Monday, May 18, 2020

पुणे विभागातील 2 हजार 275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 हजार 744 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 18 :- पुणे विभागातील 2  हजार 275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार  744  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  2 हजार 233 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 236  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 177 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 123 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 14 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 903  आहे. कोरोनाबाधित एकूण 206  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 166    रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 122, सोलापूर जिल्ह्यात 12, कोल्हापूर जिल्ह्यात 8, सातारा जिल्ह्यात 9  अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील 138 कोरोना बाधीत रुग्ण असून 69 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  67  आहे. कोरोनाबाधित एकूण  2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील  390  कोरोना बाधीत रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 214 आहे. कोरोना बाधित एकूण  26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील 50  कोरोना बाधीत रुग्ण असून  32  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  17  आहे. कोरोना बाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 43  कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 32  आहे. कोरोना बाधित एकूण  1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 52 हजार 462  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  44 हजार 983  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  7 हजार 539  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी   40 हजार 180   नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  4  हजार  744  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             आजपर्यंत विभागामधील  1 कोटी 14 लाख  65 हजार 859  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 92 लाख  30 हजार 712  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3  हजार 80 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण 
  पुणे विभागामध्ये 10 मे 2020 पासून ते 18 मे 2020 पर्यंत परदेशातून एकूण 476 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.
                                 0000

No comments:

Post a Comment