Monday, May 25, 2020

पुणे विभागातून 128 रेल्वे मधून 1 लाख 69 हजार 824 प्रवासी रवाना -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  पुणे दि.25:-  लॉक डाऊन कालावधीत पुणे विभागातून-25 मे पर्यत 128 रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. यापैकी मध्यप्रदेशसाठी - 15, उत्तरप्रदेशसाठी - 56 उत्तराखंडसाठी - 2, तमिळनाडूसाठी -2, राजस्थानसाठी - 5, बिहारसाठी - 33, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी - 6, छत्तीसगडसाठी - 4,  जम्मू-कश्मीरसाठी-1, मणीपूरसाठी- 1, आसामसाठी- 1 व ओरीसासाठी- 1 अशा एकूण 128  रेल्वे रवाना झाल्या असून, यामधून 1 लाख 69 हजार 824  प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगीतले.

  दिनांक 26 मे रोजी  पुणे विभागातून 12 रेल्वे रवाना होणार असून यामधून 16 हजार 800 व्यक्ती त्यांच्या राज्यात पोहचतील. या व्यतिरिक्त 6 हजार 769 बसेसव्दारे 1 लाख 3 हजार 287 व्यक्तींना त्यांच्या राज्यांच्या सीमेवर  व जिल्हयांमध्ये पोहचवण्यात आले आहे. वेगवेगळया भागातून पुणे विभागात एकंदर 339 बसेसव्दारे 7 हजार 80 व्यक्ती आल्या आहेत, अशी ‍ माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. 
0000

No comments:

Post a Comment