Wednesday, July 15, 2020

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन - विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर

       
पुणे दि.14 : - वंदेभारत या मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात 4 जुलै 2020 पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये 14 जुलै 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून 457, दुस-या टप्प्यामध्ये 789 त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यामध्ये 2 हजार 297, चवथ्या टप्प्यामध्ये 907 अशा एकूण 4 हजार 450 व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 3 हजार 629, सातारा जिल्हयातील 225, सांगली जिल्हयातील 203, सोलापूर जिल्हयातील 203 तर कोल्हापूर जिल्हयातील 190 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त्    डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  0 0 0 0

No comments:

Post a Comment