Wednesday, July 15, 2020

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



        पुणे, दि. 15 :  पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात  अंदाजे           9 हजार 805  क्विंटल अन्नधान्याची, 19  हजार 816  क्विंटल  भाजीपाल्याची, 6  हजार 913  क्विंटल फळांची तर  कांदा ,बटाट्याची  13  हजार 825  क्विंटल इतकी आवक झाली आहे.
पुणे विभागात 14 जुलै  2020  रोजी 95.477  लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून  23.973 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
             
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा. पर्यंतची आहे )
                                      0  0   0    0

No comments:

Post a Comment