Monday, July 6, 2020

पुणे विभागातील 20 हजार 916 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 35 हजार 409 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 6 :- पुणे विभागातील 20 हजार  916 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 35 हजार 409 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  13 हजार 242 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 648 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.07 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.53 टक्के इतके आहे.अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 29 हजार 403 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 17 हजार 329  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव  रुग्ण संख्या  11 हजार 199  आहे. कोरोनाबाधित एकूण 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 492 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.94  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.98 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 552 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 356 , सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 109, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर 25 जिल्ह्यात  अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 334 रुग्ण असून 791 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  488 ॲक्टीव रुग्ण संख्या  आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 3 हजार 211 कोरोना बाधीत रुग्ण असून  1 हजार 786  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 129 आहे. कोरोना बाधित एकूण 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 495 रुग्ण असून 267 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 216 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील  966 कोरोना बाधीत रुग्ण असून 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 210 आहे. कोरोना बाधित एकूण  13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 6 हजार 270 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 2 हजार 243 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  4 हजार 27 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 66 हजार  467 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 35 हजार  409 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 6 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

No comments:

Post a Comment