Wednesday, July 8, 2020

रॅपिड अँटिजेन टेस्टला सोलापुरात सुरवात


सोलापूर, दि. 8: सोलापूर शहरातील रॅपिड ॲटिजेन टेस्टला आज सुरवात करण्यात आली.जोडभावी पेठ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज पहिली टेस्ट घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनिवास करली, नगरसेविका विजयालक्ष्मी गड्डम, उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोलापुरातील जेष्ठ आणि को-मॉर्बिड नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज जोडभावी पेठ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात टेस्टना सुरुवात करण्यात आली.
या टेस्ट मुळे अर्धा तासातच कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती कळणार आहे. त्यामुळे कोरोना बाधा झालेल्या व्यक्तीचे झटपट अलगीकरण करणे, त्याच्यावर उपचाराची सुरुवात करणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर कोरोनाच्या विषाणूचा प्रसारही रोखण्यास मदत होणार आहे, असे डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त अजयसिंग पवार आदी उपस्थित होते. 

                                                000000000

No comments:

Post a Comment