Friday, May 29, 2020

सुक्ष्म नियोजन करूनमृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे.-उप मुख्यमंत्री अजित पवार

पुणे,दि.२९-महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
     कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या  उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
 बैठकीला कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम,
महापौर मुरलीधर मोहोळ, आ. अशोक पवार, आ. संजय जगताप, आ. अतुल बेनके, आ. राहूल कुल,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,
विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम,  जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रमकुमार,
सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,  पोलीस अधीक्षक संदीप पाटील,  ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
     उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर उप मुख्यमंत्री श्री.पवार  पुढे म्हणाले ,लोकांमध्ये जनजागृती व त्यांच्यात विश्वास निर्माण  करणे आवश्यक आहे.ग्रामीण भागातील लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकते.त्यामुळे कोरोनाबरोबर जगताना घ्यावयाच्या काळजीबाबत लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे.
 महापालिकेने बालेवाडीत बेडची व्यवस्था  केली आहे.पण ग्रामीण भागातही तशी व्यवस्था उभी करावी लागेल.शेवटी माणसांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे.
  लाॕकडाऊनच्या अनुषंगाने बोलताना उप मुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, त्या-त्या भागातील भौगोलिक परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागेल.
    खाजगी दवाखान्याचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बी.जे.मेडिकल काॕलेज ससून हाॕस्पिटलच्या नवीन ११ मजली इमारतीचे सर्व मजले उपयोगात आणले पाहिजे. निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही.मागणी केल्यास निधी उपलब्ध करून देऊ,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करावे. रुग्णालय सक्षम करावे.पोलिस यंत्रणा व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावे,असे सांगितले.
   ग्रामीण भागात डाॕक्टरांनी निवासी थांबले पाहिजे,या राज्यमंत्री डाॕ.कदम यांच्या सूचनेवर उपमुख्यमंत्री यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिका-यांना दिले.
     ----------------+

पुणे विभागातील 4 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 8 हजार 981 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

  पुणे दि. 29 :- पुणे विभागातील 4 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 981 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 147 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 200  बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 848 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 37 आहे. कोरोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 460 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 321, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 100, कोल्हापूर जिल्ह्यात 9 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील 452 कोरोना बाधीत रुग्ण असून 134 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 301 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 795 कोरोना बाधीत रुग्ण असून 314  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.     ॲक्टीव रुग्ण संख्या 409  आहे. कोरोना बाधित एकूण 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील  कोरोना बाधीत 98 रुग्ण असून 54 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 41  आहे. कोरोना बाधित एकूण 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 436 कोरोना बाधीत  रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 359  आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 83 हजार 73 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 77 हजार 945 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 128 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 68  हजार 849 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 981 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
(टिप : - दि.29 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
                                 0000

मेड ऑन गो प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.२९: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्मार्ट सारथी अँपच्या वतीने नागरिकांना  घरबसल्या वैद्यकीय सल्ला व उपचारांबाबत माहिती मिळवण्यासाठी विकसित केलेली मेड ऑन गो ही प्रणाली अत्यंत उपयुक्त असून नागरिकांनी जास्तीत जास्त या प्रणालीचा लाभ घ्यावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
  कोविड साथीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली होती,यावेळी मेड ऑन गो या प्रणालीचे उपमुख्यमंत्री यांनी उदघाटन केले.यावेळी राज्यमंत्री  विश्वजीत कदम,महापौर मुरलीधर मोहोळ,आमदार अशोक पवार,संजय जगताप,राहूल कुल,विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड,पुणे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम,जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई ,पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,आय टी सेल प्रमुख नीलकंठ पोमण तसेच उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.     
       याप्रणालीबाबत  पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले,कोविड साथीबाबत नागरिकांना घरबसल्या अचूक मार्गदर्शन मेड ऑन गो द्वारे मिळणार असून त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नॉन कोविड रुग्णांची तपासणीसाठी कोविड सेंटरवर विनाकारण होणारी गर्दी यामुळे कमी होईल.व्हिडिओ कंसलटिंगची सुविधा या प्रणालीमध्ये आहे.त्याचप्रमाणे स्मार्ट सारथी अँप द्वारे कंटेन्मेंट भागातील कोविड रुग्ण शोधता येतील. नागरिकांना ई पास,हेल्थ असेसमेंट सर्व्हे, सिटीझन व्हॉलेंटर,घरपोच किराणा,औषधे,फळभाज्या अशा सुविधा उपलब्ध असल्याचे श्री.हर्डीकर यांनी सांगितले.
           ००००००००००००००

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी
       दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय                                                  - उपमुख्यमंत्री अजित पवार
      पुणे, 29: आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी  परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.
            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी  व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेतांना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे  उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या संतांनी दिलेल्या  शिकवणीचा आदर करुया, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन  परंपरा कायम ठेवायची आहे. या सोहळ्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
            राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
           विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर प्रास्ताविक करतांना म्हणाले, आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत आपण 15 मे रोजी बैठक घेतली. मात्र पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकुणच पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत शासनानाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
               राज्यशासनाने जो निर्णय  घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला.  तसेच यावेळी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,  श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त यांनीही  व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आषाढी वारीच्या आयोजनासंदर्भात आपली मते मांडली.
               या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन,  पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या  प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील  मान्यवर उपस्थित होते.
0000

कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

            पुणे,दि.२९: कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण  करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत.भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
              राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि सोलापूर -कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डाॕ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग,राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
  कोल्हापूर ,सांगली,सोलापूर,सातारा  येथील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच अडचणी व लागणाऱ्या निधीबाबत चर्चा केली.
    सातारा जिल्ह्यातील कराड-तासगांव रस्ता व पुलाचे काम लवकर करावे. सातारा-कोरेगांव-मसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे. लोकांची सारखी मागणी असते,असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले,कामासाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी द्या.खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे.
सोलापूर शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे,असे त्यांनी  यावेळी सांगितले.
   टेंभुर्णी-पंढरपूर -मंगळवेढा-उमदी-विजापूर आणि अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यांच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.माढा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या,असे सांगितले.
  पुणे जिल्ह्यातील आढावा घेताना संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम लवकर व्हावे.भूसंपादनातील त्रुटी दूर करा,मिळालेला निधी खर्च करा,असे सांगितले.
   नाशिक रोडवरील चाकण,राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी होते.तसेच वाघोली येथेही तिच परिस्थिती उद्भवते.तेव्हा तेथील रुंदीकरणाचे काम करावे,असे श्री.पवार यांनी सांगितले.पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 चारही बायपासचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.चांदणी चौकातील रस्त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
*****

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठीदशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार

          पुणे, 29: आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी  परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.
          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी  व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेतांना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे  उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या संतांनी दिलेल्या  शिकवणीचा आदर करुया, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन  परंपरा कायम ठेवायची आहे. या सोहळ्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. 
  राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
            विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर प्रास्ताविक करतांना म्हणाले, आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत आपण 15 मे रोजी बैठक घेतली. मात्र पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकुणच पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत शासनानाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
              राज्यशासनाने जो निर्णय  घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले. 
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला.  तसेच यावेळी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,  श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त यांनीही  व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आषाढी वारीच्या आयोजनासंदर्भात आपली मते मांडली.
               या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन,  पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या  प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील  मान्यवर उपस्थित होते.
0000

सामुहिक शक्तीच्या जोरावर'करोना'ला निश्चित हरवू- उपमुख्यमंत्री अजित पवार

_पिंपरी-चिंचवडमधील 'करोना' उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर व्यक्त केला विश्वास_
पुणे, दि. 28 :  पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य 'करोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
          पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचेआयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएम अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरु करायला परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. 
           या लढ्यात सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास करोनावर निश्चितच विजय मिळवू असेही पवार म्हणाले.
*इंडस्ट्रीच्या अडचणी सोडविणार...*
             पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमधून पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे समोर येत आहेत त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल असे अजित पवार म्हणाले.
*हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक...*
              पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. यावर मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून यावेळी हॉटेल संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
****

Thursday, May 28, 2020

शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्याकोविड-19 केंद्राची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी केली पाहणी

  पुणे दि. 28: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 च्या केंद्राला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी  आज भेट देवून पाहणी केली.  पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास या केंद्राचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो या कामाची  माहिती जाणून घेत त्यांनी कोविड केंद्रावर लागणाऱ्या खाटा, सी.सी.टी.व्ही. व आवश्यक  त्या वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत सूचनाही केल्या. तसेच तेथील विविध ठिकाणांचीही माहिती घेतली.
  यावेळी कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, सहायक आयुक्त संदीप कदम, पुणे जिल्हा परिषदेचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अजय बेंद्रे, आरोग्य विभागाचे डॉ.शिवाजी  विधाटे व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते व बियाणे उपलब्ध करुन द्यावीत- कृषी मंत्री दादाजी भुसे

पुणे दि.28- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी  पडू नयेत, यासाठी आवश्यकतेनुसार या निविष्ठा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत खते व बी-बियाणे उपलब्ध करुन द्यावीत, असे निर्देश कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

खरीप हंगाम २०२० नियोजनाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा  घेतला. बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सह संचालक दिलीप झेंडे, दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अग्रणी बँकेचे अग्रणी व्यवस्थापक आनंद बेडेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर चे जिल्हाधिकारी अनुक्रमे मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजीत चौधरी, दौलत देसाई, साताऱ्याचे अपर जिल्हाधिकारी, तसेच या सर्व जिल्ह्यातील पोलीस, कृषी, सहकार विभागाचे व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. यावेळी या जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी खरीप हंगामाबाबत विविध सूचना केल्या. 
श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगामासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित कोणत्याही बाबींची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारा कापूस, तूर, मका, ज्वारी, हरभरा आदी शेतमाल येत्या 15 जून पर्यंत खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच माल येत असल्याची पडताळणी करावी.  
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी शेतमाल व फळपिके नागरिकांना कमी पडू दिले नाही. यात बळीराजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे गौरवोद्गगार काढून श्री. भुसे म्हणाले, या काळात शेतकऱ्यांचा 2 हजार टन शेतमाल ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाने केले आहे. या कामाचे कौतुक करुन येणाऱ्या काळात कृषी क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाण्या-येण्यास तसेच  शेतीसाठी आवश्यक वाहनांना इंधनपुरवठा करण्यासाठी कोणतीही अडचण येवू देवू नये, अशा सूचना त्यांनी पोलीस विभागासह संबंधित  सर्व यंत्रणांना दिल्या. 

शेतीसाठी युरियाचा  50 हजार  मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. तथापि जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढाच व कमीत कमी युरियाचा वापर करावा, असे सांगून याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्याबाबतही त्यांना प्रोत्साहन द्यावे, असेही श्री. भुसे म्हणाले. शेतकऱ्यांच्या बांधावर आतापर्यंत 96 हजार 900 मेट्रीक टन रासायनिक खते तसेच 46 हजार 655 क्विटंल बियाणे पोहोचवण्यात आली आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

विभागातील सर्व जिल्ह्यांच्या पीक कर्जाचा आढावा घेवून ते म्हणाले, पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. त्याच बरोबर शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावे. पीक कर्ज टाळाटाळ करणाऱ्या बँकाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
कोरोना काळात बँकांमध्ये गर्दी होवू नये, यासाठी पीक कर्ज मागणीसाठीचा एक पानी अर्ज बँकेमध्ये ऑनलाईन सादर करुन त्यावर कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टिने कृषी विभागाच्या वतीने आजपासून यु टयुब चॅनल सुरु करण्यात आले असल्याचे सांगून कृषी तज्ज्ञांनी आजवर 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला आहे, असेही श्री. भुसे यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करावेत. ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन व साखर कारखान्यांनी प्रोत्साहनपर उपक्रम राबवावेत, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज
           --राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम

राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, लॉकडाऊनमुळे शेतीशी निगडीत कोणतीही कामे अडू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी सोशल डिस्टंन्सिंग व आवश्यक ती खबरदारी घेवून ही कामे करण्यासाठी शासनाने शिथिलता दिली आहे. यापुढेही शेती विषयक कामे सुरु ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. खरीप हंगामाच्या दृष्टिने कृषी विभागाने योग्य ते नियोजन केले असून यासाठी शासनाचा कृषी विभाग सज्ज आहे,असे राज्य मंत्री डॉ. कदम म्हणाले, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.  सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. याचा विचार करुन सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीसाठी उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डॉ. कदम यांनी यावेळी दिली .
 
  जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनामुळे कृषीक्षेत्राशी निगडीत विषय प्रलंबित राहू नयेत, याची दक्षता घेवून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तपणे वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेण्यात येत आहे. तसेच नियोजन करुन खरीप हंगामासाठीची कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी हमी दिली. तसेच जिल्ह्यातील बियाणे व खतांची उपलब्धता आवश्यक बियाणे व खते, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, शासकीय खरेदी केंद्रे आदीबाबत माहिती दिली.
000000

Wednesday, May 27, 2020

पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनाबाबतविभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती

  पुणे, दि.27 - पुणे विभागातील  कोरोना बाधित रुग्णांची संख्या, प्रतिबंधीत क्षेत्र सद्यस्थिती,  रुग्णसंख्या लक्षात घेता  बेड क्षमता नियोजन व सोलापूर जिल्हयातील रुग्णवाढ व उपचार व्यवस्था, संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था तसेच प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज सविस्तर माहिती दिली.  
  राज्यातील कोरोना बाबत शासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्हयासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्हयातील उपाययोजनाबाबतचा  व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.                          डॉ.म्हैसेकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील मृत्यूदर विचारात घेऊन तातडीच्या नियोजनासाठी टास्क फोर्स चे चेअरमन सोलापूर येथे जात आहेत. सोलापूरसह संपूर्ण पुणे विभागात ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराचा इतिहास असलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. संस्थात्मक विलगीकरण असलेल्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी तपासणी, शुगर तसेच रक्तदाब तपासणी करण्याबाबत  संबंधिताना सांगण्यात आले असल्याचे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
                विभागीय आयुक्त कार्यालयात या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगवेळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पुणे विभागाचा आढावा कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही ख-याअर्थाने कसोटीची वेळ - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

      पुणे, दि. 27 -  पुणे विभागतील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयांत कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. कंटेनमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत तसेच कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे सांगतानाच कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही ख-याअर्थाने कसोटीची वेळ असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
           डॉ. म्हैसेकर म्हणाले,  आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मनक उपाययोजना करण्यामत येत आहेत. यासोबतच परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे सुलभ होईल व कोरोना प्रतिबंधासाठी उपयोग होईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर, बीपी तपासणी तसेच शुगर तपासणीला प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
           कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, तालुक्याचा हद्दीत व ग्रामीण भागात बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे असे निर्देशही देवून डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता विशेष खबरदारी म्हणून संबंधित ग्रामीण भागामध्ये बाहेरुन प्रवास करुन जे प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा इतर कोणताही नागरीक प्रवेश करेल, या सर्व प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा नागरीक यांना संस्थात्मक विलगीकरण करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतचे अंमलबजावणी करीता तसेच गावपातळीवर कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, तलाठी किंवा आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत झालेली उपाययोजनांची अंमलबजावणी, स्थानिक स्थिती, संभाव्य स्थिती व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नव्याने करावयाचे उपाय आदी बाबींसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेचे अधिकारी यांनी आपल्या जिल्हातील उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सबंधित जिल्हा प्रशासनातील कोरोना जबाबदारी देण्यात आलेले समन्वय अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पुणे विभागाचा आढावा कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही ख-याअर्थाने कसोटीची वेळ-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Tuesday, May 26, 2020

पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती

  पुणे दि.26: - पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापनाचा परिपूर्ण आराखडा, नाल्यांची सफाई, पावसाळयापूर्वीची कामे  पूर्ण करण्याबाबतचे नियोजन ,तसेच गतवर्षी विभागात सांगली व कोल्हापूर जिल्हयात गंभीर पूरपरिस्थिती उद्भवली, त्यादृष्टीने खबरदारीचे नियोजन यासह पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज सविस्तर माहिती दिली. 
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील विभागनिहाय मान्सूनपूर्व तयारीबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, गतवर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयात  निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत नियोजन करयात आले आहे. नद्यांच्या खोलीनुसार व नदीच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज घेवून जास्त क्षमतेच्या बोटी खरेदी तसेच  शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटाचा सामना करताना मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत
आम्ही दक्षता घेतल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना गतवर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी  घेण्यात आली आहे. पावसाळयापूर्वीची कामे वेळेत पूर्ण  होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुण्याच्या आंबील ओढयाबाबतची दक्षता तसेच गतवर्षी अलमट्टी धरणाचा विसर्ग न वाढल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूरस्थिती उद्भवली, यावर्षी याबाबतच्या दक्षतेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
   पुणे विभागातील बहुतांश महानगरपालिका क्षेत्रातील शाळा कोवीड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे पावसाळयाच्या कालावधीतील संभाव्य अडचणीच्या कालावधीत निवा-याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन सुरळित व समन्वयाने करा पुणे विभागातून 1 लाख 88 हजार 570 प्रवाशांना घेऊन 141 विशेष रेल्वेगाडया रवाना उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यातील प्रवासी - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि. 26 - महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला. पुणे विभागात सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली असून यापुढेही ज्या मजूर, कामगार यांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असेल अशा परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन सुरळित व समन्वयाने करा अशा सूचानाही डॉ. म्हैसेकर यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व समन्वयासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील मिश्रा,पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा ,सहर्ष वाजपेयी, उपायुक्त दीपक नलावडे, विभागीय सुरक्षा आयुक्त श्री त्रिपाठी आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार व इतर राज्यामधील 1 लाख 88 हजार 570 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 141 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्या आहेत. परराज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार व श्रमिकांची पाठवणी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरु आहे. पुणे विभागातून यासाठी विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. मजुरांची शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची व्यवस्था केली. तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे.
पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयातील किती मजुरांनी गावाकडे जाण्याची मागणी केली आहे त्याप्रमाणे रेल्वेगाडयांचे नियोजन करा, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील समन्वय अधिकारी यांनी मजूरांच वाहतूक व्यवस्थेचे अत्यंत बारकाईने नियोजन करावे तसेच या श्रमिकांना पाठविताना सुरक्षित अंतर ठेऊन पाठविण्यात यावे. मजूरांना मास्क, जेवण, पाणी यासह आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात असे सांगून पुणे विभागातून परराज्यात परतणा-या मजूरांबाबतचा जिल्हानिहाय आढावा घेतला. यामध्ये रेल्वे विभागांच्या अधिका-यांनी रेल्वेच्या पातळीवर सुरू असलेले नियोजन, समन्वय अधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवरील नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या नियोजनबाबत माहिती देण्यात आली. बैठकीला महसूल, पोलीस व रेल्वे विभागचे सबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार- .रुग्णवाहिका नियंत्रणासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

        पुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकेंची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकेंची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
  पी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे,सह व्यवस्थापक अजय चारठणकर,सुनील बुरसे,अनंत वाघमारे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.
  पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी आशा एकूण २ हजार३४२ रुग्णवाहिका असून सध्या कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. 
   या सर्व रुग्णवाहिकांना जी पी एस प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वार्ड निहाय या रुग्ण वाहिका थांबवण्यात येतील. रुग्णांना नेण्यासाठी  जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्ड मूळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने ऍडमिट करणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पी पी इ किट,मास्क,ग्लोव्हज हे घालणे अनिवार्य राहील . कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतीलअसे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
  पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बसमध्ये सुधारणा करून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर समन्वय ठेवला जाईल असे पी एम पी एल च्या श्रीमती गुंडे यांनी सांगितले.
0000

पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 7 हजार 719 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

  पुणे दि. 26 :- पुणे विभागातील  3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 हजार 719 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 689 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार  303 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 819 आहे. कोरोनाबाधित एकूण 289  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 501 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 404, सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 31, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 37 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील 335 कोरोना बाधीत रुग्ण असून 126 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 621 कोरोना बाधीत रुग्ण असून 291  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. कोरोना बाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील  कोरोना बाधीत 82 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33  आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत 378 रुग्ण असून 15 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 361  आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण  74 हजार 968 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी     67 हजार 517 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 451  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 59  हजार 688 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 719 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
(टिप : - दि.26 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
                                 0000

पुणे विभागातून 1 लाख 88 हजार 570 प्रवाशांना घेऊन 141 विशेष रेल्वेगाडया रवाना -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

             पुणे, दि. 26 - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार,  हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा  व पश्चिम बंगाल या राज्यामधील 1 लाख 88 हजार 570  प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 26 मे 2020 अखेर  141  विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त   डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 61, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 35, हिमाचल प्रदेशसाठी 1 , झारखंडसाठी 6, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरीसासाठी 2 व पश्चिम बंगालसाठी 4 अशा एकूण 141  रेल्वेगाडया 1 लाख    88 हजार 570  प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत. 
                               0 0 0 0  0 0

कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार.रुग्णवाहिका नियंत्रणासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार
.रुग्णवाहिका नियंत्रणासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित
 - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर 
पुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकेंची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकेंची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
  पी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे,सह व्यवस्थापक अजय चारठणकर,सुनील बुरसे,अनंत वाघमारे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते. 
  पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी आशा एकूण २ हजार३४२ रुग्णवाहिका असून सध्या कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.  
   या सर्व रुग्णवाहिकांना जी पी एस प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वार्ड निहाय या रुग्ण वाहिका थांबवण्यात येतील. रुग्णांना नेण्यासाठी  जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्ड मूळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने ऍडमिट करणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पी पी इ किट,मास्क,ग्लोव्हज हे घालणे अनिवार्य राहील . कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतीलअसे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
  पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बसमध्ये सुधारणा करून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर समन्वय ठेवला जाईल असे पी एम पी एल च्या श्रीमती गुंडे यांनी सांगितले.

परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन सुरळित व समन्वयाने करा-

पुणे विभागातून 1 लाख 88 हजार 570 प्रवाशांना घेऊन 141 विशेष रेल्वेगाडया रवाना 
उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यातील प्रवासी
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
     
  00000