Wednesday, September 25, 2019

विधानसभा निवडणूक पूर्व तयारीचा
     मुख्य सचिवांनी घेतला आढावा
पुणे दि. २५: विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्हा निहाय आढावा घेतला. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल उपस्थित होते.
या व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त व्यंकटेशन के., पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, म्हणाले, निवडणूक प्रक्रीया शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. निवडणुकीचे कामकाज करताना प्रत्येकाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूकीसाठी कालावधी कमी असल्याने सर्वांनी वेगाने कामे करणे अपेक्षीत आहे.
निवडणूका शांततेत, सुरळीत आणि निर्भय वातारणात पार पडण्यासाठी प्रत्येक बारिक-सारिक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. जे मतदार संघ संवेदनशील आहेत त्याठिकाणी आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.  निवडणूक काळात कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, आचारसंहितेचा भंग होवू न देण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
            यावेळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडून प्रत्येक मतदार संघ निहाय निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.


No comments:

Post a Comment