Wednesday, July 8, 2020

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर



  पुणे दि.8 : - पुणे विभागामध्ये  8 जुलै 2020  अखेर  पहिल्या टप्प्यामध्ये  परदेशातून एकूण 457 व्यक्तींचे दुसऱ्या टप्प्यामध्ये 789,  तिस-या टप्प्यात 2 हजार 297 आणि त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात 296 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण  परदेशातून  3 हजार 839  व्यक्तींचे आगमन झालेले आहे.
          यामध्ये पुणे जिल्हयातील 3 हजार 136, सातारा जिल्हयातील 174, सांगली जिल्हयातील 181, सोलापूर जिल्हयातील 183 तर कोल्हापूर जिल्हयातील 165 व्यक्तींचा समावेश आहे. अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  0 0 0 0

No comments:

Post a Comment