Monday, July 6, 2020

पुणे विभागात 95.07 टक्के धान्यवाटप - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे दि.6 : - पुणे विभागात अंत्योदय  व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे  जून 2020  महिन्याचे नियमित मंजूर 66 हजार 574.22  मे.टन असून आज अखेर 66 हजार 493.46 मे टन (99.88 %)  धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य  वितरण  95.07 % आहे. याअंतर्गत एकूण 26.16 लाख लाभार्थ्यांना  63 हजार 295.63  मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
        पुणे विभागात  5 जुलै 2020 रोजी  एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत.   यामध्ये  18 हजार  610  गरजूंनी लाभ घेतला आहे. दिनांक 5 जुलै 2020 रोजी 18 हजार 610 ( 80.56 टक्के)  थाळयांचे वाटप झालेले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

            
                                                                  0 0 0 0 0

No comments:

Post a Comment