. हे पाहून पालकमंत्री भारावून गेले. त्यांनी काही अंतरावरून रुग्णांशी संवाद साधला. आपणही सूरपाट्या खेळल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
·         वृक्षारोपण करण्याची रूग्णांची इच्छा
            आम्ही रूग्ण म्हणून याठिकाणी असलो तरी या महाविद्यालयातील कोविड सेंटरची आठवण म्हणून आम्हाला येथे वृक्षारोपण करायचे आहेखड्डे खांदून तयार आहेतअसे एका रूग्णाने पालकमंत्र्यांकडे विनंती केली. श्री. भरणे म्हणालेहा चांगला उपक्रम आहे. रोपांची व्यवस्था त्वरित रोपे करण्यात येईल.
·         नागपंचमींला महिला रूग्णांचा फेर
या कोविड केअर सेंटरमध्ये मुलेमध्यमवयस्कमहिला हे आपल्या आवडीचे खेळ खेळत आहेत. नागपंचमीला महिलांनी सेंटरमधील मैदानातच फेर धरल्याचे रूग्णांनी आवर्जुन सांगितले.
·         लॉकडाऊन तुमच्या आरोग्यासाठीच- श्री. भरणे
शासन आणि प्रशासनाला लॉकडाऊन करण्यात आनंद नाही. तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याला रूग्ण कमी करायचे आहेत. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि जीविताचा धोका टाळण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. प्रशासनाला सहकार्य कराघराबाहेर पडताना मास्कचा वापर करासुरक्षित अंतर ठेवाहात साबणाने धुवाअसे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.       
00000