Thursday, September 26, 2019

‘पुण्य भूषण’ पुरस्काराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचावा
-         उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
पुणे,दि.26: भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वतर्मानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पाहोचविण्याची गरज असून भारताला समृध्द करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे अवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.
          येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात पुण्य भूषण फाऊंडेशनआणि पुणेकरांच्यावतीने दिला जाणारा पुण्य भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ एस. बी. मुजुमदारज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डेडॉ के. एच. संचेती उपस्थित होते. 
            उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी आहे. पुणे हे देशातील सर्वात सुंदर शहर आहे. शैक्षणिक केंद्र असणाऱ्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले दाम्पत्य, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यांच्यासह थोर समाजसुधारकांचा वारसा आहे. या शहरातील पुण्यभूषण पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.   
            या वर्षीचा पुरस्कार पुरातत्वज्ज्ञ डॉ. देगलूरकर यांना दिल्याने या निमित्ताने पुरातत्व शास्त्राचा गौरव झाला आहे. पुरातत्व शास्त्र हे खरा इतिहास समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपला सांस्कृतिक इतिहास उजेडात आणण्याचे काम करते. देशातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मृतीस्थळे आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम करत असतात, त्यामुळे हा समृध्द वारसा जपण्याचे काम सर्व देशवासीयांनी एकत्रितपणे करण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी त्यांना देशाच्या सांस्कृतीची ओळख करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक स्थळांना भेटींचे आयोजन शैक्षणिक संस्थांनी करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
            भारताची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाखालील असल्याने हा युवा वर्ग आपल्या देशाचे शक्तीस्थान आहे. या युवकांना इतिहासातून प्रेरणा मिळून त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी कौशल्याधारीत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आजच्या युवा पिढीने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन श्री. नायडू यांनी यावेळी केले.
        पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणालेहा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहेहा पुरस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच मी मानतो. हा पुरस्कार पुरातत्व शास्त्राचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन आणि समृद्ध आहेती सर्वात प्रवाही आहे. या संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचे काम पुरातत्व शास्त्र करते.
          यावेळी वीरमाता लता नायरस्वातंत्र्य सैनिक मोहंमद चांद शेखसीमेवर लढताना जखमी झालेले सैनिक नाईक फुलसिंगहवलदार गोविंद बिरादार यांचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ गो. ब. देगलूरकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली. 
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुण्यभूषण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी केले. तर आभार डॉ. प्रभा अत्रे यांनी मानले. या कार्यक्रला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****





Wednesday, September 25, 2019





उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुण्यात आगमन

पुणे दि. 25: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, एअर कमोडोर राहूल भसीन, मेजर जनरल नवनीत कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, यांनी उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
पुण्यभूषण पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्यासाठी उपराष्ट्रपती महोदय यांचे पुण्यात आगमन झाले आहे.
0000000

विधानसभा निवडणूक पूर्व तयारीचा
     मुख्य सचिवांनी घेतला आढावा
पुणे दि. २५: विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्हा निहाय आढावा घेतला. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल उपस्थित होते.
या व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त व्यंकटेशन के., पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, म्हणाले, निवडणूक प्रक्रीया शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. निवडणुकीचे कामकाज करताना प्रत्येकाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूकीसाठी कालावधी कमी असल्याने सर्वांनी वेगाने कामे करणे अपेक्षीत आहे.
निवडणूका शांततेत, सुरळीत आणि निर्भय वातारणात पार पडण्यासाठी प्रत्येक बारिक-सारिक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. जे मतदार संघ संवेदनशील आहेत त्याठिकाणी आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.  निवडणूक काळात कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, आचारसंहितेचा भंग होवू न देण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
            यावेळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडून प्रत्येक मतदार संघ निहाय निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.


Friday, September 6, 2019

कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पुणे दि.6 : छत्रपती शिवाजी महाराज आणि जो मराठयांचा इतिहास आहे, त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री पुणे येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, किल्लांसंदर्भात पसरविण्यात आलेली बातमी अत्यंत चुकीची आहे. यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा जो इतिहास आहे त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. हे सर्व संरक्षित किल्ले आहेत.
सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडचा विकास केला, त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी लक्ष घालून ज्याप्रकारे काम रायगड किल्ल्यावर चालू केले आहे. तसाच इतिहास आम्हाला जतन करावयाचा आहे. ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे दोन-तिनशे किल्ले आहेत, तिथे पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का, यासंदर्भातील तो निर्णय होता. कुठले समारंभ, लग्न याला काही अर्थ नाही. छत्रपतींचा आणि हिंदवी स्वराज्याचा, मराठयांच्या साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्यांशी सबंधित आहे, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली प्रार्थना









       पुणे,दि.6 - सर्वांना जीवनात सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गणरायाकडे केली.
            सध्या सर्वत्र गणेशपर्व सुरू असून पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
            केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गणेशोत्सवाच्या निमिताने श्री गणेशाचे दर्शन घेण्याकरीता आणि त्यासोबत लोकमान्यांना वंदन करण्यासाठी  मला येथे येण्याची संधी मिळाली, याचा मला खरोखर आनंद आहे. गणेशोत्सवाची  ही  परंपरा लोकमान्य टिळकांनी उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली. परिणामी  त्यातूनच या उत्सवाला सामाजिक अभिसरणाचे स्वरुप प्राप्त झाले. तेच स्वरुप पुण्यामध्ये अनेक मंडळानी जतन केले आहे.  सर्वांना  गणोशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणाले, श्री गणेशाला प्रार्थना करतो की, आपल्या सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो व  श्री गणेशाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र देखील प्रगतीपथावर जात राहो, अशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले .
            यावेळी महापौर मुक्ता टिळक, खा. गिरीश बापट, खा.संजय काकडे, . दिलीप कांबळे, .भीमराव तापकीर, . माधुरी मिसाळ, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
विविध मंडळांच्या गणपतींचे घेतले दर्शन
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मानाचा पहिला कसबा गणपती यांचे दर्शन घेवून आरती केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. त्यानंतर दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला भेट देवून दर्शन घेतले व आरती केली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे व उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
            यानंतर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.  यावेळी अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंडळाच्या व  सिध्देश्वर ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी रुपये 51 हजाराचा धनादेश देण्यात आला. यानंतर मानाचा चौथा गणपती  तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.
            यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी  महापौर मुक्ता टिळक व दैनिक केसरीचे संपादक दिपक टिळक यांनी  त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीस दि जनता सहकारी बँक यांच्याकडून रुपये 21 लाख व उद्यम विकास बँक व चरणजीत सहाणी यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश दिला.
            यानंतर साने गुरुजी तरुण मंडळ येथील गणपतीचे दर्शन घेवून मंडळामार्फत उभारण्यात आलेल्या देखाव्याचे उद्घाटन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष धिरज घाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री यांनी कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळ यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन  केले. तसेच गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.

Thursday, September 5, 2019

भारत निवडणूक आयोगाने घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा


दिव्यांगासाठी व्यवस्था करणार  - डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे दि. 5: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून कामाचा आढावा घेतला.
 मुंबई मुख्यालयातून घेतलेल्या आढाव्याच्यावेळी भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिंन्हा, उपनिवडणूक आयुक्त सर्वश्री. संदीप सक्सेना, चंद्रभूषण कुमार, महासंचालक (संदेशवाहन आणि समन्वयक) धिरेंद्र ओझा, दिलीप शर्मा व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह उपस्थित होते.
 त्यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी व येत असलेल्या अडचणीबाबत त्यांची मते जाणून घेतली.
 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना विनासायास मतदान करता यावे, यासाठी तळमजल्यावर मतदान केंद्र निर्माण करावे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याभागातली स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घ्यावे, असे निर्देश श्री. उमेश सिन्हा यांनी दिले. मतदानासाठी आल्यानंतर त्यांना आनंद वाटेल व समाधानाने परत जातील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना अडचणीचे वाटणारे मतदान केंद्र बदलून घ्यावे. हे काम आव्हान म्हणून स्वीकारावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी विभागातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर माहिती देताना म्हणाले, विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मतदान केंद्राचे नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी ते आव्हान असले तरी अशक्य नाही. दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे येथील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याबरोबरच पोलीस आयुक्त व्यंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
00000



सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये.. -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे दि. 5 : शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याच्या भावना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केल्या.
शिक्षक दिनानिमित्त आज येरवडा येथील पुणे महानगरपालिकेच्या कै. गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक विद्यालयात आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती. मीनाक्षी राऊतसहायक प्रशासकीय अधिकारी श्री. विजय आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 आपले शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर जगण्याची कला शिकवत असतात. विद्यार्थ्यांवर संस्कार, संस्कृतीआदर असे पैलू पाडण्याचे काम गुरुजन करतात असे सांगून श्री. म्हैसेकर म्हणाले ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन एखादी कलाकृती साकारतो अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून जबाबदार नागरिक घडवीत असतात. आपले शिक्षक आपल्या आईवडीलानंतर आपले पालकच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
 यावेळी विभागीय आयुक्तांनी शाळेतील शिक्षकांचा पुष्प व पुस्तके देऊन सत्कार केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा कदमसंभाजी बांडेसुभाष सातवराधिका बडगुजरशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कस्तुरबा विद्यालयातील शिक्षकांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार
शिक्षक दिनानिमित्त आज विभागीय आयुक्तांनी कोरेगाव पार्क येथील पुणे महानगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी प्राथमिक इंग्लिश विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत गिरीशिक्षक मोनिका शिरसाट, रुपाली सोनवणे, महादेव कोळी, नितीन कांबळे तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
000000