Wednesday, July 15, 2020

रेशन धान्य दुकाने बंद राहणार गॅस सिलेंडर घरपोच मिळणार अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती


            सोलापूर, दि.15:-सोलापूर शहरासह पाच तालुक्यातील 31 गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत रास्त भाव धान्य दुकाने (रेशन दुकान) पूर्णपणे बंद राहतील. मात्र स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची घरपोच सेवा सुरू राहील, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी आज दिली.
             जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी सांगितले की, शहरातील रास्त भाव धान्य दुकानातून अन्नसुरक्षा कायद्यातून शहरात सुमारे 80 टक्के आणि ग्रामीण भागात सुमारे 70 टक्के अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कोणालाही अन्नधान्याची  टंचाई  भासणार नाही. मात्र अद्याप ज्या रेशन कार्डधारकांनी जुलै महिन्याचे धान्य नेले नाही. त्यांचे अन्नधान्य परत जाणार नाही. त्या ग्राहकांनी 27 जुलैनंतर अन्नधान्य रेशन दुकानातून घ्यावे. या दहा दिवसाच्या कालावधीत अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत पुढील परिमंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पटील यांनी केले
1) परिमंडळ अ श्री. नंदकुमार धनगर -98 23 39 22 71
2) परिमंडळ ब श्री. नितीन वाघ -90 67 22 96 28
3)परिमंडळ क श्री. अनिल गवळी -98 22 29 30 52
4)परिमंडळ ड श्रीमती जयश्री मांडवे -94 23 62 62 08
केशरी कार्डधारकांनाही जूनचे धान्य दिले जाणार आहे हे धान्य लवकरच येण्याची शक्यता असून 27 जुलैनंतर त्यांचे वाटप करण्यात येईल असे श्री पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment