Saturday, July 18, 2020

पुणे विभागातील 35 हजार 538 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरीविभागात कोरोना बाधित 58 हजार 98 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 18 :- पुणे विभागातील  35 हजार 538  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 58 हजार 98  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 20  हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1  हजार 757  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 755  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.02  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील  48 हजार 192  बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 30  हजार 283  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 656  आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 568 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 473 व पुणे कॅन्टोंन्मेंट 152 , खडकी विभागातील 48 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 324 , जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  91  रुग्णांचा समावेश आहे.  
                पुणे जिल्हयात  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 942, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 174  व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 21 , ग्रामीण क्षेत्रातील 59, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  28रुग्णांचा समावेश आहे. तसेच 500 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.84 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.60  टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 490 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1  हजार 916 , सातारा जिल्ह्यात 70, सोलापूर जिल्ह्यात 232, सांगली जिल्ह्यात  50 तर कोल्हापूर जिल्ह्यात 222 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2  हजार 214  रुग्ण असून 1  हजार 225  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  916 आहे. कोरोनाबाधित एकूण 73  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील  4 हजार 941 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 642  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1  हजार 936  आहे. कोरोना बाधित एकूण 363  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 891 रुग्ण असून 417 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.                      ॲक्टीव रुग्ण संख्या 449  आहे. कोरोना बाधित एकूण  25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 1  हजार 860   कोरोना बाधीत रुग्ण असून 971  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 846 आहे. कोरोना बाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण  2 लाख  87 हजार  787  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   2 लाख 82  हजार 846  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  4 हजार 941 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 24  हजार 55  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 58  हजार 98 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 18 जुलै 2020 रोजी दुपारी 5.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

No comments:

Post a Comment