Thursday, May 21, 2020

पुणे विभागात अन्न्ा धान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि. 21 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 18 हजार 38 क्विंटल अन्नधान्याची तर 14 हजार 711 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 4 हजार 74  क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 6 हजार 981 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            
  पुणे विभागात 20 मे 2020 रोजी  98.71 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.41 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
                                      0  0   0    0

No comments:

Post a Comment